ITR Filling Last Date Today : सोमवार ३१ जुलै म्हणजेच आज पगारदार व्यक्ती आणि ऑडिट न केलेल्यांसाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख आहे. प्राप्तिकर विभागाने करदात्यांना लवकरात लवकर रिटर्न भरा आणि शेवटच्या क्षणाची गर्दी टाळा, असे आवाहन केले आहे. ३० जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी ६ कोटींपेक्षा जास्त जणांनी रिटर्न भरले आहेत, ज्यांनी गेल्या वर्षीच्या ३१ जुलैपर्यंतच्या तुलनेत फायलिंगचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती आयटी विभागाने ट्विटद्वारे दिली आहे.

आयटी पोर्टलने ३० जुलै रोजी दुपारी १ वाजेपर्यंत ४६ लाखांहून अधिक यशस्वी लॉगिन केले आणि २९ जुलै रोजी १.७८ कोटी लॉगिन केले, जे फायलिंग हालचालींमध्ये वाढ झाल्याचे दाखवते. जर एखाद्याने अंतिम मुदत चुकवली तर त्याला ५०-२०० टक्के विलंब शुल्कासह विलंबित रिटर्न दाखल करावा लागणार आहे.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
13 December Daily Horoscope in Marathi
१३ डिसेंबर पंचांग: पंचांगानुसार शिवयोग १२ पैकी कोणत्या राशीची आर्थिक घडी सुधारणार? तुम्हाला लाभेल का भाग्याची साथ; वाचा शुक्रवारचे भविष्य
Guru Asta 2025 Guru will set for 27 days in the new year
Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार
Free Aadhaar update details in marathi
Free Aadhaar update: उरला फक्त शेवटचा १ दिवस, आधारकार्डशी संबंधित ‘हे’ काम पटापट करा, अन्यथा…;
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा

हेही वाचा- Money Mantra : LIC ने आणली नवी जीवन किरण पॉलिसी, विम्यासह मिळणार मोठा फायदा

दंड किती होणार?

३१ जुलैनंतर प्राप्तिकर रिटर्न भरणाऱ्या करदात्यांना विलंब शुल्क भरावे लागणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने एका वर्षात ५ लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई केली तर त्याला उशिरा दंड म्हणून ५००० रुपये भरावे लागतील. जर करदात्याचे वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर त्याला विलंब शुल्क म्हणून १००० रुपये भरावे लागतील. दंडासह विवरणपत्र उशिरा दाखल करण्याचा पर्याय ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत उपलब्ध असेल.

हेही वाचा- ‘स्टार मार्क’ असलेल्या ५०० रुपयांच्या नोटा खोट्या आहेत का? व्हायरल दाव्यावर आरबीआयचे स्पष्टीकरण

…तर तुरुंगवासही होऊ शकतो

कर भरणे आणि ITR दाखल करणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. जर तुम्ही करपात्र उत्पन्नाच्या कक्षेत येत असाल, तर तुम्ही दरवर्षी तुमचा कर भरला पाहिजे, परंतु तुम्ही तसे करत नसाल तरी तुम्ही आयटीआर दाखल करणे आवश्यक आहे. केवळ कर न भरणे गुन्हा नाही, तर आयटीआर न भरल्यासही शिक्षेचीही तरतूद आहे. कलम १४२(१)(i) किंवा १४८ किंवा १५३ A अंतर्गत नोटीस पाठवूनही एखादी व्यक्ती आयटीआर दाखल करत नसेल, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. या अंतर्गत ३ महिने ते २ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते आणि तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो.

Story img Loader