प्रवीण देशपांडे
प्राप्तिकर कायद्यात भांडवली संपत्तीची विक्री केल्यास त्यावर होणारा नफा किंवा तोटा हा “भांडवली नफा” या उत्पन्नाच्या स्त्रोतात, उत्पन्न असेल तर, करपात्र होतो किंवा तोटा असेल तर इतर भांडवली नफ्यातून वजा होतो किंवा पुढील वर्षासाठी कॅरी-फॉरवर्ड होतो. कर आकारणीसाठी भांडवली नफा हा दोन प्रकारात विभागला जातो. एक म्हणजे अल्पमुदतीचा आणि दुसरा दीर्घमुदतीचा. या मुदतीनुसार त्यावर किती वजावटी मिळतात किंवा कर लागतो हे ठरते. यासाठी भांडवली संपत्ती म्हणजे काय ते समजून घेतले पाहिजे.

भांडवली संपत्ती म्हणजे काय?

प्राप्तिकर कायद्यात भांडवली संपत्तीत कोणत्या संपत्तीचा समावेश होतो आणि कोणत्या संपत्तीचा समावेश होत नाही ते सांगितले आहे. खालील संपत्तीचा समावेश भांडवली संपत्ती म्हणून होतो. कोणत्याही प्रकारची मालमत्ता जी करदात्याच्या उद्योग-व्यवसायाशी संबंधित असो किंवा नसो, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदाराने (एफ,आय,आय,) सेबी कायदा, १९९२ अंतर्गत केलेल्या नियमांनुसार केलेली सिक्युरिटीजमधील गुंतवणूक, ज्या युलिपला कलम १० (१० डी) अंतर्गत मिळणारी सवलत लागू होत नाही.

mita shetty
टाटा इंडिया इनोव्हेशन फंडाची कामगिरी कशी राहील?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
Redevelopment is essential for safety middle class citizen Lands freehold
सुरक्षिततेसाठी पुनर्विकास अपरिहार्य

आणखी वाचा-Money Mantra : एचडीएफसी समूह या सहा बँकांमध्ये हिस्सेदारी विकत घेणार; जाणून घेऊया याविषयी सर्व काही

‘या’ संपत्तीचा भांडवली संपत्ती म्हणून समावेश होत नाही

उद्योगासाठी लागणारा माल किंवा व्यापारातील साठा : जे करदाते ज्या वस्तूंचे निर्माण किंवा व्यापार करतात त्यासाठी लागणारा माल आणि त्याचा साठा ही भांडवली संपत्ती होत नाही. ज्या व्यक्ती सोन्याचांदीचा व्यापार करतात त्यांच्यासाठी सोने किंवा त्याचे दागिने ही भांडवली संपत्ती होत नाही. त्याच्या विक्रीवर होणारा नफा हा उद्योग-व्यवसायाचे उत्पन्न समजले जाते. तसेच निवासी किंवा व्यापारी संकुल तयार करून विकणाऱ्या बांधकाम व्यावसायिकासाठी उद्योग म्हणून तयार केलेली घरे किंवा व्यापारी जागा भांडवली संपत्ती समजली जात नाही, ती व्यापारातील साठा म्हणून समजली जाते. परंतु त्याच्या स्वतःच्या वापरासाठी (जी इतरांना विकण्यासाठी नाही) बांधलेली व्यापारी जागा त्याच्यासाठी भांडवली संपत्ती आहे.

करदात्याने किंवा त्याच्यावर अवलंबून असलेल्या त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने वैयक्तिक वापरासाठी ठेवलेल्या जंगम मालमत्ता जसे कपडे, भांडी, फर्निचर, वगैरे. यातून खालील संपत्ती वगळण्यात आली आहे, म्हणजेच खालील संपत्ती जरी वैयक्तिक कारणांसाठी वापरली जात असेल तरी भांडवली संपत्ती असेल.

आणखी वाचा-Money Mantra : युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन म्हणजे नेमकं काय?

दागिने : सोने, चांदी, प्लॅटिनम किंवा इतर कोणत्याही मौल्यवान धातूपासून बनवलेले दागिने किंवा अशा एक किंवा अधिक मौल्यवान धातूंचा समावेश असलेले कोणतेही धातूंचे दागिने, मौल्यवान किंवा अर्ध-मौल्यवान दगड, कपड्यांमध्ये शिवलेले असले तरी, पुरातत्व वस्तूंचा संग्रह, रेखाचित्रे, चित्रे, शिल्प किंवा कोणतीही कलाकृती

खेडेगावातील शेत जमीन : खेडेगावातील शेतजमीन ही भांडवली संपत्ती समजली जात नाही त्यामुळे त्याच्या विक्रीवर होणारा भांडवली नफा हा करपात्र नाही. खाली नमूद केलेली जमीन खेडेगावातील शेत जमीन म्हणून समजली जात नाही.

नगरपालिका, अधिसूचित क्षेत्र समिती, टाउन एरिया कमिटी, कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि ज्यांची लोकसंख्या १०,००० पेक्षा जास्त आहे, कोणत्याही नगरपालिका किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या स्थानिक हद्दीपासून हवाई पद्धतीने मोजले जाणारे खालील अंतर २ किमी पेक्षा जास्त नसेल, जर क्षेत्राची लोकसंख्या १०,००० पेक्षा जास्त असेल परंतु १ लाखापेक्षा जास्त नसेल, ६ किमी पेक्षा जास्त नसेल, जर क्षेत्राची लोकसंख्या १ लाखांपेक्षा जास्त असेल परंतु १० लाखापेक्षा जास्त नसेल, ८ किमी पेक्षा जास्त नसेल, जर क्षेत्राची लोकसंख्या १० लाखापेक्षा जास्त असेल.

