देशात आधार कार्डला एखाद्या व्यक्तीच्या अधिकृत ओळखपत्राचा दर्जा मिळालेला आहे. तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल किंवा तुम्हाला इतर कोणतेही सरकारी काम करायचे असेल, तर तुम्हाला आधार कार्ड कागदपत्र म्हणून जवळ बाळगावे लागते. एवढेच नाही तर आता वैयक्तिक कामातही आधार कार्डचा वापर वाढला आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया UIDAI नागरिकांना आधार कार्डद्वारे पडताळणीसाठी १२ अंकी ओळख क्रमांक दिला आहे. ज्याचा उपयोग लोकांना ओळखण्यासाठी केला जातो, पण तुम्हाला माहीत आहे का? की चार प्रकारचे आधार कार्ड आहेत? म्हणजेच तुम्ही तुमचे आधार कार्ड चार प्रकारे बनवू शकता. UIDAI च्या वेबसाईटनुसार, हे चार प्रकारचे आधार कार्ड वैध आहेत, तर मग आधार कार्डचे चार प्रकार कोणते आहेत? ते जाणून घेऊयात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आधार पत्र

आधार पत्र हे कागदावर आधारित लॅमिनेटेड पत्र आहे, ज्यामध्ये जारी करण्याची तारीख आणि मुद्रित तारखेसह एक कोडदेखील असतो. जर तुम्हाला नवीन आधार बनवायचा असेल किंवा तुमच्या बायोमेट्रिक्समधील कोणतीही माहिती अपडेट करायची असेल, तर हे आधार पत्र विनामूल्य अपडेट करता येते. तुमचे मूळ आधार कार्ड कुठेतरी हरवले असेल तर तुम्ही नवीन आधार कार्ड बनवू शकता. यासाठी तुम्ही UIDAI वेबसाइटवरून ५० रुपये शुल्क देऊन आधार पत्र ऑनलाइन बदलण्याची ऑर्डर देऊ शकता.

हेही वाचाः सरकार आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या सहामाहीत ६.५५ लाख कोटींचे कर्ज घेणार; २० हजार कोटींचे सॉवरेन ग्रीन बॉन्ड जारी करणार

आधार पीव्हीसी कार्ड

हे PVC मटेरिअलपासून बनवलेले आहे. हे आधार कार्ड खूपच हलके असते आणि त्यामध्ये सुरक्षिततेशी संबंधित विविध माहिती दिलेली असते आणि त्यात डिजिटल स्वाक्षरी, आधार सुरक्षित कोड, तसेच फोटो आणि लोकसंख्याशास्त्रीय माहिती असते. आधार पीव्हीसी कार्ड स्पीड पोस्टद्वारे अर्जदाराच्या पत्त्यावर पाठवले जातात. UIDAI वेबसाइटला भेट देऊन तुम्ही व्हर्च्युअल आयडी आणि नावनोंदणीद्वारे ५० रुपये शुल्कासह आधार कार्ड क्रमांक ऑनलाइन मिळवू शकता.

हेही वाचाः आंतरराष्ट्रीय बाजारात साखर महागली, दर १२ वर्षांच्या उच्चांकावर

एम बेस

हे UIDAI द्वारे तयार केलेले अधिकृत मोबाइल अॅप्लिकेशन आहे. या रेकॉर्डमध्ये लोकसंख्याशास्त्रीय माहिती, एक फोटो आणि आधार क्रमांकाचा समावेश आहे, ज्यामध्ये ऑफलाइन पडताळणीसाठी कोडदेखील मिळतो. तुम्ही ते कोणत्याही शुल्काशिवाय डाऊनलोड करू शकता. ते एअर पोर्ट आणि रेल्वेमध्ये आपली ओळख म्हणून कार्य करते. तुम्ही ते eKYC सह शेअर करू शकता, यासाठी देखील वापरले जाऊ शकते.

ई-आधार

ई-आधार हे आधारचे डिजिटल स्वरूप आहे, जे पासवर्डसह संरक्षित आहे आणि त्यात ऑफलाइन पडताळणीसाठी कोड आहे. UIDAI त्यावर डिजिटल स्वाक्षरी करते. तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर वापरून तुम्ही UIDAI वेबसाइटच्या मदतीने तुमचा ई-आधार मिळवू शकता. ई आधार कार्ड शक्य तितक्या लवकर आधार नोंदणी किंवा अपडेट जनरेट करते, जे तुम्ही पूर्णपणे मोफत डाऊनलोड करू शकता.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uidai issues four types of aadhaar cards know the difference between them vrd
Show comments