– सलील उरुणकर

नवीन व्यवसाय सुरू करायचा म्हणजे भांडवल पाहिजे. आता हे भांडवल किती प्रमाणात लागेल आणि किती दिवस पुरेल जेणेकरून व्यवसायात तग धरून राहता येईल याबाबत प्रत्येक नवउद्योजकाची गरज वेगवेगळी असते. हा भांडवलनिधी दीर्घकाळासाठी स्वतः उभा करायचा की सुरवातीपासूनच ‘फंडिंग’च्या मागे लागायचे याबाबत स्टार्टअप क्षेत्रात अनेक मतप्रवाह आहेत.

Kavadi for lord importance of kavadi price of a kavadi
लोक-लौकिक : ‘कवडी’मोल!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Jumped Deposit Scam
बॅलेन्स चेक करताना बँक खातंच रिकामं; काय आहे नवीन ‘Jumped Deposit Scam’?
torres financial fraud loksatta news
Money Mantra : टोरेससारखी फसवणूक टाळायची असेल तर हा लेख तुमच्यासाठीच
aishwarya narkar gives tips for couple to save money
“घर घ्यायचं ठरलं तेव्हा, वर्षाला २ लाख…”, संसारात पैशांची बचत कशी करावी? ऐश्वर्या नारकरांनी सांगितला अनुभव
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
Portfolio With Alpha
अल्फा पोर्टफोलिओ कसा तयार करायचा?
Image Of Priyanka Gandhi And PM Modi
Dollar vs Rupee : “रुपयाच्या घसरणीचे सर्व विक्रम मोडले, पंतप्रधानांनी जनतेला उत्तर द्यावे”, प्रियांका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

‘पुलिंग युवरसेल्फ अप बाय दी बूटस्ट्रॅप्स’ हा इंग्रजीमधील वाक्प्रचार एकोणिसाव्या शतकापासून वापरला जात आहे. कालांतराने रुपक म्हणून एखादी अशक्य गोष्ट साध्य करण्यासाठी कमीतकमी पैसे किंवा संसाधने वापरून केलेली मेहनत याला बूटस्ट्रॅप करणे असे म्हटले जाऊ लागले. व्यावसायिक क्षेत्रामध्येही त्याचा वापर सुरू झाला. आपल्या स्वतःच्या बचतीमधून किंवा कुटुंबातील सदस्य वा मित्रांकडून घेतलेल्या ‘कर्जा’च्या आधारे तसेच कंपनीच्या ऑपरेटिंग रेव्हेन्यूमधून काढलेल्या पैशातून होत असलेल्या व्यवसायाला ‘बूटस्ट्रॅप्ड’ स्टार्टअप असे म्हटले गेले. या बूटस्ट्रॅपिंगचा अर्थ बाह्य स्वरुपातील व्यक्तिगत वा संस्थात्मक गुंतवणूक न घेता केलेला व्यवसाय. आपली स्टार्टअप कंपनी बूटस्ट्रॅप ठेवायची असेल तर साहजिकच नवउद्योजकांना नजिकच्या भविष्यातील भांडवली व दैनंदिन परिचालनाचा खर्च तसेच व्यवसाय विस्तारासाठी लागणारा निधी या सर्वांचा विचार करून त्याप्रमाणात नफा मिळवता आला पाहिजे. साधारणतः एक ते दीड वर्षाच्या कालावधीसाठी पुरेल एवढा निधी नवउद्योजकांकडे असेल तर ते बूटस्ट्रॅप पद्धतीने व्यवसाय सुरू ठेवू शकतात, असे सर्वसाधारणपणे मांडले जाते.

