UPI in India : देशातील UPI व्यवहार झपाट्याने वाढत आहेत. २०२३ च्या शेवटच्या महिन्यात देखील UPI व्यवहारांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. एका महिन्यात १८.२३ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झालेत. हे २०२२ च्या याच महिन्याच्या तुलनेत सुमारे ५४ टक्के अधिक आहेत. तसेच २०२३ मध्ये एकूण UPI व्यवहारांची संख्या १०० अब्जांपेक्षा जास्त आहे. त्यांच्यामार्फत १८२ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झालेत. २०२२च्या तुलनेत ४४ टक्के वाढ झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचाः हिंडेनबर्ग प्रकरणात SC च्या निकालानंतर गौतम अदाणींची पहिली प्रतिक्रिया; ”सत्यमेव जयते…”

डिसेंबरमध्ये १२.०२ अब्ज रुपयांचे व्यवहार झालेत

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार, UPI व्यवहार ४४ टक्क्यांनी वाढून सुमारे ११८ अब्ज झाले आहेत. एकट्या डिसेंबरमध्ये १२.०२ अब्ज व्यवहार झालेत, जे डिसेंबर २०२२च्या तुलनेत ४२ टक्के अधिक आहेत. UPI व्यवहारांमध्ये नोव्हेंबरमध्ये १७.४० लाख कोटी रुपये आणि ऑक्टोबरमध्ये १७.१६ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झालेत. नोव्हेंबरमध्ये एकूण UPI व्यवहार ११.२४ अब्ज आणि ऑक्टोबरमध्ये ११.४१ अब्ज होते.

हेही वाचाः हिंडेनबर्गच्या अहवालावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, ”सेबीवरच आमचा विश्वास, SIT च्या तपासाला नकार”

ऑगस्ट २०२३ मध्ये प्रथमच १० अब्ज व्यवहार झाले

NPCI च्या मते, २०२२ मध्ये ७४ अब्ज UPI व्यवहार झाले होते, तर २०२३ मध्ये हा आकडा ६० टक्क्यांनी वाढून ११८ अब्ज व्यवहार झाले. ऑगस्ट २०२३ मध्ये UPI ने प्रथमच १० अब्ज व्यवहारांचा आकडा पार केला. यानंतर त्यात सातत्याने वाढ होत आहे. २०२३ मध्ये UPI च्या माध्यमातून एकूण १८२ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झालेत. २०२२ मध्ये UPI द्वारे १२६ लाख कोटी रुपयांचे पेमेंट करण्यात आले.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upi transactions record upi transaction record has crossed 100 billion mark in 2023 vrd