लोकसभेच्या निकालांच्या अनुषंगाने भांडवल बाजाराचा तोल (बॅलन्स) ढळलेला आपण नुकताच पाहिला. गेल्या दोन-चार वर्षांत मोठ्या जल्लोषात भांडवली बाजारात पदार्पण केलेल्या पिढीला निकालाच्या दिवशी ‘मंदी म्हणजे काय रे भाऊ?’ हा प्रश्न पडलेला. शुक्रवारपर्यंत पुन्हा बाजार सावरला आहे. बाजारात अशा अनपेक्षित घटना घडल्यावर ‘ॲसेट ॲलोकेशन’चा मुद्दा पुन्हा चर्चेत येत असतो. मागील दोन लेखांमध्ये ‘हायब्रिड’ या श्रेणीविषयी माहिती आपण घेतली. या श्रेणीतील ‘बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड’ याविषयीचा आजचा लेख.
गुंतवणूक क्षेत्रात एक प्रचलित वाक्य आहे, ‘डोन्ट कीप ऑल एग्स इन वन बास्केट’. जेव्हा आपण सर्वंकष गुंतवणुकीचा विचार करतो तेव्हा पैसे कोणत्याही एका मालमत्ता वर्गात न ठेवता, एकाहून अधिक आणि परस्परसंबंध नसलेल्या मालमत्ता वर्गात ठेवणे ही एका सुदृढ पोर्टफोलिओची गरज असते. हे मालमत्ता वर्ग म्हणजे समभाग किंवा समभागसलंग्न म्युचुअल फंड, रोखे, सोने अशा अनेक स्वरूपात असू शकतात. प्रत्येक मालमत्ता वर्गाची जोखीम आणि त्यातला परतावा कालपरत्वे बदलत असतो. आपल्या पोर्टफोलिओची एकूण जोखीम कमी करण्यास या मालमत्ता वर्ग-विभागणीमुळे (ॲसेट ॲलोकेशन) मदत होते. तसेच जेव्हा आपण समभागसंलग्न मालमत्ता वर्ग असे म्हणतो, त्यातही पुन्हा देशांर्तगत आणि परदेशी भांडवल बाजारातील गुंतवणूक अशीही पोटविभागणी करता येते. स्थावर मालमत्ता म्हटले, की देशी आणि परदेशी मालमत्ता घेणे अथवा स्थावर मालमत्ता या संकल्पनेवर आधारित म्युचुअल फंड घेणे अशीही फोड करता येते. आपण पाहिले तर दरवर्षी निफ्टी ५० आणि १० वर्षीय भारतीय रोखे आणि सोने अशा मालमत्ता वर्गांचा परतावा वेगवेगळा असतो. या तीनही मालमत्ता वर्गाचे डायनामिक्स (चलनशास्त्र) विभिन्न आहेत. मालमत्ता वर्ग विभागणी ही आपली जोखीम-परतावा गुणोत्तर सुधारण्यासाठी केली जाते. मालमत्ता वर्ग विभागणीचा हा विचार हा गुंतवणुकीच्या आधीचा विचार असला पाहिजे.
हेही वाचा…बदलत्या अर्थगतीचा लाभार्थी: टाटा बँकिंग ॲण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस फंड
मालमत्ता वर्ग विभागणी ही दोन प्रकारे करता येते.
स्ट्रॅटेजिक ॲसेट ॲलोकेशन : दीर्घकालीन गुंतवणूक उद्दिष्टांसाठी याचा उपयोग केला जातो. यात गुंतवणूकदाराच्या वयानुसार मालमत्ता वर्ग विभागणी केली जाते. तरुणांसाठी मुख्यत्त्वे समभागसंलग्न गुंतवणूक सुचवली जाते आणि जसे वय वाढते त्याप्रमाणे रोखे गुंतवणुकीला प्राधान्य दिले जाते. त्याचबरोबरीने जोखीम क्षमतेनुसारसुद्धा गुंतवणूक केली जाते.
टॅक्टिकल ॲसेट ॲलोकेशन : ‘गुड पोसिशन्स डोन्ट विन गेम्स, गुड मूव्हस डू’ या प्रमाणे काही विशिष्ट काळात (छोटया कालावधीत) कोणत्या मालमत्ता वर्गात पैसे गुंतवल्यास जास्त फायदा मिळू शकेल, याचा विचार करून गुंतवणूक केली जाते. अशा प्रकारच्या मालमत्ता वर्ग विभागणीत आपल्या पोर्टफोलिओचा वार्षिक आढावा आणि मालमत्ता वर्ग पुनर्संतुलनाचे खूप महत्त्व आहे.
