कॉन्फेकशनरी ही कंपनी जपानमध्ये सुरू करणारा वाहेई टाकाडा याची जपानचा वॉरेन बुफे अशी ओळख आहे. हे टोपण नाव त्याला त्याच्या हयातीत मिळाले हे विशेष. त्याने ही कंपनी सुरू करून त्याची उत्पादने जपानमध्ये अतिशय लोकप्रिय करून प्रचंड पैसा कमावला. त्या पैशातून त्याने जपानमधल्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. ही गुंतवणूक एवढी वाढली की, २००६ ला शंभराहून जास्त कंपन्यांमध्ये प्रत्येक कंपनीत १० टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक त्याने केली होती. त्याच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य ३० अब्ज येन एवढे झाले होते. त्याच्या कंपनीची बिस्किटे मोठ्या प्रमाणात विकली जायची ती बिस्किटे छोट्या अंड्याच्या आकाराएवढी असायची.

व्यवसायात प्रचंड यश मिळविल्यानंतर त्याने जपानमधील छोट्या व्यावसायिकांना मदत करण्यास सुरुवात केली. त्यांची वाढ होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करायचे. एक परोपकारी व्यक्ती म्हणून त्याने नाव कमावले. त्याची विचारसरणी फार चांगली होती. ही विचारसरणी आणि गुंतवणुकीचे निर्णय याचा अभ्यास करणारे अनेकजण जगात पसरले. तो असे म्हणायचा की, दिवसातून हजार वेळा आपल्या संपत्तीचा, पैशाचा मी कृतज्ञ आहे. मी तुझे आभार मानतो असे म्हणायला सुरुवात करा. त्याचे सर्वांना सांगणे असायचे देण्याचा आनंद मिळवा. आपल्याकडे संपत्ती कमी आहे असे कधीही म्हणू नका. त्यामुळे तो जेव्हा वारला त्या वेळेस त्याची नेटवर्थ २४ अब्ज डॉलर एवढी होती.

Kavadi for lord importance of kavadi price of a kavadi
लोक-लौकिक : ‘कवडी’मोल!
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
PepsiCo Eyes Stake in Haldiram Snacks
हल्दीराममधील हिस्सा खरेदीसाठी ‘बहुराष्ट्रीय’ चढाओढ; पेप्सिको, टेमासेक, ब्लॅकरॉकसारख्या कंपन्या आखाड्यात
JSW Share News
JSW Cement IPO ला सेबीचा हिरवा कंदील; ११ गोष्टी या ‘आयपीओ’बद्दल…
jayam ravi changed his name
दाक्षिणात्य सुपरस्टारचा मोठा निर्णय! सिनेविश्वात २० वर्षे ज्या नावाने ओळख मिळाली, तेच बदलणार…; स्वतः घोषणा करत म्हणाला…
Madhuri Dixit Gauri Khan buy OYO shares
माधुरी दीक्षित व गौरी खानने शेअर मार्केटमध्ये केली गुंतवणूक, कोणत्या कंपनीचे शेअर्स घेतले? वाचा
selection process for next chief election commissioner
अन्वयार्थ : सरकारी खातेच जणू…
Is ESOP or RSU better for employee welfare
कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी ‘ईसॉप’ की ‘आरएसयू’ चांगले?

हेही वाचा – माझा पोर्टफोलियो – जीवनरेखा याच हाती! : ज्युपिटर लाइफलाइन हॉस्पिटल्स लिमिटेड

u

आता थोडेसे जपानच्या शेअर बाजाराबद्दल. कारण देशाचा शेअर बाजार चांगला असला तरच त्या देशात अमेरिकेत वॉरेन बफे निर्माण होतो, भारतात राकेश झुनझुनवाला निर्माण होतो. तशीच जपानमध्ये टाकाडा याने प्रगती साधली. योग्य काळात ही मंडळी शेअर बाजारात होती हा त्यांच्या नशिबाचा भाग झाला, परंतु त्यांनी केलेले प्रयत्न तेवढेच महत्त्वाचे होते किंवा आपण असे म्हणू शकतो की प्रयत्न आणि नशीब एकत्र यावे लागते.

