कंपनीच्या कर्मचाऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी कर्मचारी समभाग मालकी योजना (ईसॉप) अस्तित्वात आली. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना समभागाच्या माध्यमातून कंपनीची मालकी दिली जाते. या योजनेत कंपनी, समभाग हे मोफत किंवा अल्पदराने वितरित करते. कर्मचाऱ्याला या योजनेत दोन टप्प्यांत कर भरावा लागतो. कर्मचारी जेव्हा हा पर्याय निवडतो तेव्हा पहिल्यांदा आणि या समभागाची विक्री करतो तेव्हा दुसऱ्यांदा कर भरावा लागतो. पहिल्या टप्प्यात ज्या दिवशी हा पर्याय निवडला जातो, त्या दिवसाचे बाजारमूल्य आणि कर्मचाऱ्याने दिलेली रक्कम या दोन्हीच्या फरकाएवढी रक्कम कर्मचाऱ्याचा लाभ (परक्विझिट) म्हणून समजले जाते. त्यावर त्याला कर भरावा लागतो. यावर कंपनी उद्गम कर (टीडीएस) सुद्धा कापते.

पात्र नवउद्यमीकडून (स्टार्ट-अप) ईसॉप प्राप्त करणाऱ्या कर्मचाऱ्याला पर्याय निवडीच्या वर्षात कर भरण्याची गरज नाही. वरील कर खालीलपैकी घटना घडण्याच्या (जी घटना आधी घडेल) १४ दिवसात भरता येतो.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?

हेही वाचा…‘सरफेसी’ कायदा आणि गैरवापर (भाग २)

१. ज्या वर्षी या योजनेअंतर्गत समभाग वितरित केले, त्या वर्षीचे करनिर्धारण वर्ष संपल्यानंतर ४८ महिन्यांत

२. कर्मचाऱ्याने समभागाची विक्री केल्यास
३. कर्मचाऱ्याने त्या कंपनीची नोकरी सोडल्यास

दुसऱ्या टप्प्यात कर्मचारी जेव्हा ईसॉपअंतर्गत वाटप केलेल्या समभागाची विक्री करतो तेव्हा होणारा नफा भांडवली नफा या उत्पन्नाच्या स्त्रोतात करपात्र असतो.

प्रश्न : मी एका कंपनीत नोकरी करतो. आमची कंपनी शेअरबाजारात सूचिबद्ध आहे. मला आमच्या कंपनीने कर्मचारी समभाग मालकी योजनेअंतर्गत समभाग १ सप्टेंबर, २०२२ मध्ये देऊ (एक्सरसाईज) केले. या योजनेअंतर्गत समभागाचे वाटप (अलॉटमेंट) १ ऑक्टोबर, २०२२ मध्ये घेतले. कंपनीने बाजारभाव आणि ज्या भावाने मी समभाग विकत घेतले याच्या फरकाची रक्कम माझ्या उत्पन्नात जोडून त्यावर उद्गम करसुद्धा कापला. आता हे समभाग मला विकायचे आहेत. मला या विक्रीवर कर भरावा लागेल का?

-एक वाचक

उत्तर : आपली संपत्ती अल्पमुदतीची आहे की दीर्घमुदतीची हे ठरविण्यासाठी ज्या दिवशी समभागाचे वाटप झाले त्या दिवसापासून ते समभागाची विक्री करेपर्यंतचा कालावधी हा विचारात घ्यावा. ज्या दिवशी समभाग देऊ (एक्सरसाइज) केले ही तारीख यासाठी महत्त्वाची नाही. आपल्याला समभाग १ ऑक्टोबर, २०२२ रोजी मिळाले आणि आता जून, २०२४ मध्ये विकल्यास ही संपत्ती दीर्घ मुदतीची होते. ज्या दिवशी समभाग देऊ केले, त्या तारखेचे (म्हणजेच १ सप्टेंबर २०२२) योग्य बाजार मूल्य हे संपादन मूल्य (खरेदी मूल्य) आणि ज्या मूल्याला विक्री केली ते मूल्य विचारात घेऊन त्या समभागाच्या विक्रीवरील भांडवली नफा गणावा लागेल. हे समभाग शेअरबाजारातर्फे विकल्यास (म्हणजेच त्यावर एसटीटी भरला गेला असल्यास), प्रथम १ लाख रुपयांच्या दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागणार नाही. आणि या पुढील रकमेवर १० टक्के दराने कर भरावा लागेल.

