भारतातील सर्वात मोठी एसएफबी असलेल्या एयू स्मॉल फायनान्स बँकेने (AU SFB) अतिशय अभिमानाने गुंतवणकदारांसाठी आपली पहिली हरित मुदत ठेव योजना ‘प्लॅनेट फर्स्ट-एयू ग्रीन फिक्स्ड डिपॉझिट(Planet First-AU Green Fixed Deposit)’ या नावाने आणली आहे. सौर ऊर्जा, इलेक्ट्रिक मोबिलिटी यासह अक्षय आणि हरित प्रकल्प आदींना पाठबळ देण्याकरिता या योजनेचे संपूर्ण संकलन वाटप करण्याच्या दृष्टिकोनातून तिची खास रचना करण्यात आलेली आहे. नियामक मार्गदर्शनाच्या चौकटीत अशी रिटेल उत्पादने टप्पाटप्प्यात सादर करत शाश्वत बदल प्रक्रियेमध्ये योगदान देण्यासाठी एयू एसएफबी चांगले कार्य करते आहे.
हरित मुदत ठेव पॉलिसी आणि रचना एयू एसएसबीच्या हवामान कृतीविषयक हेतूला पूरक ठरणारी आहे. या नवीने योजनेचे धोरण आणि रचना बँकेच्या मंडळाने मंजूर केले आहे आणि अनिवार्य आवश्यकतांनुसार तृतीय पक्षाद्वारे (थर्ड पार्टी) त्याचे बाह्य पुनरावलोकन केले जाणार आहे. हरित मार्गाद्वारे निधीचा पुरवठा तसेच हरित मालमत्तेसाठी कर्जपुरवठा करणे या प्रक्रिया एयू एसएफबीच्या शाश्वततेवरील प्रयत्नांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘कायमस्वरुपी’ प्रवासात ‘बदल’ प्रतिबिंबित करण्यासाठी सतत विकसित होत राहणार आहे.
द प्लॅनेट फर्स्ट – एयू ग्रीन फिक्स्ड डिपॉझिट ८.५० टक्क्यांपर्यंत आकर्षक व्याजदर देते. या मुदत ठेवीसाठी केवळ ५ हजार रुपयांच्या किमान गुंतवणुकीची आवश्यकता आहे. ही नवीन योजना एयू एसएफबीच्या विद्यमान आणि नवीन ग्राहकांना व्हिडीओ बँकिंग, एयू ०१०१ अॅप, नेटबँकिंगद्वारे अथवा त्यांच्या नजीकच्या एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या शाखांना भेट देऊन तेथे त्यांची हरित मुदत ठेव योजना सोयीस्करपणे करता येऊ शकते. ऑक्टोबरच्या शेवटच्या बुधवारी या हरित मुदत ठेव योजनेचा शुभारंभ केला जात आहे, कारण हा दिवस ‘शाश्वतता दिवस’ अर्थात sustainability day म्हणून ओळखला जातो.
ग्राहक त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांच्या अनुरूप मुदत ठेवीच्या कालावधीची निवड करू शकतात. यात दोन वर्षांच्या अल्प कालावधीपासून दीर्घकालीन मुदतीचे पर्याय आहेत. प्लॅनेट फर्स्ट – एयू ग्रीन फिक्स्ड डिपॉझिट ग्राहकांना त्यांच्या रोखतेचा प्रवाह प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी विविध व्याजांचे पर्यायसुद्धा उपलब्ध करून देते. त्यात मासिक, त्रैमासिक आणि संचयी (परिपक्वतेवर) यासह विविध व्याज देय पर्याय आहेत. तसेच ग्राहकांना त्यांच्या निधीच्या वापराबाबत आणि प्लॅनेट फर्स्ट – एयू ग्रीन फिक्स्ड डिपॉझिटद्वारे समर्थित हरित प्रकल्पांच्या प्रगतीबाबत नियमित माहिती प्रदान केली जाणार आहे. थोडक्यात प्रत्येक टप्प्यावर त्यांना परिपूर्ण माहितीच्या आधारे अद्ययावत केले जाणार आहे.
भारतीय बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य वाटचाल या दृष्टिकोनातून ही देशातील एक अग्रगण्य हरित मुदत ठेव योजना आहे आणि ती भारतीय रिझर्व्ह बँके (RBI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सादर करण्यात आलेली आहे. त्यामुळे या मुदत ठेवीतील संकलित निधी ऊर्जा कार्यक्षमता वाढविणे, कार्बन उत्सर्जन आणि हरितगृह वायू कमी करणे, हवामानाची लवचिकता आणि अनुकूलन वाढवणे, नैसर्गिक परिसंस्था आणि जैवविविधतेचे रक्षण करणे तसेच समृद्ध करणे आदी उपक्रम आणि कार्यांमध्येच वापरणे अनिवार्य करते. या निधीचा उपयोग संपूर्ण भारतात केला जाणार आहे. तसेच ग्रामीण भारतातील हरित प्रकल्पांवरसुद्धा काही प्रमाणात लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
नवीन योजनेच्या शुभारंभप्रसंगी बोलताना एयू स्मॉल फायनान्स बँकेचे एमडी आणि सीईओ संजय अग्रवाल म्हणाले, “२१ व्या शतकातील जग आणि अर्थव्यवस्थेसमोरील सर्वात गंभीर आव्हानांपैकी एक म्हणून हवामानातील बदल मान्य करण्यात आलेला आहे आणि कॉप २७ (कन्फेडरेशन ऑफ पार्टीज) बैठकीमध्ये निव्वळ शून्य लक्ष्यासाठी आपली वचनबद्धता प्रकट करत भारत सरकारने हवामान नियंत्रण बदलामध्ये आघाडीची भूमिका घेतली आहे. हरित मुदत ठेव योजनांसाठी खास रचना तयार करणाऱ्या जगातील पहिल्या काही नियामकांपैकी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) एक आहे. ‘पर्यावरण’ हा महत्त्वाचा भागधारक ओळखून एयूने अलीकडेच संचालक मंडळाच्या शाश्वतता समितीच्या मार्गदर्शनाखाली आणि या समितीत शाश्वततेच्या क्षेत्रामधील तज्ज्ञ वरिष्ठ मंडळ सदस्य आणि कार्यकारी अधिकारी यांचा समावेश करून आमच्या शाश्वततेसंदभातील उपक्रमांना पाठबळ दिले आहे. पृथ्वीला आमच्या विचारांमध्ये आणि कृतींमध्ये सदैव अग्रभागी ठेवणे आणि G 20च्या वन अर्थ, वन फॅमिली आणि वन फ्युचर या अगदी अलीकडील उपक्रमाच्या लोकनीतीला आणखी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू आहे, असंही त्यांनी स्पष्ट केले.