कौस्तुभ जोशी

· फंड घराणे – युटीआय म्युच्युअल फंड

public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
rbi monetary policy rbi keeps repo rates unchanged reserve bank predicts rising inflation
व्याज दरकपात नाहीच!‘जीडीपी’वाढीच्या अपेक्षांना कात्री; महागाईचा ताप चढण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज
bitcoin price review bitcoin prices got a boost reaches 100000 usd
विश्लेषण : ‘बिटकॉइन’ पोहोचले १ लाख डॉलरवर… का आणि कसे? भारतात मान्यता मिळेल?
how to tackle food inflation causes of food inflation measures to control food inflation
अन्नधान्याची महागाई रोखणार कशी?
epfo investment corpus doubles to rs 24 75 lakh crore in 5 years
‘ईपीएफओ’ची समभागसंलग्न गुंतवणूक २४.७५ लाख कोटींवर

· फंडाचा प्रकार – इक्विटी फंड

· फंड कधी लॉन्च झाला ? – १५ ऑक्टोबर १९८६.

· एन. ए. व्ही. (३ जानेवारी २०२४ रोजी) ग्रोथ पर्याय – २३१ रुपये प्रति युनिट

· फंड मालमत्ता (३१ डिसेंबर २०२३ रोजी ) – १२२३० कोटी रुपये.

· फंड मॅनेजर्स – कार्तिकराज लक्ष्मणन.

फंडाची स्थिरता (३१ डिसेंबर २०२३ )

· पोर्टफोलिओ टर्नओव्हर ०.२०

· स्टॅंडर्ड डिव्हिएशन १३.८८ %

· बीटा रेशो ०.९४ %

पोर्टफोलिओ टर्नओव्हर म्हणजे एखाद्या फंड मॅनेजरने फंड योजनेमध्ये शेअरची सतत खरेदी विक्री खरेदी सुरू ठेवणे. जेवढे जास्त खरेदी विक्री व्यवहार घडतील तेवढाच फंडाचा खर्च वाढतो. पोर्टफोलिओ टर्नओव्हर जास्त असणे फारसे चांगले मानले जात नाही.

हेही वाचा : ‘बिझनेस लोन’ हे आव्हान का आहे? (भाग पहिला)

स्टॅंडर्ड डिव्हिएशन म्हणजेच एखाद्या फंडाचा परतावा गेल्या तीन वर्षात किती स्थिर राहिला आहे त्याचे निर्दशक आहे. म्हणजेच दोन फंडाची तुलना करता ज्या फंडाचा हा आकडा कमी आहे तो फंड साधारणतः पुढील काळात दुसऱ्या फंडापेक्षा तसेच परतावे देण्याची शक्यता आहे उदाहरण घेऊया फंड X आणि फंड Y यांनी १२% परतावा मागच्या पाच वर्षात दिला आहे. जर स्टॅंडर्ड डिव्हिएशनचा फंड X चा आकडा Y पेक्षा कमी असेल तर फंड X पुढील काळात तसाच सर्वसाधारण परतावा देऊ शकतो तर, फंड Y मधून मिळणारा परतावा बदलू शकतो.

बीटा म्हणजेच गेल्या तीन वर्षात फंडाने दिलेल्या परताव्यावरून भविष्यात तो फंड किती वर किंवा खाली जाईल याचा अंदाज लावणे, जेवढी बीटा व्हॅल्यू कमी असेल तेवढाच फंड भरवशाचा.

शार्प रेश्यो म्हणजे अधिक रिटर्न्स मिळवण्यासाठी फंडाने किती जोखीम घेतली आहे, अधिकाधिक रिटर्न मिळवण्यासाठी फंड मॅनेजरने घेतलेली जोखीम अधिक असेल तर त्याचे प्रतिबिंब यामध्ये उमटते.

हेही वाचा : Money Mantra: बँक लॉकर- किल्ली हरवली तर? डिपॉझिट भरावे लागते का?

तुमच्यासाठी हा फंड महत्त्वाचा का ?

