Taxation of Minor Children in India: कोणतीही गुंतवणूक केल्यानंतर त्यावर कर भरावा लागतो. याप्रमाणे जेव्हा लहान मुलांच्या नावे गुंतवणूक केली जाते तेव्हाही अशाप्रकारे कर भरावा लागतो. पण याबाबत अनेकांना माहिती नसते. याबाबचे नियम काय आहेत? कर भरण्याची ही प्रक्रिया कशी असते जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लहान मुलांसाठीचे कर नियम:
मोठया व्यक्तींना ज्याप्रमाणे कराचा नियम आहे, त्याचप्रमाणे आयकर कायदा १९६१ च्या कलम ६ए (१ए) नुसार अल्पवयीन मुलांना मिळालेले पैसे आयकर विभागाअंतर्गत येतात.

लहान मुलांवर कधी कर आकारला जातो?

  • अल्पवयीन मुलांच्या नावे गुंतवणूक केल्यानंतर
  • बचत खाते
  • मुदत ठेव
  • चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम करणाऱ्या बाल कलाकारांच्या पगारावर

या गोष्टी लक्षात ठेवा

  • नियमांनुसार मुलांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असेल आणि त्यांचा पगार १५०० रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर कर आकारला जातो. पगार जर १५०० रुपयांपेक्षा कमी पगार असेल तर त्यावर कर आकारला जात नाही.
  • मुलांच्या नावावर केलेल्या वेगवेगळ्या गुंतवणुकीतून किंवा त्यांच्या पगारातून मिळणारे उत्पन्न मुलांच्या पालकांच्या उत्पन्नात जोडले जाते. त्यानंतर स्लॅबनुसार पालकांच्या एकूण उत्पन्नावर कर आकारला जातो.
  • जर पालकांचा घटस्फोट झाला असेल, तर कायद्यानुसार ज्या पालकाकडे कस्टडी आहे. त्यांच्या उत्पन्नात मुलाचे उत्पन्न जोडले जाते.
मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are the rules of income tax for children know under which conditions it is applicable pns