शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सरलेले वर्ष अत्यंत मूल्यवान ठरले. बाजारात गुंतवणूक करताना कसे नियोजन करावे ? याचे जे धडे मिळायला हवेत ते मिळाले. सेन्सेक्स आणि निफ्टीने नवनवीन पायऱ्या पार करत सरलेल्या आठवड्यात बाजार बंद झाला तेव्हा निफ्टीने २१,७७८ ही पातळी गाठली. पण त्यामुळे सरसकट सगळ्याच कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणे उपयुक्त ठरेल असे नाही. याउलट बाजारात निर्माण होणाऱ्या संधीचा वापर करून आणि आपल्याकडे असलेल्या पैशाचा योग्य उपयोग कसा करायचा हे गुंतवणूकदारांना समजले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरना सोन्याचे दिवस आले असले तरीही त्यातील नेमके कोणते शेअर खरोखरच दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी फायदेशीर असतील हे या वर्षात समजणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

म्युच्युअल फंडाच्या मार्फत गुंतवणूक करणाऱ्या अनेक मंडळींनी मिड आणि स्मॉलकॅप फंडांचा ‘एसआयपी’साठी विचार केला, या प्रकारच्या फंड योजनांत जोरदार गुंतवणूक सुरू झाली आहे. यामुळे एकूणच मिड आणि स्मॉलकॅप शेअरमध्ये यावर्षी उलाढाल वाढलेली दिसली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको. यातही निधी व्यवस्थापकासमोर आव्हान असेल तर खरोखरच भक्कम पाया असलेल्या मिड आणि स्मॉलकॅप कंपन्या निवडून त्यात दरमहा येणारी रक्कम गुंतवणे.

निवडणुका आणि २०२४

बांगलादेश, पाकिस्तान, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया आणि भारत या आशिया खंडातील देशांमध्ये यावर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांतच निवडणुका होणार आहेत. आपल्यासाठी हा मुद्दा महत्त्वाचा का? कारण देशाच्या आर्थिक बाबींसंबंधी धोरणात्मक निर्णय घेण्यात सरकारची भूमिका निर्णायक असते. देशातील स्थिर सरकार कायमच दमदार भूमिका घेऊ शकते. आपल्या बाबतीत एक सकारात्मक बदल अपेक्षित आहे, तो म्हणजे हार्डवेअर आणि चिप निर्मितीसाठी विख्यात असलेल्या कंपन्या चीनमधून बाहेर पडल्या पण व्हिएतनामला पहिली पसंती मिळाली. या वर्षात सरकारने भक्कम पाठपुरावा केला आणि राजकीय आणि सामरिक पातळीवर काम केले तर उद्योगाचे एक नवे दालन देशासाठी खुले होईल. विद्युत वस्तूंच्या खरेदीत अग्रेसर असलेला देश त्याच्या उत्पादन आणि निर्यातीत आघाडीवर जाणे ही पुढील पायरी असणार आहे.

भारतीय बाजार याबाबतीत आणखी एक स्थान पुढे आहे, ते म्हणजे राजकीय विश्वासार्हता आणि स्थिर ग्राहकांची अर्थव्यवस्था. यामुळे जगभरातील गुंतवणूकदार आपली पसंती भारतीय बाजारांना देतील यात शंकाच नाही. गेल्या वर्षी आणखी एक मुद्दा समोर आला, तो म्हणजे वर्षाच्या अमुक एका महिन्यात परदेशी गुंतवणूकदार भरपूर पैसे गुंतवतात आणि वर्षाच्या शेवटी ते आपले पैसे काढून घेतात असा समज भारतीय गुंतवणूकदारांमध्ये होता. यावर्षी दिवाळीनंतर बाजारात घसरण होईल अशी अपेक्षा असताना बाजार वरच्या दिशेलाच झेपावले.

भारतातील मागच्या पाच लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा आणि निफ्टीचा एकत्र विचार केल्यास बाजारात निरुत्साह दिसत नाही किंवा अतिउत्साह पण दिसत नाही. २००४ मध्ये भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार जाऊन काँग्रेसप्रणीत यूपीएचे सरकार आले. २०१४ मध्ये उलट स्थिती होती. निवडणुकीच्या एक महिनाभर आधी निकाल आले त्यानंतरच्या महिन्याच्या काळात बाजारात अस्थिरता दिसून येते. मात्र निवडणूक वातावरण शमले की पुन्हा बाजार आपल्या मार्गाला लागतात ! २०१९ मध्ये भाजपप्रणीत एनडीएचे सरकार पुन्हा निवडून आले, तेव्हा बाजारात दिसलेला उत्साह महिनाभर टिकला होता. ‘Markets Discounts Everything’ म्हणजे बाजार सगळे हिशोब करूनच तुमच्यासमोर किंमत ठेवत असतो हा नियम समजून घ्या.

निवड शेअरची आणि उद्योगाची

गुंतवणूकदार म्हणून बाजारात पैसे गुंतवताना आपला एकूण पोर्टफोलिओ किती रुपयांचा आहे याचा आधी विचार करायला हवा. तुम्ही शेअर बाजारात नव्याने पदार्पण केले असेल तर पाच ते दहा कंपन्यांपेक्षा अधिक कंपन्यांचे शेअर पोर्टफोलिओमध्ये असणे योग्य नाही. त्याचबरोबर तुमची गुंतवणुकीची रक्कम कमी असेल तर व्यवसायाचे प्रारूप स्थिर असलेल्या कंपन्यांची निवड करून गुंतवणुकीला सुरुवात करणे योग्य असते. गेल्या वर्षी संरक्षण क्षेत्र आणि सरकारी क्षेत्रातील बँकांनी गुंतवणूकदारांच्या पदरी मोठा परतावा दिला.

