मागील लेखात आपण गुंतवणुकीच्या व्यवहारांवर झालेल्या भांडवली नफ्याविषयी माहिती घेतली. गुंतवणुकीच्या व्यवहारांवर जसा नफा होऊ शकतो तसाच तोटा देखील होऊ शकतो. नफा झाल्यास किती कर भरावा लागतो हे आपण मागच्या लेखात बघितले. करदात्याला तोटा झाल्यास करदात्याने काय करावे आणि त्याचा करदात्याच्या करदायित्वावर काय परिणाम होतो हे जाणून घेतले पाहिजे. करदात्याला तोटा झाल्यास हा तोटा करदात्याचे सध्याचे किंवा भविष्यातील करदायित्व कमी करू शकते. त्यासाठी काय अटी आहेत याची माहिती या लेखात दिली आहे.
जसे उत्पन्नाचे पाच स्त्रोत आहेत. पगार/वेतनाचे उत्पन्न, घरभाडे उत्पन्न, उद्योग-व्यवसायाचे उत्पन्न, भांडवली नफा आणि इतर उत्पन्न या पाच स्त्रोतामध्ये करदात्याला त्याचे उत्पन्न विभागावे लागते. करदात्याला ज्या व्यवहारात तोटा होतो तो त्याच स्त्रोतामध्ये दाखवावा लागतो. हा तोटा घरभाडे उत्पन्न, उद्योग-व्यवसायाचे उत्पन्न, भांडवली नफा या स्त्रोताच्या उत्पन्नात होऊ शकतो. असा तोटा झाल्यास करदात्याला तो दुसऱ्या उत्पन्नातून वजा करता येतो का? असल्यास त्यासाठी काय नियम आहेत? हा तोटा इतर उत्पन्नातून वजा करण्यासाठी खालील नियम आहेत.

आणखी वाचा: Money Mantra: मिलेनिअल्सनी डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक का करावी?

Kavadi for lord importance of kavadi price of a kavadi
लोक-लौकिक : ‘कवडी’मोल!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
overseas debt become expensive due to the depreciating rupee
रुपयाच्या अवमूल्यनामुळे परदेशातून कर्ज उभारणी महाग
rupee recovered 8 paise from its historic low against the us dollar to settle at 86.62
नीचांकी पातळीवरून रुपया ८ पैशांनी सावरला
torres financial fraud loksatta news
Money Mantra : टोरेससारखी फसवणूक टाळायची असेल तर हा लेख तुमच्यासाठीच
aishwarya narkar gives tips for couple to save money
“घर घ्यायचं ठरलं तेव्हा, वर्षाला २ लाख…”, संसारात पैशांची बचत कशी करावी? ऐश्वर्या नारकरांनी सांगितला अनुभव
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
Image Of Priyanka Gandhi And PM Modi
Dollar vs Rupee : “रुपयाच्या घसरणीचे सर्व विक्रम मोडले, पंतप्रधानांनी जनतेला उत्तर द्यावे”, प्रियांका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका


त्याच उत्पन्नाच्या स्त्रोतातून प्रथम वजावट करदात्याला ज्या उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये तोटा झाला असेल तर तो प्रथम त्याच उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये झालेल्या नफ्यामधून वजा करता येतो. याला काही अपवाद आहेत :

अ. सट्टा व्यवहारातील (ज्या व्यवहारात मालाचा ताबा घेतला जात नाही) तोटा हा इतर उद्योग-व्यवसायातील उत्पन्नातून वजा करता येत नाही, तो फक्त सट्टा व्यवहारातील नफ्यामधूनच वजा करता येतो.
आ. घोड्याच्या व्यवसायातील तोटा हा फक्त घोड्याच्या व्यवसायातील उत्पन्नातूनच वजा करता येतो,
इ. लॉटरी, शब्दकोडे, पत्तेखेळ, किंवा जुगार, बेटिंग मधील तोटा इतर कोणत्याही उत्पन्नातून वजा करता येत नाही,
ई. दीर्घमुदतीचा भांडवली तोटा हा फक्त दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातूनच वजा करता येतो, अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येत नाही. अल्पमुदतीचा भांडवली तोटा मात्र दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातून किंवा अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येतो.
उ. जे उत्पन्न करमुक्त आहे अशा उत्पन्नाच्या बाबतीत तोटा झाल्यास तो तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येत नाही.

आणखी वाचा: Money Mantra: चांद्रयान- ३ मोहिमेत योगदान देणाऱ्या ‘या’ कंपन्यांचे शेअर्स तुमच्याकडे आहेत का?