हेही वाचा…ई-मेल घोटाळा

प्रश्न : मी एका कंपनीत नोकरी करतो. माझे मुंबई आणि नाशिकमध्ये घर आहे. दोन्ही घरांवर मी गृह कर्ज घेतले आहे. मुंबईतील माझे राहते घर आहे आणि नाशिकचे घर मी भाड्याने दिले आहे. मला दरमहा १०,००० रुपये भाडे मिळते. मुंबईतील घराच्या गृहकर्जावर २०२३-२४ या आर्थिक वर्षात मी २,२५,००० रुपये व्याज भरले आणि नाशिक येथील घराच्या गृहकर्जावर १,५०,००० रुपये व्याज भरले. मुंबईच्या घरावर मी १२,००० आणि नाशिकच्या घरावर ८,००० रुपये मालमत्ता कर भरला आहे. मी नवीन करप्रणाली स्वीकारल्यास मला या गृहकर्जावरील व्याजाची वजावट मिळेल का?

-प्रकाश शिंदे
उत्तर : नवीन करप्रणालीनुसार राहत्या घरावरील गृहकर्जाच्या व्याजाची वजावट मिळत नाही. राहत्या घराचे घरभाडे शून्य असल्यामुळे मालमत्ता कराची आणि ३० टक्के प्रमाणित वजावट देखील मिळत नाही. जे घर भाड्याने दिले आहे, त्या घराच्या गृहकर्जाच्या व्याजाची, मालमत्ता कराची आणि प्रमाणित वजावट आपण नवीन करप्रणाली स्वीकारली तरी घेऊ शकता. नाशिकच्या घराचे करपात्र उत्पन्न असे गणावे लागेल : वार्षिक उत्पन्न १,२०,००० (दरमहा १०,००० रुपये) वजा मालमत्ता कर ८,००० रुपये, ३० टक्के प्रमाणित वजावट ३३,६०० रुपये, गृह कर्जाच्या व्याजाची वजावट १,५०,००० रुपये असा ७१,६०० रुपयांचा तोटा (१,१२,००० वजा ८,००० वजा ३३,६०० वजा १,५०,००० रुपये) असेल. करदात्याने नवीन करप्रणाली स्वीकारल्यास हा तोटा त्याला इतर उत्पन्नातून वजा करता येणार नाही. करदात्याने जुनी करप्रणाली स्वीकारल्यास त्याला मुंबईच्या घराच्या गृहकर्जावरील व्याजाची २,००,००० रुपये (राहत्या घरासाठी कमाल मर्यादा २,००,००० रुपये) वजावट घेतल्यानंतर २,००,००० तोटा आणि नाशिकच्या घरावर झालेला ७१,६०० रुपयांचा तोटा असा २,७१,६०० रुपयांचा तोटा झाला असता. यापैकी २ लाख रुपयांचा तोटा इतर उत्पन्नातून वजा करता आला असता आणि बाकी ७१,६०० रुपयांचा तोटा पुढील वर्षासाठी कॅरी-फॉरवर्ड करता आला असता.

हेही वाचा…म्युच्युअल फंडांद्वारेच चक्रवाढ लाभाची किमया शक्य

प्रश्न : माझी बदली मुंबईला झाली आणि मी भाड्याच्या घरात राहतो. दरमहा मी ७५,००० रुपये भाडे देतो. माझा भाड्याचा एक वर्षाचा करारनामा १ मे २०२४ पासून सुरू झाला. मला या भाड्यावर उद्गम कर कापावा लागेल का? आणि कापल्यास तो कधी भरावा लागेल?

