Tax On Inherited Property : आपल्या पूर्वजांची मालमत्ता आपल्यासाठी खूप महत्त्वाची असून, ती मालमत्ता विकणे खूप कठीण आहे. विशेष म्हणजे आपल्याला मालमत्ता विक्रीच्या करामध्येही बऱ्याचदा संभ्रम असतो. वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेवर कर आकारला जाईल की नाही याबद्दल अनेकदा गोंधळून जायला होतं. आज आम्ही तुमचा हा गोंधळ दूर करणार आहोत.

समजा, तुम्हाला एखादी मालमत्ता वारसाहक्काने मालमत्ता मिळाली आहे, तुम्ही ठरवलं त्यावर कोणताही कर भरायचा नाही. मग तुम्ही त्या मालमत्तेबद्दल प्राप्तिकर विभागाला कळवले, परंतु त्यावर कोणताही कर भरला नाही, तर असे चालणार नाही. तुम्हाला वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता विकली तर त्या मालमत्तेवर कर भरावा लागणार आहे.

Kavadi for lord importance of kavadi price of a kavadi
लोक-लौकिक : ‘कवडी’मोल!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Devendra Fadnavis and PM Narendra Modi
Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “देवाभाऊ” म्हणताच दिलखुलास हसले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नेमकं काय घडलं?
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
torres financial fraud loksatta news
Money Mantra : टोरेससारखी फसवणूक टाळायची असेल तर हा लेख तुमच्यासाठीच
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
Image Of Priyanka Gandhi And PM Modi
Dollar vs Rupee : “रुपयाच्या घसरणीचे सर्व विक्रम मोडले, पंतप्रधानांनी जनतेला उत्तर द्यावे”, प्रियांका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

वारशात मिळालेल्या मालमत्तेत कोणाचा समावेश होतो?

वारशात मिळालेल्या मालमत्तेबाबतही अनेक संभ्रम आहेत. वारशाने मिळालेली मालमत्ता कोणती हाच प्रश्न अनेकांना पडतो. वारशाने मिळालेल्या मालमत्तेमध्ये आपल्या वडील, आजोबा किंवा पणजोबा यांच्याकडून मिळालेली जमीन किंवा मालमत्ता यांचा समावेश असतो. जर आपल्याला आपल्या आईच्या कुटुंबाकडून म्हणजे आजोबा, मामा किंवा इतर नातेवाईकांकडून कोणतीही मालमत्ता मिळाली तर तिला वारसाहक्की संपत्ती म्हणत नाही. प्राप्तिकर कायदा १९६१ अंतर्गत अशा मालमत्तेचा तपशील देणे आवश्यक आहे.

हेही वाचाः मोठी बातमी! लोकसभेत डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक मंजूर

वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेवर कोणाला कर भरावा लागतो?

वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेच्या विक्रीवर सगळ्यांनाच कर भरावा लागतो. मालमत्तेवर आकारला जाणारा कर भरण्याची जबाबदारी मालमत्तेच्या मालकाची असते. वारशात मिळालेली कोणतीही मालमत्ता भेट म्हणून गणली जाते आणि ती करमुक्त असते. परंतु ही मालमत्ता विकल्यास त्यावर कर आकारला जातो. हा कर भांडवली नफ्याच्या श्रेणीत येतो. त्यासाठी तुम्हाला भांडवली नफ्याचे दीर्घकालीन किंवा अल्प मुदतीचे वर्गीकरणदेखील करावे लागेल. तुम्ही कोणतीही मालमत्ता किती काळ ठेवली आहे, यावर ते अवलंबून आहे. समजा तुमची वडिलोपार्जित मालमत्ता दोन वर्षांसाठी आहे, त्यानंतर तुम्ही ती विकली. जेव्हा तुम्ही मालमत्ता विकता तेव्हा तुमच्याकडे जो काही महसूल येतो, तो म्हणजे विक्रीची रक्कम ही दीर्घकालीन भांडवली नफा मानली जाते.

हेही वाचा: ITR Filing : गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल-जूनदरम्यान दुप्पट ITR भरले, रिटर्नची संख्या ‘इतक्या’ कोटीनं ओलांडली

वारशात मिळालेल्या मालमत्तेबाबत कायदा काय सांगतो?

वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेबाबत प्राप्तिकर कायद्यातही काही नियम आहेत. प्राप्तिकर कायद्यानुसार १ एप्रिल १९८१ पूर्वी मालमत्ता वारसाहक्काने मिळाली असेल, तर मालमत्तेच्या मालकाला मालमत्तेचे वाजवी बाजारमूल्य रूपांतरित करण्याचा पर्याय आहे. जर मालमत्ता १ एप्रिल २००१ नंतर वारसाहक्काने मिळाली असेल, तर संपादनाची किंमत ५०,००० रुपये मानली जाते. १ एप्रिल १९८१ नंतर वारशाने मिळालेल्या मालमत्तेच्या बाबतीत तुम्ही कर उद्देशांसाठी मालकांनी भरलेली रक्कम सेट ऑफ करू शकणार नाही. तसेच बर्‍याच प्रकरणांमध्ये तुम्हाला ज्या वर्षात वारशात मालमत्ता मिळते, तेव्हापासून तुम्ही इंडेक्सेशनच्या लाभासाठी पात्र ठरता.

Story img Loader