– कल्पना वटकर

सगळी सोंगं आणता येतात, पण पैशाचे सोंग आणता येत नाही, हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. तुमच्या पैशाची गरज भागविण्यासाठी आजच्या स्पर्धात्मक युगात अशा अनेक वित्तीय संस्था आहेत, ज्या तुमची कर्जफेडीच्या क्षमतेचा विचार न करता कर्ज देऊ करतात आणि तुम्हालादेखील असे विनासायास उपलब्ध होणारे कर्ज घेण्याचा मोह होतो. वाढत्या दैनंदिन गरजा, मागणी आणि रोखतेची कमतरता यामुळे गरजवंत व्यक्ती हा बँका आणि विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन आपली गरज भागवतात.

rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
Use UPI without Bank account NPCI launches new feature UPI Circle for family members and friends
आता बँक खाते नसलेला व्यक्ती करू शकतो UPIचा वापर; NPCIने कुटुंबातील सदस्यांसाठी सुरू केलं UPI Circle, जाणून घ्या नव्या फीचरबद्दल…
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ

कर्जफेडीची क्षमता लक्षात घेऊन कर्ज घेतल्यास असे कर्ज हे मालमत्तेत भर घालते. तसेच तुमचा चांगला ‘क्रेडिट स्कोअर’ (पत मानांकन) तयार होण्यास मदत होते. अव्वल क्रेडिट स्कोअर भविष्यात कर्ज घेणे सुलभ करतो. फेडण्याची क्षमता असेल तर कर्ज घेणे कधीही वाईट नसते. गृहकर्ज घेणे चांगले समजले जाते, कारण तुम्ही तुमची संपत्ती वाढवण्यासाठी पैसे खर्च करत आहात. याव्यतिरिक्त, जर तुम्ही वेळेवर कर्जाची परतफेड करत असाल तर अशा कर्जामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारेल. तुम्ही एखादे कर्ज घेत असाल किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल तर एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा एखादे आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, क्रेडिट कार्डवर कर्ज घेत असाल तर ते कर्ज जास्त व्याजदराचे कर्ज असते हे लक्षात घेतले पाहिजे. कर्जाचा सापळा ही अशी परिस्थिती असते, जिथे तुम्हाला तुमच्या मागील कर्जाची परतफेड करण्यासाठी कर्ज घ्यावे लागते. अशा तऱ्हेने तुम्ही कर्जाच्या सापळ्यात अडकता.

हेही वाचा – तलवारीपेक्षा लेखणी बलवान !

कालांतराने, कर्ज नियंत्रणाबाहेर वाढू लागते आणि परतफेड करण्याची क्षमता संपुष्टात येते आणि शेवटी अशी कर्जबाजारी व्यक्ती कर्जाच्या सापळ्यात अडकते. वैयक्तिक कर्ज हे आर्थिकदृष्ट्या अयोग्य समजले जाते, कारण कर्जावर आकारले जाणारे व्याजदर, जसे की क्रेडिट कार्ड, विनातारण कर्ज वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर खूप जास्त असतो.

कर्जाच्या सापळ्यात अडकला असण्याचे संकेत कोणते?

उत्पन्नाच्या ५० टक्क्यांहून अधिक रक्कम कर्जाचा हप्ता देण्यात खर्च होत असेल तर हा एक चिंताजनक संकेत आहे. क्रेडिट कार्डची कमाल मर्यादा गाठली असल्यास, विद्यमान कर्ज फेडण्यासाठी जास्त व्याजाने नवीन कर्ज घेत आहात. शिवाय कौटुंबिक खर्च एकूण उत्पन्नाच्या जवळपास ७० टक्के असेल, जर क्रेडिट कार्ड कंपनीने सध्याच्या कर्जाच्या अटी आणि शर्ती बदलल्या असतील आणि अतिरिक्त आर्थिक भार निर्माण झाला असेल तर कर्जाच्या सापळ्यात अडकल्याचे हे संकेत आहेत. तसेच बचतीसाठी पैसे बाजूला ठेवणे परवडणे केवळ अशक्य असेल, स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी दीर्घकालीन आर्थिक अस्थिरता निर्माण करत आहात असे समजले जाते. टेलिफोन, मोबाइल, विजेची बिले भरण्यात पुरेशी शिल्लक नसणे, बिले वेळेवर चुकती न करता आल्याने क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होईल, ज्यामुळे भविष्यातील सर्व प्रकारच्या कर्जांसाठी अधिक व्याज द्यावे लागेल.

