लीना आणि सिद्धेशचं नुकतच लग्न ठरलं होतं! साखरपुडा , लग्न हे सगळं आता काही महिन्यांच्या कालावधीत होणार होतं! एकमेकांना समजून घेताना, दोघांच्याही मनात साखरपुडा, लग्न, त्या आधी आणि नंतरचे विधी, हौसेमौजेचे कार्यक्रम या सगळ्यांचे खर्च, बजेट याबद्दल अनेक विचार डोकावत होते. खरंतर दोघांनाही चांगली नोकरी होती, दोघांच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नासाठी थोडी तरतूदही केली होती. असं असलं तरी, या महत्त्वाच्या विषयावर दोघांनी एकमेकांच्या अपेक्षा आणि विचार जाणून घ्यायचं ठरवलं.

या वर्षीही आता लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे! ‘The Cait Research & Trade Development Society’ च्या एका सर्वेक्षणानुसार, या लग्नसराईच्या मोसमात सुमारे ४.५० लक्ष कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे.

UPSC Preparation Overview of GST System and Tax Collection career news
upscची तयारी: जीएसटी प्रणाली आणिकर संकलनाचा आढावा
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Applications of 12400 aspirants in 24 hours for CIDCOs Mahagrihmanirman Yojana
सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेसाठी २४ तासांमध्ये १२,४०० इच्छुकांचे अर्ज
cardiologists reveal age at which woman should start getting tested for heart disease
महिलांनी कोणत्या वयात हृदयविकाराची चाचणी केली पाहिजे? डॉक्टरांनी केले स्पष्ट
reserve bank of india
अन्वयार्थ: व्याजदर कपातीच्या उत्सवाचे पूर्वरंग!
air pollution control, Mumbai Municipal Corporation,
वायू प्रदूषण नियंत्रणासाठीच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करा, मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे आदेश
navratri fasting tips
नवरात्रीत उपवास करताय? कसा असावा नऊ दिवसांचा आहार? डॉक्टरांकडून जाणून घ्या
To avoid repeat of incident during Navratri festival police started patrolling in bhiwandi
भिवंडीची पूनरावृत्ती टाळण्यासाठी नवरात्रोत्सवात पोलीस सतर्क समाजमाध्यमांवरील अफवांवर पोलिसांचे लक्ष, गस्तीवर भर

हेही वाचा – Money Mantra : फंड विश्लेषण – एसबीआय ब्लूचिप फंड

आपल्याकडे ‘लग्न’ हा प्रत्येक कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाचा आणि खास दिवस असतो. नवीन जोडप्यासोबत त्या दोघांच्या कुटुंब, आप्तेष्ट आणि नातेवाईकांसाठी तो एक आनंदाचा दिवस असतो. अर्थात या सगळ्या हौसेमौजेसाठी आजकाल बऱ्यापैकी खर्च होतो. पण जर या महत्त्वाच्या दिवसासाठी जर योग्य प्रकारे आर्थिक नियोजन केले तर हा दिवस अधिक आनंददायी ठरतो!

तर पाहू सोप्या प्रकारे आपण लग्नासाठी आर्थिक नियोजन करू शकतो.

१. मोकळेपणे संवाद साधा

लग्न म्हटलं की नवीन जोडप्यासोबत त्यांच्या कुटुंबांचीसुद्धा नव्याने ओळख होत असते. अशा वेळी त्या दोन्ही कुटुंबांनी अगदी मोकळेपणाने लग्न, त्याचे विधी, इतर कार्यक्रम आणि मुख्य म्हणजे त्या अनुषंगाने येणारे खर्च याबद्दल मोकळेपणे संवाद साधावा.

२. बजेट आखा

आजकाल लग्नाआधी आणि नंतर होणारे कार्यक्रम आणि त्यातली विविधता वाढली आहे. त्या अनुषंगाने येणारे खर्चाचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा हे कार्यक्रम हौसेखातर अथवा social pressure मुळे केले जातात. जेव्हा दोन्ही कुटुंबांचे एकत्र बजेट तयार होते तेव्हा नेमक्या आणि महत्त्वाच्या गोष्टींवर पैसा खर्च करणे सोपे जाते.

३. खर्च वाटून घ्या

दोन्ही कुटुंबांनी साखरपुडा, लग्न, आणि इतर नियोजित कार्यक्रमाचा खर्च समान वाटून घेतला तर कोणत्याही एकाच कुटुंबावर भर पडत नाही. यामुळे दोन्ही कुटुंबांत एक छान नाते आणि विश्वास तयार होतं.

४. स्थानिक बाजारात व्यवहार करा

आजकाल ‘destination wedding’ चा trend आहे. जर तुम्ही ‘destination wedding’ करत असाल तर त्या ठिकाणच्या व्यक्तींशी व्यवहार करा. म्हणजे decoration, photographer, venue, food & catering इत्यादी सगळ्या गरजेच्या सेवा सुविधा तुम्ही त्या ठिकाणच्या स्थानिक व्यक्तींकडून घ्या. यामुळे तुमची चांगली बचत होईल.

५. लग्न आनंददायी करणे महत्त्वाचे

लग्नसोहळा किती मोठा आणि दिमाखदार आहे यापेक्षा तो किती ‘आनंददायी’ ठरते हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या विचारांनी तुम्ही सगळ्या कार्यक्रमाची आखणी करा.

हेही वाचा – Money Mantra : अग्रिम कर अर्थात अ‍ॅडव्हान्स्ड टॅक्स १५ डिसेंबरपूर्वी कोणी भरावा?

६. बचत केलेले पैसे तुमच्या भविष्यासाठी उपयोगात आणता येतील

अशा प्रकारे योग्य नियोजन करून बचत केलेले पैसे तुम्हाला तुमच्याच भविष्यासाठी उपयोगात आणता येतील. उदा. जर तुम्हाला लग्नानंतर नवीन घर घ्यायचं असेल तर ते बचतीचे पैसे तुम्ही त्या घराच्या ‘down payment’ साठी बाजूला ठेवू शकता.

७. आहेराचं नियोजन

बरेचदा लग्नात नवीन जोडप्याला महागडा आहेर दिला जातो. अनेकदा त्या गिफ्ट्सचा त्यांना फारसा उपयोग असतोच असं नाही किंवा अनेकदा बरीचशी गिफ्ट्स सारख्या प्रकारची असतात. तुमचे खास मित्र मैत्रिणी, आप्तेष्ट आणि कुटुंबीय जर तुम्हाला लग्नात आहेर देणार असतील तर त्यांना तुम्ही तुम्हाला भविष्यासाठी उपयोगी वस्तू त्यांच्या बजेटनुसार द्यायला विनंती करू शकता. यामुळे त्यांना देण्याचा आनंद तर मिळेलच पण तुम्हालासुद्धा या खास प्रसंगी मिळालेल्या आहेरचा सदुपयोग करता येईल.

८. लग्नाचे नियोजन हे पुढच्या आर्थिक नियोजनाची पायरी

नव वधू आणि वराने लग्नाच्या नियोजनात एकत्र सहभाग घेतला तर ही त्यांच्या पुढच्या आर्थिक नियोजनाची पायरी ठरते. याद्वारे त्यांना आधीच एकमेकांच्या आर्थिक अपेक्षा, पैशांकडे पाहण्याचा दृष्टिकोन इत्यादी चांगल्या प्रकारे समजून घेता येतात. अशा प्रकारे सोप्या प्रकारे आर्थिक नियोजनाने तुम्ही लग्नाचा खास दिवस आणि सोहळा अधिक आनंददायी करू शकता.