युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने ३० आणि ३१ जानेवारीला संप करणार असल्याचे जाहीर केले आहे. बँक कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ५ दिवस वर्किंग असावे, यासह इतर मागण्यांसाठी हा संप केला जाणार आहे.
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी सीएच वेंकटचलम यांनी या संपाबाबत सांगितले, “आमच्या मागणी करणाऱ्या पत्राला ‘इंडियन बँक असोसिएशन’ (IBA) कडुन कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यासाठी ३० आणि ३१ जानेवारीला संप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
५ दिवसांचा वर्किंग वीक या मागणीसह पेन्शन मध्ये अपडेशन आणि आणखी काही मागण्यांसाठी हा संप केला जाणार आहे. संप असणाऱ्या दिवशी म्हणजेच ३० आणि ३१ जानेवारीला बँका बंद असतील.