टायटन कंपनीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आपल्या तिमाही निकालांमध्ये व्यवसायामध्ये घसघशीत वाढ नोंदवली आहे. भारतातील ब्रँडेड दागिने आणि घड्याळे असा एकत्रित व्यवसाय असलेली टायटन ही सर्वात जुनी एकमेव कंपनी आहे. बदलत्या बाजारानुसार टायटनने आपल्या व्यवसायात बदल घडवून आणल्यामुळे कायमच बाजारपेठेत त्यांचा वाढीव हिस्सा राहिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
टायटनला मिळणारे उत्पन्न प्रमुख ४ व्यवसायांतून येते. यामध्ये मौल्यवान दागिने (ज्वेलरी), घड्याळ, चष्मे आणि तत्सम ॲक्सेसरीज याचबरोबर नव्याने सुरू झालेल्या फॅशन ॲक्सेसरीज, उंची परफ्युम्स यांचा समावेश होतो.
पुढील तक्त्यावरून या व्यवसायामध्ये कशी वाढ झाली हे स्पष्टपणे दिसून येते.
टायटनचा व्यवसायातील मुख्य वाटा असलेल्या दागिन्यांच्या व्यवसायामध्ये १९% वाढ दिसून आली. मागच्या वर्षीच्या तुलनेत सणांचे वेळापत्रक यावर्षी वेगळे असल्याने सप्टेंबर महिन्यामध्ये नवरात्रीच्या निमित्ताने दागिन्यांच्या खरेदीत जो उत्साह जाणवतो तो यावर्षी ऑक्टोबरमध्ये दिसण्याची शक्यता आहे. ग्राहकांना आपल्याकडे खेचून आणण्यासाठी ‘तनिष्क’या ब्रँड अंतर्गत टायटन कंपनीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे. मध्य पूर्वेतील कतार, दोहा येथे दोन दालने कंपनीने सुरू केली आहेत.
नवीन दालनांची सुरुवात
टायटन कंपनीने एकूण ८१ नवी दुकाने या तिमाहीमध्ये सुरू केली. यामुळे टायटनच्या एकूण दुकानांची संख्या २५५९ एवढी झाली आहे. यामध्ये तनिष्क या ब्रँडची १०, मिया या आलिशान दागिन्यांची २६ आणि ‘झोया’या ग्रँड ब्रँडचे एक अशी ३७ दालने समाविष्ट आहेत. यामुळे देश-विदेशातील अनेक ग्राहकापर्यंत कंपनी पोहोचेल असा आत्मविश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
हेही वाचा… Money Mantra: मेडीक्लेम-रिस्टोअर्ड आणि रिचार्ज काय आहे हा पर्याय?
घड्याळे आणि स्मार्ट-वॉच च्या विक्रीमध्ये टायटनने नेहमीप्रमाणेच अपेक्षित वाढ नोंदवली आहे मागच्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत 32 टक्क्याने व्यवसाय वाढला आहे. पारंपारिक अनालॉग पद्धतीच्या घड्याळामध्ये २२ टक्के तर स्मार्ट-वॉच सेगमेंटमध्ये त्यापेक्षा दुपटीने वाढ झाली आहे. टायटन कंपनीचा ऑनलाइन विक्री साखळी बरोबर सुद्धा मोठा व्यवहार चालतो. तिसऱ्या तिमाही मध्ये सणांच्या निमित्ताने वाढणाऱ्या मागणीचा विचार करून ऑनलाईन कंपन्यांनी आधीच जोरदार खरेदी केल्याने या तिमाहीतच कंपनीला त्याचा फायदा झाला आहे.
हेही वाचा… Money Mantra: IFSC कोड काय असतो आणि तो इतका महत्त्वाचा का?
चष्मे आणि त्या सेगमेंटमध्ये कंपनीचा व्यापार वाढताना दिसतो आहे. इंटरनॅशनल ब्रँडशी टायअप केल्यामुळे ही वाढ दिसून येत आहे. या तिमाहीतील टायटन कंपनीचा सगळ्यात उल्लेखनीय व्यवसाय वाढला तो ‘तनेरा’या टायटन कंपनीच्या अंतर्गत येत असलेल्या ब्रँडचा. साड्या, कुर्ती, कुर्ता सेट, ब्लाउज, शिवण्यासाठीचे तयार कापड अशी उत्पादने ऑनलाइन आणि प्रत्यक्ष दुकानात विकण्याची सोय या ब्रँडच्या अंतर्गत केली आहे. या सेगमेंटमध्ये कंपनीने विक्रीत ६४% वाढ नोंदवली आहे. या तिमाही मध्ये या ब्रँडची चार नवी दालने कंपनीने सुरू केली.
‘कॅरेटलेन’ या ब्रँडच्या व्यवसायात ४५% वाढ झालेली दिसली. या तिमाही मध्ये कंपनीने या ब्रँडची १३ नवी दालने सुरू केली व यामुळे कॅरेट लेन या ब्रँडचे भारतातील ९७ शहरांमध्ये २४६ दुकानांचे नेटवर्क तयार झाले आहे. सोमवारी बाजार बंद झाला तेव्हा टायटन कंपनीचा शेअर ३२६६ रुपयांवर बंद झाला होता.