हेही वाचा – Money Mantra: नवविवाहितांसाठी फायनान्शिअल प्लॅनिंग #couplegoals – 2

स्वतःच्या पैशातून व्यवसाय केला तर विस्तारावर मर्यादा येतात, मात्र बाह्य गुंतवणुकदारांकडून गुंतवणूक घेतल्यास विस्तार करणे सोपे होते पण काही अन्य गोष्टींवर मर्यादा येतात. व्हेन्चर कॅपिटल किंवा व्हीसी फंडिंगच्या माध्यमातून गुंतवणूक घेतल्यास गुंतवणूकदारांना काही ठराविक कालावधीमध्ये म्हणजे साधारतः १० वर्षांत ‘एक्झिट’ मिळवून देण्याचे ओझे उद्योजकांवर असते. बूटस्ट्रॅपिंगचा फायदा असा की कंपनीची मालकी पूर्णतः नवउद्योजकांकडे राहते. भागीदारीमध्ये सहसंस्थापक असले तरी बाह्य गुंतवणुकदारांच्या तुलनेत ते अधिक फायद्याचे ठरते. याचा दुसरा एक फायदा म्हणजे निर्णयप्रक्रियेवर कोणत्याही बाह्य व्यक्तीचा प्रभाव राहत नाही. त्यामुळे आपल्या कंपनी किंवा व्यवसायाच्या वाढीसाठी अनुकूल निर्णय व धोरणे नवउद्योजक घेऊ शकतात.

बूटस्ट्रॅपिंग कितीही हवीहवीशी वाटत असले तरी त्यामध्ये आव्हाने तितकीच आहेत. व्यवसायामध्ये नफ्यापेक्षा ‘कॅश-फ्लो’ अधिक महत्त्वाचा असतो हे जाणकार सांगतातच. त्यामुळे कॅश-फ्लो सुस्थितीत ठेवण्यासाठी ज्या तडजोडी किंवा उपाय करणे गरजेचे असते ते उद्योजकांनी करणे गरजेचे आहे. यामध्ये तंत्रज्ञानाधारित टूल्सचा उपयोग नवउद्योजकांना मोठ्या प्रमाणात करता येतो. ‘इक्विटी’ न देता गुंतवणूक मिळविण्यासाठी व्हेन्चर डेट फंडिंगसह अन्य पर्यायही उपलब्ध असतात. आपल्या क्षेत्रातील यशस्वी स्टार्टअप उद्योजकांशी किंवा तज्ज्ञांशी चर्चा करून या सर्व पर्यायांचा विचार नवउद्योजकांनी केल्यास त्यांचा फायदा होऊ शकतो.

हेही वाचा – Money Mantra: ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला पैसे मिळवून देणारी योजना

बूटस्ट्रॅप केलेल्या स्टार्टअप्सची काही यशस्वी उदाहरणे आपल्यासमोर आहेत. झिरोधा, झोहो अशी काही नावे भारतातील स्टार्टअप इकोसिस्टिममध्ये यशस्वी झाली आहेत. इलेक्ट्रॉनिक चॅनेलवर दिसणाऱ्या काही विशिष्ट कार्यक्रमांमध्ये ही नावे दिसत नाहीत, मात्र स्वबळावर यशस्वी झालेले हे खरे ‘शार्क’ आहेत. व्हीसी गुंतवणुकदारांकडून मिळालेल्या गैरवागणुकीनंतर अनेक नवउद्योजकांनी फंडिंग न घेता स्वतःच्या भांडवलावर आणि कष्टाने व्यवसाय वाढवावा असा मतप्रवाह बळावत आहे. यासाठी झिरोधा आणि झोहोचे उदाहरण वारंवार दिले जाते. एक मात्र नक्की, बूटस्ट्रॅप असो की व्हीसी फंडिंग मिळालेली स्टार्टअप, व्यवसायाच्या सुरुवातीच्या टप्प्यात नवउद्योजकांना प्रचंड आर्थिक शिस्तीत राहून आणि कमीतकमी संसाधनांचा वापर करूनच विस्तारासाठी पावले उचलावी लागतात. ही शिस्त पाळणारे आणि तारेवरची कसरत करून हा टप्पा पार पाडणारे नवउद्योजक यशोगाथा लिहितात, तर अन्य योग्य धडा शिकून पुढील वाटचालीसाठी तयार होतात.

Story img Loader