गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना बँक किंवा अन्य कोणत्याही पर्यायांपेक्षा जास्त रिटर्न मिळावा यासाठीच गुंतवणूक करत असतात. अशा वेळी मिडकॅप आणि स्मॉल कॅप फंड त्यांचे आवडते फंड ठरतात. त्याचबरोबर अलीकडच्या काही वर्षात म्युच्युअल फंडातील थिमेटिक फंडांनी घसघशीत रिटर्न दिल्यामुळे गुंतवणूकदारांचा अशा फंडांकडे ओढा वाढला आहे. याबरोबरच सेक्टोरल फंड गुंतवणूकदारांना आपल्या पोर्टफोलिओचा भाग असावा असे वाटू लागले आहे. नेमके असे फंड एकत्र पोर्टफोलिओचा भाग असताना पोर्टफोलिओ व्यवस्थापन कसे करायचे ? हा गुंतवणूकदारांसाठी कायमच चिंतेचा विषय असतो.

शेअर बाजार आणि अर्थातच अर्थव्यवस्था चक्राकार गतीने पुढे जात असते. कोणते एखादे क्षेत्र सध्या घसघशीत परतावा देत आहे तेच पुढचे अनेक वर्ष हिट असेल याची शाश्वती देता येत नाही. बाजारामध्ये आयटी, ऑटो, फार्मा, इन्फ्रास्ट्रक्चर अशा कोणत्या सेक्टरने गुंतवणूकदारांना किती लाभ होईल याचा खात्रीशीर आकडा देता येत नाही. तरीही लाटेवर स्वार होण्याची इच्छा आणि प्रवृत्ती भारतीय गुंतवणूकदारांमध्ये वाढायला लागलेली दिसते.

77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
agricultural pumps powered
राज्यात १.३० लाखांवर कृषिपंपांना दिवसा ‘ऊर्जा’, सौर ऊर्जेद्वारे…

आणखी वाचा: बाजारातील संधींनुरूप गुंतवणुकीत बदल हवाच!

या फंड योजनांमध्ये एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील किंवा लाटेवर स्वार होणाऱ्या तेजीतील कंपन्या हेरून त्यात गुंतवणूक केली जाते. योग्यवेळी बाजारात एंट्री आणि योग्यवेळी एक्झिट न घेतल्यास त्यामध्ये धोका असतोच. असे असले तरीही गुंतवणूकदारांना त्याचा मोह आवरता येणे कठीण आहे.

फंडांची कामगिरी
फंडांची कामगिरी

गेल्या वर्षभरापासून भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी जोरदार नफा कमवला आहे. जागतिक बाजारात अस्थिरता असतानाही कंपन्यांचा व्यवसाय सतत वाढतोच आहे. असे असले तरीही एकूण आयटी सेक्टरने गुंतवणूकदारांना सुगीचे दिवस आणलेले नाहीत. निफ्टी आयटी इंडेक्स निफ्टीच्या तुलनेत कमी परफॉर्मन्स देतो आहे. असे असले तरीही फंड मॅनेजर्सनी मोठ्या आणि मध्यम आकारातील आयटी कंपन्यांचे शेअर आपल्या पोर्टफोलिओतून कमी केलेले नाहीत. यातूनच सेक्टरवरील विश्वास दिसून येतो.

आणखी वाचा: Money Mantrta: कॅरेटलेन डीलने टायटनला नवी झळाळी

वर्षभरातील बाजाराचा आणि म्युच्युअल फंडाचा आढावा घेतल्यास काही म्युच्युअल फंड योजनांनी गुंतवणूकदारांना घसघशीत नफा पदरी पाडून दिला आहे.

पूर्वी फक्त बँकिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर या दोन सेक्टर फंडाचा बोलबाला असायचा. आता मल्टिनॅशनल कंपनी फंड, बिझनेस सायकल फंड, ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक्स फंड, रिसोर्सेस अँड एनर्जी फंड असे विविध पर्याय गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध झाले आहेत.  पोर्टफोलिओचा विस्तार करताना कायमच लार्ज कॅप, मिडकॅप आणि स्मॉल कॅप या तिन्ही कॅटेगिरी मधील फंड आपल्याजवळ असायला हवेत. त्याचबरोबर अधिक जोखीम घेण्याची तयारी असेल तर सेक्टरल किंवा थिमेटिक फंडाचा पर्यायही गुंतवणूकदारांनी विचारात घ्यायला हरकत नाही. याबरोबरच एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला  पाहिजे. जेवणाच्या मेन्यू मधील मुख्य पदार्थ जसे  स्वीट डिश किंवा चाट असू शकत नाहीत, तसेच सेक्टरल किंवा थिमेटिक फंड तुमच्या पोर्टफोलिओचा मोठा भाग असणे गुंतवणुकीच्या आदर्श नियमांमध्ये अजिबात बसत नाही.

** सदर लेखात नामोल्लेख असलेल्या कोणत्याही फंडात गुंतवणूक करावी अशी शिफारस करण्यात आलेली नाही. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक योजनांसंदर्भात जोखीम समजून घेऊन, गुंतवणूक सल्लागाराच्या माध्यमातूनच गुंतवणूक करावी.

Story img Loader