भारतातील सगळ्यात जुना फंड असे ज्याचे वर्णन करता येईल असा हा फंड आहे. उदारीकरणापूर्वीच्या काळात बाजारात आलेल्या या फंडाला जुने गुंतवणूकदार यूटीआय मास्टर शेअर फंड या नावाने या नावाने ओळखतात. या फंडाचा पोर्टफोलिओ ठरवताना Score अल्फा या प्रणालीचा अवलंब फंड मॅनेजर कडून केला जातो. ऑपरेटिंग कॅश फ्लो (OCF) आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड (ROCE) हे दोन्हीही दर्जेदार असणाऱ्या कंपन्या पोर्टफोलिओ मध्ये असाव्यात असा फंड मॅनेजरचा आग्रह असतो. पोर्टफोलिओ मध्ये भरपूर शेअर्स असणे आणि चांगले शेअर्स असणे यातला फरक ओळखून फंड मॅनेजर आपली गुंतवणूक करतात.

G A R P मॉडेल (ग्रोथ एट रिझनेबल प्राइस)

या मॉडेल नुसार पोर्टफोलिओ मध्ये एखादा शेअर विकत घेताना तो योग्य किमतीला उपलब्ध आहे ना ? याचा पहिल्याप्रथम विचार केला जातो.

रिस्को मिटरचा विचार करायचा झाल्यास ‘Very High’ म्हणजेच सर्वाधिक जोखीम असलेल्या श्रेणीमध्ये हा फंड मोडतो.

३ जानेवारी २०२४ रोजी फंडाचा परतावा (CAGR पद्धतीने)

· एक वर्ष – १८.२४ %

· दोन वर्षे – ७.४५ %

· तीन वर्षे – १४.७६ %

· पाच वर्षे – १५.०८ %

· दहा वर्षे – १४.३८ %

· फंड सुरु झाल्यापासून – १३.४२ %

हेही वाचा : वित्तरंजन : सत्यमचा घोटाळा (भाग १) 

फंडाने गुंतवणूक कुठे केली आहे ?

३० नोव्हेंबर २०२३ रोजी उपलब्ध माहितीनुसार या योजनेच्या पोर्टफोलिओ मध्ये ४९ शेअर्स आहेत व यातील एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, भारती एअरटेल, रिलायन्स, अवेन्यू सुपर मार्केट, टाटा कन्सल्टन्सी, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक या पहिल्या दहा शेअर्सनी अर्धा पोर्टफोलिओ व्यापला आहे.

गेल्या महिन्याभरात एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स हा नवा शेअर पोर्टफोलिओ मध्ये दाखल झाला आहे तर डिव्हिज लॅबोरेटरीज या शेअर मधून शेअर मधील आपली गुंतवणूक फंडाने विकली आहे.

कोणत्या क्षेत्रात किती टक्के गुंतवणूक केली आहे ?

खाजगी बँकांमध्ये पोर्टफोलिओचा सर्वाधिक हिस्सा गुंतवला गेला आहे. एकूण पोर्टफोलिओच्या २५% शेअर्स बँकिंग कंपन्यांचे आहेत. त्या खालोखाल कॉम्प्युटर आणि सॉफ्टवेअर १५%, वाहन उद्योग ४ %, दूरसंचार, पेट्रोलियम, एनबीएफसी ३ % अशी गुंतवणूक केलेली दिसते.

‘एस.आय.पी.’तील दीर्घकालीन परतावे

तुम्ही या फंडात दरमहा एक हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तर

· एक वर्षापासून एसआयपी केली असती तर २८. ०१ %

· दोन वर्षे १६.९१ %

· तीन वर्षे १३.८३ %

· पाच वर्षे १६.५६ %

· सलग दहा वर्ष १३.४५ %

असा स्थिर परतावा मिळालेला दिसतो.

हेही वाचा : Money Mantra : आर्बिट्राज फंड काय असतो?

नुकत्याच एका निर्णयाद्वारे फंड घराण्यांनी जाहिरात करताना दहा वर्षाच्या सरासरी रिटर्नचा (CAGR) समावेश त्यात करावा अशी मार्गदर्शक सूचना करण्यात आली. त्यानुसार निवडक फंडांचे विश्लेषण या लेखमालिकेतून केले जात आहे. फंड योजनेत गुंतवणूक करावी असा सल्ला देणे हा या लेखमालिकेचा उद्देश नाही. या फंडात गुंतवणूक करताना सर्व जोखीम विषयक माहिती वाचून आपल्या जबाबदारीवरच गुंतवणूक करावी.

Story img Loader