सलील उरुणकर

नवउद्योजकांनी त्यांचे उत्पादन किंवा सेवा तयार केल्यानंतर त्याच्या व्यावसायिक यशाच्या कसोटीवर ते मोजावे लागते. हे यश मिळते ते ग्राहकांच्या बळावर आणि ग्राहकांना आपल्याकडे कसे आकर्षित करायचे किंवा खेचायचे हे सूत्र ज्या व्यावसायिकाला समजते तो यशस्वी ठरतो. पण मग ग्राहकांपर्यंत पोचायचे कसे, त्यासाठी कोणत्या माध्यमाची, मार्गांची निवड करावी असे काही धोरणात्मक निर्णय नवउद्योजकांना घ्यावे लागतात. हे निर्णय चुकले तर चांगले उत्पादन किंवा सेवा असूनही व्यावसायिक अपयश कोणाच्याही पदरी येऊ शकते. म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारची बिझनेस मॉडेल्स कोणती आहे, व्यवसाय कशाप्रकारे करावा आणि कोणासोबत करावा याचे अनेक पर्याय समजून घ्यावे लागतात.

ayurvedic experts to hold seminar on garbhavigyan event at iit bombay
आयआयटी प्रांगणात ‘गर्भविज्ञान’ धडे; उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून विरोध
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Pimpri, entrepreneur , LBT ,
पिंपरी : उद्योजकांमागे ‘एलबीटी’चे शुक्लकाष्ट, महापालिकेकडून ७२ हजार व्यापाऱ्यांना नोटिसा
Science and technology as a tool of power
तंत्रकारण : विज्ञान – तंत्रज्ञानातून सत्तेकडे…
JSW Share News
JSW Cement IPO ला सेबीचा हिरवा कंदील; ११ गोष्टी या ‘आयपीओ’बद्दल…
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
Success Story of a man Who Started Mushroom Farming Business With His Mother
Success Story : मायलेकाने केली कमाल! दररोज कमावतात ४० हजार रुपये; जाणून घ्या, कोणता व्यवसाय करतात?
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती

पारंपरिक व्यवसाय पद्धतीमध्ये सामान्यतः दोन प्रकारचे मॉडेल आढळून येतात. एक म्हणजे सर्व्हिस (सेवा) ही दुकान किंवा कार्यालयांमार्फत आणि दुसरी म्हणजे प्रोडक्ट सेल्स ज्यामध्ये एखादी कंपनी त्यांचे वस्तूरुपी उत्पादन हे फ्रँचाईजी किंवा दुकानांद्वारे (रिटेल स्टोअर) ग्राहकांना विकते. पण अद्ययावत तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या युगात व्यवसाय करण्याच्या पद्धतीसुद्धा आता बदलल्या आहेत. उदाहरणार्थ, बऱ्याच कंपन्या त्यांची उत्पादने किंवा सेवा हे वितरक आणि विक्रेत्यांमार्फत ग्राहकांपर्यंत पोचवतात. मात्र आता वितरक किंवा विक्रेत्यांना बाजूला काढून थेट ग्राहक मिळविण्याचा म्हणजे डायरेक्ट टू कस्टमर (डी२सी) हा तुलनेने नवा पर्याय व्यावसायिकांसमोर आला आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यातले सोपे उदाहरण घेतले तर, आपण किराणा सामान ऑनलाईन मागवतो, किंवा आपल्या पारंपरिक किराणा दुकानवाल्याला व्हाॅट्सअ‍ॅपवर यादी पाठवतो, ऑनलाईन पेमेंट करतो आणि ते घरपोच सामान आणून देतात. आणखी काही वेगळी उदाहरणे द्यायची झाली तर काही कंपन्या या फक्त सरकारी क्षेत्रातील म्हणजे शासकीय टेंडर प्रक्रियेद्वारे मिळविलेली कामे करतात. तर काही कंपन्या या फक्त अन्य कंपन्यांसाठी काम करतात. व्यवसायाच्या या प्रत्येक मॉडेलचे काही फायदे आणि तोटेही असतात.

हेही वाचा… Money Mantra: निकाल वार्ता: दुसऱ्या तिमाहीत टायटनच्या व्यवसायात २० टक्के वाढ

B2B: एका कंपनीने दुसऱ्या कंपनीसाठी उत्पादन किंवा सेवा पुरवली तर त्याला बिझनेस टू बिझनेस (बी२बी) व्यवसायाचे मॉडेल असे म्हटले जाते. कार्यप्रणालीच्या दृष्टीने सोपा, मात्र व्यवसाय मिळविण्याच्या बाबतीत कठीण असा हा पर्याय समजला जातो. उदाहरणार्थ कोणत्याही मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीला सुटे भाग पुरविणारे लघु किंवा मध्यम उद्योग.