जपानचा निक्केई २२५ हा निर्देशांक जेव्हा ३५ टक्क्याने अचानक वाढला. तेव्हा जपानच्या शेअर बाजाराकडे जगाचे लक्ष गेले. पण त्यानंतर तो बाजार १५ टक्क्यांनी खाली आला. दरवर्षी फोर्ब्ज नावाचे मासिक जगातल्या श्रीमंत व्यक्तींची यादी प्रकाशित करीत असते. २०२४ च्या या आकडेवारीतली काही नावे आणि त्या व्यक्तींचे व्यवसाय वाचण्यासारखे आहेत. ही यादी का वाचायची तर काही व्यवसाय उदाहरणार्थ, अमेरिकेतला तेल उद्योग किंवा वॉलमार्ट यासारखे व्यवसाय हे मोठे होत जातात आणि इतर व्यवसाय मागे पडतात. अमेरिकेत एक काळ पोलाद उद्योगातली मंडळी अग्रेसर होती. ते व्यावसायिक पुढे मागे पडले. काही वर्षांनंतर अमेरिकेतल्या बँका मोठ्या झाल्या तर काही वर्षांनंतर अर्थकारणातल्या व्यक्ती मोठ्या झाल्या. त्यातल्या काही व्यक्तींचा आढावा आपण आपल्या लेखमालेत घेतलेला आहे.

हेही वाचा – मिष्टान्न! (उत्तरार्ध)

टाकाडा यांनी गुंतवणुकीसंबधी विशेषतः पैशासंबंधी त्याचे काही विचार मांडलेले आहेत. हे वाचताना आश्चर्य वाटते आणि कुठेतरी आपल्या संस्कृतीशी त्याची नाळ जुळलेली आहे असे वाटते.

१) पैसा ही फक्त ऊर्जा आहे. आर्थिक संपन्नता मिळवलीच पाहिजे ज्यावेळेस या ऊर्जेचा चांगला उपयोग करून घेतला जातो, त्याचवेळेस माणूस मोठा होतो.

२) पैसा तटस्थ असतो हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण पैसा तुमचा फायदा करीत नाही किंवा नुकसान करीत नाही. एखाद्याला लायकीपेक्षा जास्त पैसा मिळाला म्हणूनसुद्धा वाईट नाद लागतात आणि असलेला पैसा संपतो.

३) पैसा हे नाणं आहे, नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच पैशालासुद्धा दोन बाजू असतात. अनीतीने मिळवलेला पैसा आणि नीतीने मिळवलेला पैसा.

४) पैशाला मूल्य असते किंमत नसते. ज्यावेळेस महागाई प्रचंड होते त्यावेळेस जर्मनीमध्ये पोते भरून नोटा न्यावा लागत होत्या. किरकोळ खरेदीसाठी जर्मनीने प्रचंड चलनवाढ बघितलेली आहे. म्हणून जर्मनीमध्ये अजूनसुद्धा वैयक्तिक गुंतवणूकदारांची संख्या कमी आहे. असा उल्लेख मागील एका लेखात केला होता. (जर्मनीचा वॉरेन बफे अर्थ वृत्तान्त, २६ नोव्हेंबर २०२४ )

५) पैशाचे गुलाम होऊ नका.

६) पैशावर नियंत्रण करायला शिका.

७) पैशाला मित्र बनवा.

टाकाडा यांना गुरुस्थानी मानणारे अनेक गुंतवणूकदार आहेत. केनहोंडा नावाच्या व्यक्तीने जो २००८ पासून टाकेडाच्या संपर्कात होता त्याने टाकाडा यांच्यावर लेखन केलेले आहे. त्यांची विचारसरणी कशी होती यासंबधी अनेक व्हिडीओदेखील उपलब्ध आहेत .

फील टाऊन नावाचा अमेरिकन गुंतवणूकदारसुद्धा वर्षानुवर्षे टाकाडा यांचा भक्त होता. यामुळे अमेरिकेत ज्याप्रमाणे वॉरेन बफेवर वेगवेगळ्या लेखकांनी पुस्तके प्रकाशित केली आहेत. किंवा अशा प्रकारची पुस्तके प्रकाशित करणे हासुद्धा वेगळा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तोच प्रघात टाकाडावर जपानमध्ये सुरू आहे.

Story img Loader