आजकाल गृह कर्ज , शैक्षणिक कर्ज किंवा वाहन कर्ज यासारखी वैयक्तिक कर्जे (पर्सनल लोन) बँका तसेच एनबीएफसीज मोठ्या प्रमाणावर देऊ करत आहेत. त्यांच्या दृष्टीने अशा कर्जांचा समावेश रिटेल लोन (किरकोळ कर्जे ) यात केला जातो. यामुळे सर्व सामान्य माणसास घर घेणे, वाहन खरेदी करणे शक्य होत आहे. ही रिटेल लोन देताना बँका तसेच एनबीएफसी अर्जदारास कर्जावर आकारण्यात येणाऱ्या व्याजाचे फ्लोटिंग व फिक्सड असे दोन पर्याय देऊ करतात. काही वेळा असा पर्याय दिला जात नाही तर केवळ फ्लोटिंग रेटचा पर्याय असतो. फ्लोटिंग रेट व फिक्सड रेट म्हणजे नेमके काय याची अर्जदारास माहिती असतेच असे नाही आणि जरी माहिती असली तरी यातील नेमका कोणता पर्याय घ्यावा याबाबत संभ्रम असतो.

१) फ्लोटिंग इंटरेस्ट रेट :फ्लोटिंग रेटला व्हेरिएबल रेट म्हणजेच बदलता रेट असेही म्हणतात. अर्थव्यवस्थेतील तरलतेतील (लिक्विडीटी) बदलानुसार व्याजदर कमी अधिक होत असतात. हे बदल रिझर्व्ह बँक आपल्या पत धोरणात वेळोवेळी जाहीर करत असते. ज्या ज्या वेळी रिझर्व्ह बँक आपल्या पतधोरणात बँक रेट , रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट यासारख्या व्याजदरात बदल करीत असते त्या त्या वेळी बँका त्यानुसार आपली कर्जदारांच्या व्याजदरात त्यानुसार बदल करीत असतात. यांचे कारण फ्लोटिंग पद्धतीचा व्याज दर हा एक बेंच मार्क (मूलभूत) रेट वर आधारित असतो. हा बेंचमार्क रेट वेळोवेळी बदलत आला आहे. अगदी सुरवातीस हा पीएलआर (प्राईम लेंडिंग रेट) होता , पुढे तो बेस रेट झाला व त्यानंतर त्याचा एमसीएलआर (मार्जीनल कॉस्ट लेंडिंग रेट) झाला तर सध्या रेपो रेट हा बेंच मार्क रेट झाला आहे.

Ketu Gochar 2024
Ketu Gochar 2024 : केतु ग्रहाने केला सूर्याच्या नक्षत्रात प्रवेश, ‘या’ तीन राशींना मिळणार अचानक पैसाच पैसा!
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
David Shaw has used concept of quant when managing assets of his investors
बाजारातली माणसं : हेज फंड बाजारातली एक रहस्यकथा – डेव्हीड शॉ
Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?

हेही वाचा : Money Mantra: फंड विश्लेषण- जे एम लार्ज कॅप फंड

फ्लोटिंग रेट पद्धती मध्ये कर्जावर लागू होणारा व्याज दर हा बेंच मार्क रेटपेक्षा काही टक्के अधिक असतो उदा: जर एखाद्या बँकेचा गृह कर्जावरील फ्लोटिंग व्याज दर हा रेपो +१.५% इतका असेल आणि रेपो रेट ७.००% असेल तर गृह कर्जावरील व्याज दर ७.००%+१.५०%=८.५० % इतका असेल, जर रिझर्व्ह बँकेने आपल्या पुढील पत धोरणात रेपो रेट ६.७५% केला तर गृह कर्जावरील व्याज दर ६.७५%+१.५%=८.२५% होईल आणि जर तो ७.२५% केला तर ७.२५%+१.५%=८.७५% इतका होईल.

थोडक्यात ज्या ज्या वेळी रेपो रेट बदलेल त्या त्या वेळी गृह कर्जावरील व्याज दर कर्ज परतफेडीचा कालावधी संपेपर्यंत त्यानुसार बदलत राहील. दीर्घ मुदतीच्या कर्जावरील इंटरेस्ट रेट रिस्क मॅनेजमेंटच्या दृष्टीकोनातून बँका फ्लोटिंग रेट देऊ करतात. याचा फायदा कर्जदारास सुद्धा होऊ शकतो.

२)फिक्सड इंटरेस्ट रेट: याउलट फिक्सड रेटमध्ये कर्जावरील व्याज दर संपूर्ण कालावधी साठी जो सुरवातीस ठरलेला असतो तोच राहतो. रिझर्व्ह बँकेने पत धोरणात वेळोवेळी केलेल्या बदलाच्या या व्याज दरावर काहीही परिणाम होत नाही.