इतर स्त्रोतातील उत्पन्नातून वजावट
एका उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये झालेला तोटा त्याच स्त्रोतामधून वजा होत नसेल तर तो इतर स्त्रोतामधील उत्पन्नामधून वजा करता येतो. याला अपवाद खालीलप्रमाणे :

अ. भांडवली तोटा हा इतर स्त्रोताच्या उत्पन्नातून वजा करता येत नाही,
आ. उद्योग-व्यवसायातील तोटा पगाराच्या उत्पन्नातून वजा करता येत नाही,
इ. “घराच्या उत्पन्नातील” तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येतो, परंतु फक्त २ लाख रुपयांपर्यंतचाच तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येतो,
ई. कोणत्याही उत्पन्नाच्या स्त्रोतामधील तोटा हा लॉटरी, शब्दकोडे, पत्तेखेळ, किंवा जुगार, बेटिंग मधील उत्पन्नातून वजा करता येत नाही,
उ. कोणत्याही उत्पन्नाच्या स्त्रोतामधील तोटा हा घोड्याच्या व्यवसायातील उत्पन्नातून वजा करता येत नाही,
ऊ. करदात्याने नवीन करप्रणालीचा विकल्प (कोणतीही वजावट न घेता सवलतीच्या दरात कर भरण्याचा) निवडल्यास “घरभाडे उत्पन्न” या सदरातील तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येत नाही.
ऋ. आभासी चलनाच्या व्यवहारात झालेला तोटा हा इतर उत्पन्नातून वजा करता येत नाही.

पुढील वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड
एका उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये झालेला तोटा त्याच स्त्रोतामधून वजा होत नसेल आणि तो इतर स्त्रोतामधील उत्पन्नामधून सुद्धा वजा होत नसेल तर तो पुढील वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड करता येतो. हा पुढील वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड केलेला तोटा पुढील वर्षातील उत्पन्नातून वजा करता येतो. यासाठी सुद्धा काही नियम आहेत. ज्या वर्षीचा तोटा पुढील वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करावयाचा आहे त्या वर्षीचे विवरणपत्र मुदतीत दाखल करणे बंधनकारक आहे. याला अपवाद घरभाडे उत्पन्न या स्त्रोतातील तोटा हा आहे. विवरणपत्र मुदतीत दाखल केले नसले तरी या स्त्रोतातील तोटा पुढील वर्षात कॅरी-फॉरवर्ड करता येतो. मागील वर्षांचे (ज्या वर्षी तोटा आहे) विवरणपत्र मुदतीत दाखल केले असले आणि या वर्षीचे विवरणपत्र मुदतीनंतर दाखल केले तर फक्त या वर्षीचा तोटा कॅरी-फॉरवर्ड करता येणार नाही, मागील वर्षांचा तोटा कॅरी-फॉरवर्ड करता येईल. विवरणपत्र मुदतीत दाखल केले नसल्यास हा तोटा पुढील वर्षात कॅरी-फॉरवर्ड करता येत नाही. परंतु त्याच वर्षीचा तोटा त्याच वर्षीच्या नफ्यातून, विवरणपत्र मुदतीनंतर दाखल केले असले तर, वजा करता येतो.


किती वर्षांसाठी आणि कसा वजा करता येतो
“घर भाडे उत्पन्न”, “उद्योग-व्यवसायातील उत्पन्न”, “भांडवली नफा” या स्त्रोतातील तोटा त्याच स्त्रोतातील उत्पन्नातून किंवा इतर उत्पन्नातून वजा न झाल्यास पुढील ८ वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करता येतो. पुढील वर्षांमध्ये हा तोटा फक्त त्याच स्त्रोताच्या उत्पन्नातूनच वजा करता येतो. परंतु, दीर्घमुदतीचा भांड्वली तोटा हा पुढील वर्षी फक्त दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातूनच वजा करता येतो. अल्पमुदतीचा भांडवली तोटा हा पुढील वर्षी दीर्घ आणि अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येतो. करदात्याचा तोटा वर नमूद केल्याप्रमाणे ८ किंवा ४ वर्षात नफ्यातून वजा होत नसेल तर तोट्याचा हक्क लोप पावेल.
“सट्टा व्यवसायातील तोटा” हा त्याच वर्षीच्या सट्टा व्यवसायाच्या नफ्यातून वजा न झाल्यास पुढील ४ वर्षांसाठी तो कॅरी फॉरवर्ड करता येतो. परंतु पुढील वर्षांमध्ये सुद्धा हा तोटा फक्त सट्टा व्यवसायाच्या उत्पन्नातूनच वजा करता येतो.
करदात्याला तोटा पुढील वर्षी कॅरी-फॉरवर्ड करतांना काळजी घेणे गरजेचे आहे. करदात्याने त्याला झालेल्या तोट्याची योग्य नोंद ठेवणे गरजेचे आहे. विवरणपत्रात मागील वर्षातील तोटा कॅरी फॉरवर्ड न केल्यास किंवा इतर उत्पन्नातून वजा न केल्यास तोट्याचा फायदा करदाता घेऊ शकणार नाही आणि त्याला जास्त कर भरावा लागू शकतो.

Story img Loader