-वसंत कदम
उत्तर : वैयक्तिक करदाते आणि हिंदू अविभक्त कुटुंब (एच.यू.एफ.) हे कोणत्याही व्यक्तीला दरमहा ५०,००० रुपयांपेक्षा जास्त भाडे देत असतील तर त्यांना उद्गम कराच्या तरतुदी (कलम १९४-आयबी) लागू होतात. घरभाडे या मर्यादेपेक्षा जास्त असल्यामुळे आपल्याला उद्गम कर कापावा लागेल. आपला भाड्याचा करार १ मे, २०२४ पासून सुरू झाला आणि ३० एप्रिल, २०२५ रोजी संपेल. घराचे भाडे प्रतिमहिना ७५,००० रुपयानुसार २०२४-२५ या आर्थिक वर्षात दिलेल्या भाड्यावर म्हणजे ८,२५,००० रुपयांवर (मे, २०२४ ते मार्च, २०२५ असे ११ महिने) ५ टक्के दराने ४१,२५० रुपये उद्गम कर ३१ मार्च, २०२५ ला कापावा लागेल. दुसऱ्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२५-२६ या वर्षात त्याचा करार ३० एप्रिल, २०२५ रोजी संपतो त्यामुळे त्याला ३० एप्रिल, २०२५ रोजी त्या आर्थिक वर्षात दिलेल्या भाड्याचा, म्हणजेच ७५,००० रुपयांवर ५ टक्के दराने ३,७५० रुपये उद्गम कर कापावा लागेल. घर मालकाकडे पॅन नसेल तर त्या व्यक्तीला २० टक्के दराने उद्गम कर कापावा लागेल. ज्या महिन्यात उद्गम कर कापला आहे तो महिना संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत हा उद्गम कर आपल्याला फॉर्म २६ क्यूसीमध्ये चलन भरून तो सरकारकडे जमा करावा लागतो. आपण निवासी भारतीयाला घरभाडे दिल्यास टॅक्स डीडक्शन क्रमांक (टॅन) घेणे गरजेचे नाही.

हेही वाचा…लोहपोलाद क्षेत्र: चढउतार, व्यवसाय संधी आणि गुंतवणूक

प्रश्न : मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. मला निवृत्ती वेतन, व्याजाचे आणि गुंतवणुकीचे उत्पन्न मिळते. माझे वार्षिक करदायित्व एकूण ६०,००० रुपये आहे आणि माझ्या उत्पन्नावर २०,००० रुपयांचा उद्गम कर कापला जातो. मला अग्रिम कर भरावा लागेल का?

-संजय दळवी
उत्तर : ज्या करदात्यांचे एकूण करदायित्व १०,००० रुपयांपेक्षा जास्त (उद्गम कर आणि गोळा केलेला कर, टीसीएस वजा केल्यानंतर) असेल त्यांना अग्रिम कराच्या तरतुदी लागू होतात. जे करदाते निवासी भारतीय आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांच्या उत्पन्नात “उद्योग-व्यवसायाच्या” उत्पन्नाचा समावेश नाही अशांना अग्रिम कराच्या तरतुदी लागू होत नाहीत. आपण निवासी भारतीय आहात असे गृहीत धरल्यास आपले करदायित्व उद्गम कर वजा जाता ४०,००० (६०,००० वजा २०,००० रुपये उद्गम कर) असले तरी आपण ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे आणि आपल्या उत्पन्नात “उद्योग-व्यवसायाच्या” उत्पन्नाचा समावेश नसल्यामुळे आपल्याला अग्रिम कर भरावा लागणार नाही.

pravindeshpande1966@gmail.com