शेअरमध्ये ‘एसआयपी’ सुरू करा.

ज्याप्रमाणे म्युच्युअल फंड योजनांची ‘एसआयपी’ करून बाजारातील चढ-उतारांचा लाभ घेता येतो, त्याचप्रमाणे आपला मुख्य पोर्टफोलिओ बांधायला शेअरमध्ये ‘एसआयपी’ सुरू करावी. निफ्टी-फिफ्टीमधील निवडक २ ते ३ कंपन्यांच्या शेअरमध्ये दरमहा एका ठरावीक तारखेला खरेदी करावी. शेअर ब्रोकरकडे असलेल्या डिमॅट खात्यामध्ये आता असा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये आपण एक निश्चित रक्कम आणि महिन्याची एक तारीख ठरवून घेऊ शकतो व त्या दिवशी आपल्या डिमॅट खात्यामध्ये ते शेअर विकत घेतले जातात. ज्या कंपन्यांचे भविष्य उज्ज्वल आहे, ज्यांचे व्यवसाय अनेक वर्षांपासून चालत आलेले आहेत व ते वर्धिष्णू असणार आहेत अशा कंपन्यांचे शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायलाच हवेत. आपण स्वतः अशी खरेदी नियमितपणे करू याची खात्री नसते. म्हणूनच शेअरमध्ये ‘एसआयपी’ करायला हवी.

खरेदीची संधी ओळखू या

महिन्यातील एखाद्या आठवड्यात बाजार अचानक ५ ते ७ टक्के खाली जातात. यामागील कारण तात्कालिक असते. कुठेतरी एखादी आंतरराष्ट्रीय बाजारातील वाईट बातमी, राजकीय अस्थिरता, अन्य कुठल्यातरी देशातील शेअर बाजारामध्ये झालेली घसरण किंवा परदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला तर बाजारात घसरण होते. अशा वेळी चतुर गुंतवणूकदारांनी चांगल्या कंपन्या हेरून शेअर थोडे थोडे घ्यायला हरकत नाही.

नववर्षाचे पैशाचे संकल्प कोणते कराल ?

  • दरमहा किती पैसे बाजूला काढायचे याचे आपल्या कुटुंबाचे लक्ष्य ठरवून घ्या.
  • आपल्या मागील वर्षात केलेल्या गुंतवणुकीचा आढावा घ्या. एकाच क्षेत्रामध्ये, एकाच प्रकारच्या फंड योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल तर आढावा घ्या. – – एखादा शेअर विकायचा म्हणून तुम्ही वाट बघत असाल आणि तो नफ्यात असेल तर त्यातून बाहेर पडण्याचा पर्याय नक्की स्वीकारा.
  • येत्या वर्षभरात कोणत्या वस्तू आपल्याला विकत घ्यायच्या आहेत याचा अंदाज घेऊन तसे नियोजन करा.
  • मुलांच्या शिक्षणासाठी पैसे लागणार असतील, तर ती रक्कम हायब्रीड फंड योजनेत ‘पार्क’ करून ठेवा !
  • आयुर्विमा, आरोग्य विमा योजना यांचे हप्ते कोणत्या महिन्यात भरायचे असतात? त्यासाठी किती पैसे लागतात ते मुदत ठेव किंवा लिक्विड फंडात ठेवा.
  • कुटुंबात नव्या बाळाचे आगमन झाले असेल, तर त्याच्या नावाने लगेचच एक एसआयपी सुरू करा. आता सुरू केलेली दरमहा १००/५०० रुपयांची एसआयपी ही त्या बाळाच्या शिक्षणाची सोय नक्की करू शकते हे विसरू नका.
  • तुमचे वय चाळीसपेक्षा जास्त असेल तर एक निवृत्ती निधी तयार करायला सुरुवात करा. दरमहा तीन-चार हजार रुपयांची एसआयपी तुम्हाला साठीच्या सुमारास एक मोठा निधी जमा करून देऊ शकेल.
  • दरमहा होणारे खाद्यपदार्थांवरचे खर्च आटोक्यात ठेवा. आपले आरोग्य आणि आपला आहार याचा जवळचा संबंध आहे. तुमचे आरोग्य चांगले राहिले तरच असलेल्या पैशाचा उपभोग घेता येईल, हे विसरू नका.

येत्या वर्षात बाजारासाठी महत्त्वाचे ठरतील असे घटक

  • रिझर्व्ह बँकेचे व्याजदराचे धोरण.
  • भारतातील कृषी क्षेत्रातील प्रगती.
  • लोकसभा निवडणूक निकाल.
  • नवीन निवडून आलेल्या सरकारच्या धोरणात्मक घोषणा.
  • निर्मिती क्षेत्रावर मंदीचे सावट.
  • ग्रामीण अर्थव्यवस्थेतील खरेदीशक्ती आणि एफएमसीजी कंपन्यांचे अर्थकारण.
  • अमेरिकेत महागाई दर आणि व्याजदर धोरण.
  • युरोप आणि मध्य आशियातील युद्धजन्य स्थिती आणि तेलाचे दर.

यावर्षी वर्षभर या सदरातून आपण भारतातील आणि परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी समजून घेणार आहोत, नूतन वर्षाभिनंदन !

joshikd28@gmail.com