डॉ . गिरीश वालावलकर

व्यवसाय कर्ज देताना बँका अत्यंत चिकित्सक रीतीने अर्जदाराच्या सर्व पैलूंची सखोल आणि सर्वांगींत तपासणी करतात तरीही बँक घोटाळे आणि कर्ज बुडवण्याच्या घटना सर्वत्र नियमितपणे घडतात. आपल्याला निरव मोदींचा पंजाब नॅशनल बँक घोटाळा किंवा विजय मल्याने स्टेट बँक ऑफ इंडियाचे बुडवलेले पैसे याविषयी माहिती असते परंतु असे प्रकार देशात सर्वत्र अगदी जिल्हा आणि तालुका पातळीवर सुद्धा घडत असतात . भारतात १ जून २०१४ ते ३१ मार्च २०२३ या ९ वर्षांच्या काळात भारतात एकूण पासष्ट हजार बँक घोटाळे आणि कर्ज बुडवण्याचे प्रकार उघडकीस आले आणि त्यामुळे भारतीय बँकांना एकूण चार लाख एकूण सत्तर हजार कोटी रुपये इतकं प्रचंड नुकसान सोसावं लागलं.

overseas debt become expensive due to the depreciating rupee
रुपयाच्या अवमूल्यनामुळे परदेशातून कर्ज उभारणी महाग
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Success Story Of IAS Siddharth Palanichamy
Success Story: यूपीएससीच्या अभ्यासासाठी सोशल मीडियाची मदत; पहिल्याच प्रयत्नात भरघोस यश; वाचा, देशातील सर्वांत तरुण IAS ची गोष्ट
Jumped Deposit Scam
बॅलेन्स चेक करताना बँक खातंच रिकामं; काय आहे नवीन ‘Jumped Deposit Scam’?
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
Success Story of a man Who Started Mushroom Farming Business With His Mother
Success Story : मायलेकाने केली कमाल! दररोज कमावतात ४० हजार रुपये; जाणून घ्या, कोणता व्यवसाय करतात?
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
Portfolio With Alpha
अल्फा पोर्टफोलिओ कसा तयार करायचा?

बँकेला झालेल्या तोट्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम बँकेत पैसे ठेवलेल्या ग्राहकांना भोगावे लागतात. येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांचा पाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला तेव्हा काही दिवसांसाठी बँकेचे व्यवहार बंद झाले. त्या बँकेत पैसे ठेवलेल्या ग्राहकांना त्यांचे पैसे परत मिळतील याची शाश्वती नव्हती. राकेश कुमार वाधवान यांच्या एच.डी.आय.एल. या कंपनीने पंजाब अँड महाराष्ट्र कॉपीराटीव्ह (पी.एम.सी) बँकेला आठ हजार कोटी रुपयांना फसवल्या नंतर रिझर्व्ह बँकेने सर्वच कॉऑपरेटिव्ह बँकांवर अनेक निर्बंध घातले. त्यामुळे देशभरातल्या अनेक सामान्य ग्राहकांना विविध अडचणींना तोंड द्यावं लागलं. त्या अडचणी ग्राहकांना अजूनही, कमी-अधिक प्रमाणात जाणवत आहेत.

आणखी वाचा-‘बिझनेस लोन’ हे आव्हान का आहे? (भाग पहिला)

यामुळे बँका सुद्धा आता व्यवसाय कर्ज देताना अधिकाधिक सावध आणि चिकित्सक होऊ लागल्या आहेत . कर्ज मंजूर करण्यापूर्वी व्यवसायसंबंधी, आणि त्या व्यतिरिक्तसुद्धा अनेक तपशील त्या मागू लागल्या आहेत. बँकांच्या या भूमिकेमागची पार्श्वभूमी आणि कारणमीमांसा समजून घेऊन त्यांना शक्य तितकं सहकार्य करावं. ते सर्वांच्याच दूरगामी फायद्याचं आहे.

व्यवसायासाठी आवश्यक असलेलं अर्थसाहाय्य बँक किंवा वित्तीय संस्थेकडून व्यवसाय कर्जाच्या स्वरूपात घेण्याचे काही फायदे आणि त्याचबरोबर, काही तोटेसुद्धा आहेत.

