आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी आयटीआर (Income Tax Return) भरण्याची शेवटची तारीख वाढवण्याबाबतची माहिती समोर आली आहे. यंदा ITR दाखल करण्याची अंतिम तारीख वाढवण्याची सरकारची कोणतीही योजना नाही.आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये कमावलेल्या उत्पन्नासाठी ITR दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे.तसेच यंदा ITR भरण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर आहे. ३१ डिसेंबर ही तारीख त्यांच्यासाठी जे करदाते विलंब शुल्कासह विलंबित ITR दाखल करणार आहेत. मात्र, ३१ जुलैपर्यंत आयटीआर भरण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. त्यामुळे पात्र करदात्यांनी ३१ जुलै रोजी किंवा त्यापूर्वी त्यांचे विवरणपत्र भरावे, अशी शिफारस करण्यात आली आहे.
७ जुलैपर्यंत दाखल केलेल्या रिटर्नची संख्या गेल्या वर्षी याच कालावधीत दाखल केलेल्या आयटीआरपेक्षा जास्त आहे. ज्या करदात्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक नाही, त्यांनी लवकरात लवकर त्यांचे विवरणपत्र भरावे, असंही गेल्या आठवड्यात महसूल सचिव संजय मल्होत्रा म्हणाले होते. अर्थ मंत्रालय ३१ जुलैची मुदत वाढविण्याचा विचार करत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.१७ जुलैपर्यंत २.८ कोटींपेक्षा जास्त ITR दाखल झाले आहेत.
हेही वाचाः यूट्यूबवरच्या कमाईवरही आता इन्कम टॅक्स विभागाचा डोळा; पै न् पैचा हिशेब ठेवा अन्यथा…
ई-फायलिंग वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, १७ जुलैपर्यंत २.८८ कोटी प्राप्तिकर रिटर्न भरले गेले. प्राप्तिकर विभागाने १.३ कोटींहून अधिक रिटर्न भरले असल्याची माहिती दिली. २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी १७ जुलैपर्यंत १.३३ कोटी रिटर्नची पडताळणी प्रक्रिया करण्यात आली होती. करदात्यांनी २.६ कोटींहून अधिक परताव्यांची पडताळणी केली आहे. प्राप्तिकर विभागाच्या डेटावरून असे दिसून आले आहे की, १६ जुलैपर्यंत २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी १.२ कोटी रिटर्न्सची पडताळणी सुरू आहे. डेटानुसार, १,२०,८३,०७६ रिटर्नची खातरजमा करण्यात आली होती. वेबसाइटवरच्या डेटानुसार २,७३,१२,४३४ जणांचे इन्कम टॅक्स रिटर्न प्रक्रियेत आहेत.
तुम्ही ३१ जुलैपूर्वी आयटीआर का भरला पाहिजे?
३१ जुलैच्या अंतिम मुदतीपूर्वी आयटीआर भरण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे करदात्यांना शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यास मदत होतेच, तसेच रिफंडच्या जलद प्रक्रियेतही मदत होते. यावर्षी अनेक करदात्यांना त्यांचा परतावा मिळाला आहे.