हेही वाचा : Money Mantra : NPS खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलले, पैसे काढण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

फ्लोटिंग रेट पर्यायाचे फायदे

-अर्थव्यवस्थेत व्याज दरात घसरण झाली तर फ्लोटिंग रेट कमी होतो व कर्ज परतफेडीचा हप्ता तेवढाच राहत असल्याने कर्ज परतफेड कमी कालावधीत होते.
-फ्लोटिंग रेटमध्ये लवचिकता असल्याने कर्जदार त्याचा फायदा घेऊ शकतो.
-फ्लोटिंग रेट बेंच मार्क रेटशी निगडीत असल्याने त्यात पारदर्शकता असते म्हणजे जेवढा बेंच मार्क रेट बदलेल तेवढाच फ्लोटिंग रेट बदलतो. –बेंचमार्क रेटमधील झालेला बदल व सर्वज्ञात असतो. (सध्या बेंच मार्क रेट रेपो रेट असल्याने त्यात होणारा बदल विविध माध्यमातून आपल्याला समजतो व त्यानुसार आपल्या व्याज दरात नेमका किती बदल होणार आहे हे समजते.

तोटे

-फ्लोटिंग रेट हे बेंचमार्क रेटमधील बदलानुसार वरचेवर बदलत असल्याने दीर्घकालीन नियोजन करणे अवघड होते.
-व्याज दरात वाढ झाल्यास परतफेडीचा कालावधी वाढतो.
-बऱ्याचदा मर्यादित उत्पन्नामुळे हप्ता वाढविणे शक्य होत नाही त्यामुळे नाईलाजाने परतफेडीचा वाढीव कालावधी स्वीकारावा लागतो. परंतु जर कर्जदाराचे वय जास्त असेल तर कालावधी वाढीला जात नाही व हप्ता वाढविला जातो यामुळे कुटुंबाचे आर्थिक नियोजन कोलमडते.

हेही वाचा : Money Mantra : आधार क्रमांक यापुढे जन्मतारखेचा पुरावा मानला जाणार नाही, EPFO ​​ने घेतला मोठा निर्णय

फिक्सड रेट पर्यायाचे फायदे

-व्याजदरात बदल होत नसल्याने कर्जाचा हप्ता व कालावधी बदलत नाही यामुळे आर्थिक नियोजन करणे शक्य होते.
-व्याजदरात जेव्हा वाढ होते त्यावेळी कर्जाचा हप्ता किंवा कालावधी वाढत नाही.
-ज्यांना व्याजाची जोखीम घ्यायची नाही अशांसाठी हा पर्याय योग्य असतो.

तोटे

-ज्यावेळी कर्ज मंजूर केले जाते त्यावेळी फिक्सड रेट हा फ्लोटिंग रेटपेक्षा १ ते १.५% इतका जास्त असतो. त्यामुळे या सुरवातीच्या रेटपेक्षा जर -फ्लोटिंग रेट जास्त झाला तरच हा पर्याय फायदेशीर ठरतो.
-बाजारातील व्याज दरात घसरण झाल्यास फिक्सड रेट असणाऱ्यांचा तोटाच होतो.
-यावरून आपल्या असे लक्षात येईल की नेमका कोणता पर्याय स्वीकारायचा याबाबतचा निर्णय घेणे तितके सोपे नाही. नेमका कोणता पर्याय फायदेशीर ठरेल हे सांगता येत नाही. असं असले तरी ज्यांची थोडी जोखीम घ्यायची तयारी आहे व वाढणारा हप्ता भरणे शक्य असेल त्यांनी -फ्लोटिंग रेट पर्याय जरूर घ्यावा. यातून व्याज कमी द्यावे लागू शकते किंवा कर्जपरतफेड मुदतीच्या आधी करणे शक्य होते. याउलट जर आपले -उत्पन्न मर्यादित असेल आणि आपल्याला वाढीव हप्ता भरणे शक्य नसेल तर फिक्सड रेट पर्याय योग्य ठरू शकतो.
मात्र व्याज दरातील बदलावर आपले नियंत्रण नसल्याने कोणता पर्याय स्वीकारणे चांगले हे कुणीही खात्रीशीर सांगू शकत नाही. नुकतेच म्हणजे १७/०८/२०२३ रोजी रिझर्व्ह बँकेने बँका तसेच एबीएफसीजना १/०१/२०२४ पासून कर्जदारांना आपला व्याजाचा पर्याय बदलण्याची सुविधा देऊ करण्याचे आदेश दिले आहेत याचा फायदा कर्जदारांना निश्चितच घेता येईल.