• अरुण सिंग तन्वर

यश एका रात्रीत मिळत असले तरी ती रात्र येण्यासाठी अनेक वर्षे कठोर परिश्रम घ्यावे लागतात. शेअर मार्केटमध्येही तुम्हाला एका रात्रीत यश मिळू शकते. परंतु त्या रात्रीचे साक्षीदार होण्यासाठी तुम्हाला शेअर बाजारातील तांत्रिक गोष्टी शिकण्यात आणि समजून घेण्यात वेळ घालवावा लागेल. खरं तर शेअर बाजार धोकादायक आणि बेभरवशाचे आहे, परंतु जेव्हा तुम्ही त्याचा सखोल विचार करता, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की, ही जोखीम किती सहजपणे व्यवस्थापित केली जाऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यशाचे असे अनेक मंत्र आहेत, जे तुमचे नुकसान होण्याचे धोके कमी करू शकतात. जोखीम व्यवस्थापन धोरणांसह शेअर्सचे तांत्रिक विश्लेषण कसे कार्य करते हे एकदा तुम्हाला कळले पाहिजे.

आर्थिक यशाचा मार्ग

आर्थिक यशाचा मार्ग केवळ पैसे कमवण्याच्या ज्ञानानेच येत नाही, तर पैसे गुंतवतानादेखील येतो. तुमच्या कष्टाने कमावलेल्या पैशाची गुंतवणूक किंवा व्यापार कुठे करायचा हे तुम्हाला वेळीच समजणे महत्त्वाचे आहे आणि त्यावर फलदायी परतावा मिळणेही आवश्यक आहे. शेअर बाजाराच्या ज्ञानाने तुम्ही तुमच्या आर्थिक यशाचा मार्ग तयार करू शकता.

१. मूलभूत गोष्टींमध्ये प्रगल्भ व्हा

कदाचित हे तुम्हाला उपरोधिक वाटेल, परंतु शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला त्याची मूलभूत माहिती चाणाक्ष बुद्धिमत्तेसह समजून घेणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे साधेपणा आणि मूलभूत ज्ञानाने परिपूर्ण अलौकिक बुद्धिमत्ता आहे, त्यांच्यासाठी शेअर बाजार एक दूरचा आणि कधीही मागे वळून न पाहणारा मार्ग आहे. मूलभूत गोष्टींचे चांगले ज्ञान हेसुद्धा शेअर बाजारातील प्रगत ज्ञान समजून घेण्यास मदत करते. अशा प्रकारे आपल्या आर्थिक यशाच्या वाढीस उत्प्रेरित करते.

२. शिकण्यावर भर द्या

जेव्हा तुम्हाला असे वाटते की, तुम्हाला सर्वकाही माहीत आहे, तेव्हा पुन्हा शिकण्यास सुरुवात करा. शेअर बाजार हे अस्थिर आणि गतिमान ठिकाण असल्याने गुंतवणूकदार आणि व्यापार्‍यांसाठी यात कधीही न संपणारे शिक्षण आणि अनुभव मिळतात. एखाद्याने कधीही शिकणे सोडू नये, तसेच त्यांच्या सर्व हालचालींचे बारकाईने विश्लेषण करावे. व्यापारी किंवा गुंतवणूकदारांनी त्यांची धोरणे सुधारण्याची आणि तार्किक निर्णय घेण्याची मानसिकता वाढवली पाहिजे.

३. रणनीती कशा आणि केव्हा वापरायच्या हे जाणून घ्या

शिकण्याच्या टप्प्यात तुम्हाला शेअर बाजाराच्या अनेक प्रयत्न केलेल्या रणनीती आढळतील. ही धोरणे व्यापार आणि गुंतवणूक दोन्हीसाठी फायदेशीर आहेत. परंतु, या रणनीतींचे विश्लेषण करण्यासाठी तुमचा सर्वोत्तम वेळ द्या. इतर लोकांच्या अनुभवांवर विसंबून राहण्यापूर्वी नेहमी प्रयत्न करा आणि स्वतःच प्रयोग करून बघा. हे तुम्हाला तुमच्या गरजा आणि अपेक्षांवर आधारित रणनीती आणि तंत्रांवर पकड ठेवण्यास मदत करेल.

हेही वाचाः Independence Day Sale : फक्त १५१५ रुपयांमध्ये हवाई प्रवास करण्याची संधी, जाणून घ्या

४. विचलित होण्यापासून दूर राहा

शेअर बाजारात टिप्स, इनसाइडर ट्रेडिंग आणि बनावट बातम्या खूप सामान्य आहेत. या सर्व गोष्टींना सामोरे जाण्यासाठी तुमच्याकडे संयम असणे आवश्यक आहे. अनेक वेळा लोक त्यांच्या स्वतःच्या अनुभवानंतरही इतर टिप्सवर विश्वास ठेवतात. यामुळे अनेकदा नुकसान होते.

हेही वाचाः महागाईच्या आघाडीवर दिलासा, जुलैमध्ये घाऊक महागाईचा दर उणे १. ३६ टक्के राहिला

५. जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा सुरुवात करा

बरेच जण त्यांच्या गुंतवणुकीचा प्रवास उशिरा सुरू करतात, कारण त्यांच्याकडे भांडवल कमी असते. पण गुंतवणुकीचाही एक मंत्र आहे. जर तुमच्याकडे फक्त ५०० रुपये असतील तर लागलीच गुंतवणूक करून टाका, अधिक गुंतवणूक करण्यासाठी पैसे जमा करत बसू नका. तुम्हाला वाटेल तेव्हा या ५०० रुपयांची गुंतवणूक करा. हे तुम्हाला केवळ गुंतवणुकीतच मदत करणार नाही, तर पद्धतशीर बचतदेखील करेल.

शेअर बाजार ही अशी जागा आहे जिथे तुम्ही कमाई, बचत आणि गुणाकारानं फायदा मिळवू शकता. जर तुम्हाला तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून पुरेसे ज्ञान असेल तर तुम्ही यातून जास्तीत जास्त फायदा घेऊ शकता. शेअर बाजाराविषयी जाणून घेतल्याने तुम्हाला केवळ पैसे कमवायलाच मदत होणार नाही तर आत्मविश्वासही वाढेल. तुमच्या आता शेअर बाजारातून पैसे कसे कमवायचे हे माहीत झाले आहे, तेव्हा तुम्हाला आर्थिक-स्वतंत्र भविष्य निर्माण करण्याचा आत्मविश्वास मिळेल.

(अरुण सिंग तन्वर, संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, गेट टुगेदर फायनान्स, स्टॉक मार्केट संस्था)

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Want to be a successful investor then follow these things and see vrd
Show comments