कर्जाचे सापळे आर्थिक वर्तनात वाईट समजले जातात. अतिरिक्त कर्ज असलेल्या लोकांना मानसिक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो, जसे की दीर्घकाळापर्यंत ताण, नैराश्य आणि चिंतेचा सामना करावा लागतो. कर्जामुळे शारीरिक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जाऊ लागण्याची शक्यता असते. कर्जाच्या सापळ्यातून बाहेर पडण्यासाठी खर्च कमी करून जास्त व्याजाचे कर्ज लवकर फेडणे आवश्यक आहे. ‘डेट कंसोलिडेशन’ अंतर्गत कर्जे एकाच कर्जामध्ये एका व्याजदरासह एकत्रित केली जातात आणि जर ‘क्रेडिट युटिलायझेशन रेशो’ कमी करत असेल तर क्रेडिट स्कोअर सुधारण्यास मदत होऊ शकते. कर्जे एकत्रित केल्याने परतफेड करणे सोपे होऊ शकते आणि व्याजावर होणारा खर्च कमी होण्यास मदत होते. कर्जाच्या मुदतीचा कालावधी अधिक असेल तर व्याज अधिक भरावे लागते. कर्ज एकत्रीकरणामुळे क्रेडिट स्कोअर सुधारण्यास मदत होऊ शकते. जर क्रेडिट युटिलायझेशन रेशो (कमाल मर्यादेच्या प्रत्यक्ष वापराचे प्रमाण) कमी केला, मात्र कोणत्याही नकारात्मक परिणामांसाठी क्रेडिट रिपोर्ट्स आणि स्कोअरचे निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे. ‘डेट सेटलमेंट’ अंतर्गत कर्जाची शिल्लक देय असलेल्या रकमेपेक्षा कमी भरण्यासाठी वाटाघाटी केली जाते, तथापि वाटाघाटी केलेल्या खात्यासाठी उशिरा आणि मागील देय पेमेंट इतिहासामुळे क्रेडिट स्कोअरला हानी पोहोचू शकते. शिवाय कर्ज वाटाघाटीची बँक आणि वित्तीय संस्था अधिक शुल्क आकारतात. देय असलेल्या रकमेपेक्षा कमी कर्ज फेडता येते आणि कर्जदाराच्या खटल्यांसह वसुली प्रकिया थांबवली जाते. ‘डेट सेटलमेंट’ अर्थात कर्ज वाटाघाटीचा फायदा असा आहे की, संपूर्ण थकबाकी न भरता कर्जाची रक्कम कमी करू शकता. कर्ज फेडण्यासाठी हा एक आकर्षक पर्याय असू शकतो, जरी त्याचा तुमच्या क्रेडिट इतिहासावरदेखील हानीकारक प्रभाव पडेल. हे लक्षात घेणे देखील महत्त्वाचे आहे की, कर्जदारांना वाटाघाटी करताना ते स्वीकारण्याचे कोणतेही बंधन नाही. कर्जाचा सापळा कसा टाळायचा?

खर्च तीन प्रकारांमध्ये विभागने गरजेचे आहे:

– गरजा, अर्ध-आवश्यक खर्च आणि अनावश्यक खर्च. अर्ध आणि अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी आर्थिक वर्तनात बदल करणे आवश्यक आहे. कर्जाची दोन गटांत विभागणी करा:

– उत्पादक आणि गैर मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आलेले कर्ज महसूल मिळवून देण्यास मदत करू शकते किंवा राहत्या घरासाठी घेतलेले कर्ज जीवनमान उंचावते. अशा कर्जांना चांगली कर्जे म्हणतात. जेव्हा एखाद्या मालमत्तेवर कर्ज घेतले जाते आणि त्यातून कोणताही महसूल मिळत नाही तेव्हा अनावश्यक कर्ज समजले जाते. कर्ज फेडण्याची क्षमता नसताना राहते घर गहाण ठेऊन सेकंड होम अर्थात दुसऱ्या घरासाठी घेतलेले कर्ज आर्थिक आरोग्य बिघडविण्यास कारण ठरू शकते. अनावश्यक कर्ज घेणे टाळले तर निरोगी आर्थिक व्यवस्थापनाच्या दिशेने वाटचाल होत आहे असे समजावे. जर एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कर्ज किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर जास्त व्याजदर किंवा कर्जाच्या सापळ्यांपासून वाचण्यासाठी ते वेळेवर कर्जफेड सुनिश्चित करा. म्युच्युअल फंड, बँक ठेवी आणि समभाग (इक्विटी) यासारख्या उच्च परताव्याच्या गुंतवणुका असल्यास, कर्ज फेडण्यासाठी त्यांचा वापर करू शकता. कर्ज फेडल्यानंतर संपत्तीच्या पुनर्बांधणीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

हेही वाचा – बाजारातली माणसं : बाप से बेटा सवाई – उत्पल शेठ

आर्थिक आणीबाणीसाठी आपत्कालीन निधी तयार ठेवणे आवश्यक आहे. हा आपत्कालीन निधी किमान ३ ते ६ महिन्यांच्या खर्चाइतका असावा. हा निधी कर्ज न घेता कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मदत करू शकतो. हे पैसे विविध उच्च तरलता असणाऱ्या गुंतवणूक साधनात (जसे की, म्युच्युअल फंड, बँकेच्या ठेवी) आणि बँकांच्या बचत खात्यांमध्ये ठेवू शकता. त्यामुळे बचत आणि गुंतवणुकीचे धोरण असण्याबरोबरच कर्ज धोरण असणेही तितकेच महत्त्वाचे आणि गंभीर आहे. हे पैसे व्यवस्थापित करण्यात, कर्जावर मात करण्यास आणि आर्थिकदृष्ट्या निरोगी जीवन जगण्यास मदत करू शकते. कर्जाच्या सापळ्यात अडकण्यापासून स्वतःला रोखण्यासाठी कर्ज धोरण असणे देखील आवश्यक आहे. आत्महत्या हा कर्जाच्या सापळ्यातून सुटण्याचा मार्ग असू शकत नाही. कर्जदात्याला वारसांकडून किंवा मालमत्ता विकून कर्जाची वसुली करण्याचा अधिकार कायद्याने दिला आहे. म्हणूनच कोणतेही कर्ज घेण्यापूर्वी ते कर्ज फेडण्याची क्षमता असल्याची खात्री केल्यानंतरच कर्ज घेतले पाहिजे. विविध कर्जदाते आज मधाचे बोट दाखवत असले तरी कर्ज फेडण्याची क्षमता नसल्यास कर्ज घेण्यापूर्वी सावधगिरी बाळगा.