केंद्र सरकारने जारी केलेले साडेसहा टक्के सुवर्ण रोखे,१९७७ किंवा ७ टक्के सुवर्ण रोखे, १९८० किंवा राष्ट्रीय संरक्षण सुवर्ण रोखे, १९८०. स्पेशल बेअरर बॉण्ड्स, १९९१. गोल्ड डिपॉझिट स्कीम, १९९९ अंतर्गत जारी केलेले गोल्ड डिपॉझिट बाँड्स किंवा गोल्ड मॉनेटायझेशन योजना, २०१६ अंतर्गत जारी केलेले ठेव प्रमाणपत्रे.

आणखी वाचा-Money Mantra : क्षेत्र अभ्यास : माहिती तंत्रज्ञान उद्योग – नवीन व्यावसायिक आणि गुंतवणूक संधी

भांडवली संपत्ती अल्पमुदतीची किंवा दीर्घ मुदतीची कधी होते?

भांडवली नफ्यावरील कर, ती संपत्ती अल्पमुदतीची आहे का दीर्घमुदतीची आहे यावर अवलंबून असते. यानुसार भांडवली नफा सुद्धा हा दोन प्रकारात विभागला जातो. एक दीर्घमुदतीचा आणि दुसरा अल्पमुदतीचा. या दोन्ही प्रकारच्या भांडवली नफ्यावर आणि त्याच्या कर आकारणीवर सवलती आणि कराचा दर वेगवेगळा आहे. साधारणतः संपत्ती खरेदी केल्या तारखेपासून ३६ महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी धारण केल्यास ती संपत्ती दीर्घमुदतीची होते. अन्यथा अल्पमुदतीची. याला काही अपवाद आहेत. शेअरबाजारात सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स, इक्विटी फंडातील युनिट्स, किंवा सूचीबद्ध सिक्युरिटीज यांच्यासाठी हा कालावधी १२ महिन्यांचा आहे. म्हणजेच असे सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स वगैरे १२ महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी धारण केल्यास ती दीर्घ मुदतीची संपत्ती होते. शेअरबाजारात सूचीबद्ध नसलेल्या किंवा खाजगी कंपन्यांसाठी हा कालावधी २४ महिन्यांचा आहे. तसेच स्थावर मालमत्तेसाठी सुद्धा हा कालावधी २४ महिन्यांचा आहे. १ एप्रिल, २०२३ नंतर खरेदी केलेले डेब्ट फंडातील युनिट्स ही अल्पमुदतीची संपत्तीच असेल जरी ती ३६ महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी धारण केली असली तरी. ३१ मार्च, २०२३ पूर्वी खरेदी केलेल्या डेब्ट फंडातील युनिट्स साठी मात्र ३६ महिन्यांचा धारणकाळ ती संपत्ती अल्पमुदतीची आहे की दीर्घमुदतीची यासाठी लागू आहे.

भांडवली नफ्यावरील कर आकारणी

कोणत्याही गुंतवणुकीची विक्री केल्यास त्यावर होणाऱ्या भांडवली नफा हा करपात्र आहे. दीर्घमुदतीच्या भांडवली संपत्तीच्या विक्रीवर होणारा भांडवली नफा दीर्घमुदतीचा असतो अन्यथा अल्पमुदतीचा. या दोन्ही प्रकारच्या भांडवली नफ्यावर आणि त्याच्या कर आकारणीवर सवलती आणि कराचा दर वेगवेगळा आहे. दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यासाठी साधारणतः २०% इतका कर आहे तर अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यासाठी त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर भरावा लागतो. याला काही अपवाद आहेत. शेअरबाजारात सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सच्या आणि इक्विटी फंडातील युनिट्स मधील दोन्ही प्रकारच्या भांडवली नफ्यासाठी सवलतीच्या दरात कर भरण्याची तरतूद आहे. शेअरबाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे समभाग आणि इक्विटी फंडातील युनिट्सच्या दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावरील प्रथम १ लाख रुपयांवर कर भरावा लागत नाही आणि त्यावरील रकमेवर १०% इतक्या सवलतीच्या दराने कर भरावा लागतो. हेच समभाग किंवा युनिट्स अल्पमुदतीत विकले तर त्यावर १५% दराने कर भरावा लागतो.

आणखी वाचा-Money Mantra : फंड विश्लेषण – पी.जी.आय.एम. इंडिया लार्ज कॅप फंड

करनियोजन

दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावर सवलतीच्या दराने कर भरावा लागतो. या तरतुदींचा फायदा घेऊन आर्थिक नियोजन केल्यास कर वाचू शकतो. संपत्ती दीर्घमुदतीची झाल्यानंतर त्याची विक्री केल्यास सवलतीच्या दरात कर भरता येतो आणि शिवाय घर, बॉंड, मध्ये गुंतवणूक केल्यास करदायित्व कमी करता येते किंवा संपूर्ण कर वाचविता येऊ शकतो. अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यावर करदात्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर भरावा लागतो आणि शिवाय घर किंवा बॉंडमधील गुंतवणूक करून कर वाचविण्याचे पर्याय देखील नाहीत. त्यामुळे कोणत्याही संपत्तीची विक्री करतांना त्ती दीर्घमुदतीची झाल्यावर विकणे हे फायदेशीर आहे.