फायदे

१ बँकेकडून कर्ज घेतलं तरीही बँक कंपनीच्या दैंनदिन कारभारात हस्तक्षेप करत नाही.
२ कर्जाची परतफेड झाली की बँकेचं कंपनीवर कोणतंही बंधन राहत नाही.
३ व्यवसाय कर्जावर कंपनी भरत असलेल्या व्याजाच्या रकमेवर कंपनीला करत सवलती मिळतात.
४ कर्जफेड दर महिन्याला मासिक हप्त्याच्या स्वरूपात करायची असल्यामुळे कर्जफेडीचं सुयोग्य आणि व्यावहारिक नियोजन करून योग्य मुदतीत कर्जफेड करता येते .

तोटे

१ कंपनीच्या सुरवातीला उत्पन्न मिळतंच असं नाही परंतु तरीही, कर्जफेडीसाठी प्रत्येक महिन्याला ठरलेला हप्ता द्यावाच लागतो. हे बऱ्याच वेळा जिकिरीचं ठरतं
२ बऱ्याच लहान कंपन्यांचा व्यवसाय हा सणासुदीच्या काळात किंवा एखाद्या विशिष्ट हंगामामध्येच चालतो . हंगाम संपल्यावर मिळणार उत्पन्नसुद्धा घटतं. त्या काळात कर्जाचे मासिक हप्ते भरणं कठीण होतं. त्यामुळे उत्पनाच्या कालावधीशी सांगड घालून हप्त्यांचं काटेकोर नियोजन आणि अंमलबजावणी करावी लागते.
३ जर कंपनी काही कारणामुळे पुरेसा फायदा कमवू शकली नाही आणि बँकेची रक्कम ठरलेल्या कालावधीत परत करू शकली नाही तर बँक कंपनीची आणि तिच्या संचालकांची वैयक्तिक मालमत्ता विकून आपले पैसे वसूल करू शकते.

आणखी वाचा-Money Mantra : आर्बिट्राज फंड काय असतो?

उद्योगांना कर्ज देण्यामुळे बँकांचा स्वतःचा व्यवसाय आणि फायदा वाढत असल्यामुळे बँकसुद्धा उद्योगांना कर्ज देण्याबाबत सकारात्मक असतात. कर्ज घेणारे बहुतेक उद्योजक सुद्धा कर्जाच्या पैशातून उद्योग सुरु करून अथवा वाढवून त्या योग्य मुदतीत कर्ज फेडण्याच्या प्रामाणिक उद्देशानेच कर्ज घेतात. योग्य मुदतीत कर्ज फेडण्याच्या उद्देश पूर्ण करण्यासाठी जर कर्जाची हाताळणी अतिशय शिस्तबद्ध रीतीने करावी लागते. कर्ज योग्य मुदतीत फेडण्यासाठी दोन गोष्टी काटेकोरपणे पाळाव्यात : १. कर्ज घेताना आवश्यक तेवढीच रक्कम घ्यावी आणि २. ती स्वतःच्या वैयक्तिक गरजा पुरवण्यासाठी वापरायचा मोह टाळून तिचा उपयोग केवळ आपल्या उद्योगामध्येच करावा.

आपण जेव्हा इतर कोणतही कर्ज घेतो तेव्हा आपल्याला नोकरी अन्य तत्सम साधनांमधून उत्पन्न मिळत असतं. त्या उत्पन्नातून कर्जफेड करायची असते. परंतु व्यवसाय कर्ज म्हणजे ‘बिझनेस लोन’ हे स्वतःच्या उत्पन्नाचं साधन निर्माण करण्यासाठी घेतलेलं कर्ज असतं. हा इतर कर्ज आणि व्यवसायकर्ज यामधील सर्वात मोठा आणि मूलभूत फरक आहे. त्यामुळेच व्यवसायकर्ज मिळवणं आणि ते योग्य मुदतीत फेडणं हे अधिक आव्हानात्मक असतं.

व्यावसायिक कर्ज योग्यरीतीने हाताळलं तर ती आपल्याला आयुष्यभर उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देणारी आनंददायक गुंतवणूक ठरते !

Story img Loader