Credit Card Link To UPI: युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI पेमेंट्स (UPI Payments) हा आजकाल डिजिटल व्यवहाराचा सर्वात सोपा मार्ग बनला आहे. याद्वारे कोणतीही व्यक्ती सहजपणे कुठेही पेमेंट करू शकते. ही पेमेंट पद्धत डिजिटायझेशनला चालना देण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरते आहे. या पद्धतीत आपण काही सेकंदात पैसे ट्रान्सफर करू शकतो. त्यामुळे आता तुम्ही क्रेडिट कार्डद्वारेही UPI पेमेंट करू शकता. आतापर्यंत लोक फक्त डेबिट कार्डद्वारे UPI पेमेंट करत होते. क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी निवडक UPI सक्षम अॅप्स जसे की, BHIM, Paytm, PhonePe द्वारे वापरली जाऊ शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोणत्या बँकेच्या क्रेडिट कार्डने तुम्ही UPI पेमेंट करू शकता?

अॅक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक आणि कॅनरा बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना ही सुविधा मिळाली आहे. या बँकांचे कार्डधारक त्यांचे कार्ड UPI अॅप्सशी लिंक करू शकतात. त्यानंतर ते क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करू शकतील.

हेही वाचाः विश्लेषण: जपान शेअर बाजाराचा ३३ वर्षांतील सर्वोच्च उच्चांक; भारतासाठी शुभ संकेत

क्रेडिट कार्ड कसे लिंक करावे?

>> क्रेडिट कार्ड UPI शी लिंक करण्यासाठी तुम्हाला काही टप्प्यांचं पालन करावं लागेल.
>> सर्वप्रथम तुम्हाला BHIM, PhonePe, Paytm, Mobikwik सारखे डिजिटल पेमेंट अॅप डाऊनलोड करावे लागेल.
>> यानंतर तुम्हाला या अॅप्समध्ये तुमचा तपशील टाकून लॉग-इन करावे लागेल, म्हणजेच तुम्हाला या अॅप्समध्ये नोंदणी करावी लागेल.
>> या अॅप्समध्ये कोणतेही नोंदणी शुल्क किंवा इतर शुल्क नाही.
>> नोंदणी केल्यानंतर तुम्हाला पेमेंटसाठी तुमची बँक निवडावी लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाइलवरून लिंक केलेले क्रेडिट कार्ड निवडावे लागेल, जे तुम्हाला UPI पेमेंटशी लिंक करायचे आहे.
>> यानंतर तुम्हाला UPI पिन जनरेट करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला क्रेडिट कार्ड खात्यामधून तुमचे क्रेडिट कार्ड निवडावे लागेल.
>> तुम्ही तुमचा UPI पिन सेट करण्याचा पर्याय निवडाल, त्यानंतर तुम्ही तुमच्या कार्डचे शेवटचे ६ अंक आणि त्याची एक्सपायरी तारीख टाकाल.

हेही वाचाः रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मोदी सरकारला ८७,४१६ कोटी रुपये देणार

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upi payments can now be made with credit cards too know the complete process in 5 steps vrd