B2C: कंपनीकडून उत्पादन किंवा सेवा अंतिम सामान्य ग्राहकाला पुरविण्याच्या पर्यायाला बिझनेस टू कन्झ्युमर (बी२सी) म्हटले जाते. यामध्ये रिटेल स्टोअर, ई-कॉंमर्स वेबसाईट आदी सर्व मार्गांचा समावेश होतो. उदाहरणार्थ एका ब्रँडकडून कपडे घेऊन दुकानाच्या माध्यमातून ग्राहकांना विकणे.

D2C: कोणत्याही मध्यस्थ, वितरक, विक्रेत्याशिवाय कंपनीकडून थेट ग्राहकांना उत्पादन किंवा सेवा पुरविण्याचा पर्याय म्हणजे डायरेक्ट टू कन्झ्युमर (डी२सी). उदाहरणार्थ एखाद्या ब्रँडकडून (विशेषतः नव्याने लाँच झालेल्या) त्यांच्या संकेतस्थळ किंवा अ‍ॅपद्वारे थेट ग्राहकांना कपडे (वा कोणतेही उत्पादन, सेवा) विकणे

B2G: कंपनीकडून थेट सरकारी विभागांना उत्पादन किंवा सेवा पुरविण्याचा पर्याय म्हणजे बिझनेस टू गव्हर्नमेंट (बी२जी). यामध्ये काही निकषांवर होणारी निवड आणि किचकट, वेळखाऊ टेंडर प्रक्रियेचा धोका असतो. उदाहरणार्थ एका कंपनीकडून शासकीय विभागासाठी संकेतस्थळ किंवा सॉफ्टवेअर बनवून देणे, किंवा एखाद्या कंपनीने टेंडर प्रक्रियेद्वारे एखाद्या मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेणे, आदी.

हेही वाचा… Money Mantra: मेडीक्लेम-रिस्टोअर्ड आणि रिचार्ज काय आहे हा पर्याय?

प्रत्येक कंपनी आणि ग्राहकांच्या गरजेनुसार पुरवठा करणाऱ्या व्यवसायांसाठी विविध प्रकारचे बिझनेस मॉडेल्स अस्तित्वात असतात. काळानुरुप हे मॉडेल बदलत आहेत. उदाहरणार्थ एखादी सॉफ्टवेअर कंपनी ही त्यांच्या थेट ग्राहकाला आणि एखाद्या कंपनी ग्राहकाला वेगवेगळ्या किमतीत आणि उत्पादनातील वैशिष्ट्यांमध्ये बदल करून देऊ शकते. थेट वैयक्तिक ग्राहकाला उत्पादन एकाचवेळी संपूर्णपणे विकत घेण्याचे किंवा ठराविक वैशिष्ट्ये मोफत व अन्य वैशिष्ट्यांसाठी शुल्क असे फ्रिमियम मॉडेलही राबवू शकते, तर कंपनी ग्राहकाच्या बाबतीत प्रति महिना सशुल्क सेवा यासारखे मॉडेल राबवू शकते. तसेच, कंपनी ग्राहकामार्फत थेट वैयक्तिक ग्राहकापर्यंत आपले उत्पादन व सेवा पोचवण्याचा पर्याय म्हणजे बिझनेस टू बिझनेस टू कन्झ्युमर (बी२बी२सी) उपलब्ध असू शकतो.

आपल्या व्यवसायासाठी कोणत्या प्रकारचे बिझनेस मॉडेल योग्य आहे हे शोधून काढणे व त्याची अंमलबजावणी करून त्यावर शिक्कामोर्तब करणे हे कोणत्याही स्टार्टअपच्या सुरवातीच्या प्रवासातील पहिला महत्त्वाचा टप्पा समजला जातो. अनेकदा बिझनेस मॉडेल चुकले असल्याचा साक्षात्कार नवउद्योजकांना होतो आणि मग ते मॉडेल बदलून नव्या मॉडेलकडे वळतात. यामध्ये त्यांचा वेळ, पैसा आणि संसाधने वाया जातात, परंतु दीर्घ पल्ल्याचा विचार केल्यास हा बदल सकारात्मकच ठरतो.

Story img Loader