हा पोर्टफोलिओ पुनर्संतुलनाचा धागा पकडून आपण आता ‘बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड’ या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीच्या एका बहुचर्चित श्रेणीबद्दल जाणून घेऊया. ‘सेबी’च्या २०१७ च्या परिपत्रकानुसार ‘डायनॅमिक ॲसेट ॲलोकेशन’ म्हणजेच ‘बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड’ फंडांची सुरुवात झाली. एप्रिल २०२४ अखेरीस उपलब्ध माहितीनुसार, गुंतवणूकदारांनी (४६ लाख फोलिओ) साधारणतः २,५६,२३७ कोटी रुपये ‘बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड’ या श्रेणीमध्ये गुंतवलेले आहेत. नावाप्रमाणेच या फंडात ‘डायनॅमिक ॲसेट ॲलोकेशन’ केले जाते, म्हणजेच जेव्हा भांडवली बाजार तेजीत असतो, तेव्हा समभाग गुंतवणूक कमी आणि भांडवली बाजार पडलेला असतो (उदाहरणार्थ मार्च २०२०) तेव्हा समभागात सर्वात जास्त गुंतवणूक अशी गुंतवणुकीची पद्धत असते. म्हणजेच फंड व्यवस्थापक ‘पोर्टफोलिओ पुनर्रसंतुलना’चे काम आपल्या वतीने करत असतात. परिणामी ‘समभागसंलग्न’ (प्युअर इक्विटी) योजनेपेक्षा ‘बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंडा’त पोर्टफोलिओमधील एकूण जोखीम कमी राहते. प्रत्येक ‘बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड’ काही विशिष्ट साच्यानुसार ‘नेट इक्विटी’ नंबर ठरवत असते ( ग्रॉस इक्विटी – आर्बिट्राज), परंतु त्यात हे पाहिले जाते की, ‘टोटल इक्विटी’ ६५ टक्क्यांपेक्षा जास्त राहील, जेणेकरून कर आकारणी ‘इक्विटी’प्रमाणे होईल. जेव्हा भांडवली बाजार तेजीत असतो, तेव्हा इक्विटी मधील ‘हेजिंग’ वाढवले जाते, त्याचबरोबरीने रोख्यांमधील प्रमाण वाढवले जाते.
हेही वाचा…Money Mantra: आर्थिक व्यवहारात तोटा झाल्यास उत्पन्नातून कसा वजा करता येतो?
‘बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंडा’त ‘नेट इक्विटी’ नंबर ठरवताना सर्वसाधारणपणे मूल्यांकनावर आधारित गुणोत्तर (पीई, पीबी) तसेच बाजाराचा कल पाहून फंड व्यवस्थापकांकडून निर्णय घेतला जातो. वाचकांसाठी फंडांची काही उदाहरणे देत आहे. मे २०२४ रोजी, ३ वर्षाचा इतिहास बघितला तर एचडीएफसी बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज, आयसीआयसीआय बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज, एडलवाईज बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज या फंडांनी अनुक्रमे २३.५८ टक्के, १२.४५ टक्के, १२.६६ टक्के असा वार्षिक परतावा दिला आहे. प्रत्येक फलंदाजाची शैली वेगवेगळी असते, पण उद्दिष्ट सामना जिंकणे हेच असते. त्याचप्रमाणे आपण फंडांचा विचार केला तर? मुख्यत्त्वे हे फंड ‘व्हॅल्युएशन आणि मोमेंटम’ या घटकांच्या आधारे वेगवेगळ्या पद्धतीने चालवले जातात. बाजाराच्या प्रत्येक पातळीला नेट इक्विटी गुंतवणूक किती करावी याचे उत्तर फंड व्यवस्थापक शोधत असतो. या श्रेणीत फंडाची इक्विटीमधील गुंतवणूक करताना लार्ज कॅप समभागांना प्राधान्य दिलेले आढळते.
हेही वाचा…कर्मचारी समभाग मालकी योजना (ईसॉप) आणि करपात्रता
जर आपली सर्व गुंतवणूक पारंपरिक गुंतवणूक साधनांमध्ये असेल तर त्यातील छोटासा भाग तुम्ही ‘बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंडा’त गुंतवून सुरुवात करू शकता. दीर्घकालावधीत पारंपरिक गुंतवणूक साधनांपेक्षा जास्त परतावा देण्याची क्षमता यात नक्कीच आहे.