समभागाच्या किंमतीत अचानक खूप मोठी वाढ होणार असल्यास त्यावेळी बुल कॉल स्प्रेड स्ट्रॅटेजी केली जाते. शेअर बाजारात निर्देशांक/शेअर्सच्या किंमती खूप मोठी वाढ होणार असेलतर बुल कॉल स्ट्रॅटेजीद्वारे नफा मिळविता येतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुल कॉल स्प्रेड स्ट्रॅटेजीसाठी दोन व्यवहार करावे लागतील. या स्ट्रॅटेजीमध्ये खालच्या
किंमती या (आयटीएम) एक कॉल ऑप्शन खरेदी करावा लागेल. तर वरच्या किंमतीचा (ओटीएम) एक कॉल ऑप्शन विकायचा आहे. ज्या कंपनीच्या शेअर्समध्ये आपण ही स्ट्रॅटेजी करणार आहोत, त्याच कंपनीच्या शेअरमध्ये वरील एक कॉल ऑप्शन खरेदी तर एक कॉल ऑप्शन विक्री करायचा आहे. शिवाय हे दोन्ही ऑप्शन करार एकाच महिन्यातील असावेत. एक कॉल ऑप्शन खालच्या किंमतीला (सध्या शेअर्सच्या जो बाजारभाव चालू (spot price) असेल त्यापेक्षा कमी किमतीला) खरेदी करायचा आहे. तर एक कॉल ऑप्शन वरच्या किंमतीला (सध्या शेअर्सचा जो बाजारभाव चालू आहे त्यापेक्षा जास्त किंमतीला) विक्री करायचा आहे. बुल कॉल स्प्रेड स्ट्रॅटेजीचे वैशिष्टय म्हणजे शेअर्सच्या किंमतीला कितीही घट झाली तरी नुकसान मर्यादित राहते तसेच शेअर्सच्या किंमतीत खूप वाढ झाली तरी नफा मर्यादित होतो.

आपण एका उदाहरणाच्या साहाय्याने बुल कॉल स्प्रेड स्ट्रॅटेजी समजून घेऊ.
समजा आपण २५ ऑगस्ट २०२३ ला खालील बुल कॉल स्प्रेड खर
बायकॉन लिमिटेड १८/८/ २३ चा बंद भाव २५८
दिशा- तेजी, समाप्ती- ३१ ऑगस्ट २३, लॉट साईज २,५००

दिशा – समजा बायकॉन लिमिटेडचा भाव आज २५८ आहे.
एप्रिल २०२३ पासून २०० ते २५८ रुपये अशा तेजीमध्ये आहे. जुलै २०२३ पासून २५० ते २७५ अशी १० टक्के वाढ झालेली आहे. परत तो २५८ या भावावर आलेला आहे. येथे स्टॉप लॉस :- रु २५० आहे. त्यामुळे शेअरचा भाग तेवढा खाली आल्यास अधिकाधिक ५,००० नुकसान होईल

लक्ष्य :-ट्रेडर्ससाठी ३१ ऑगस्टपर्यंत २७० आहे.
जर निफ्टी व फार्मा सेक्टर सकाळी ९.४५ दरम्यान तेजी किंवा खाली जाऊन तेजी दाखवत असल्यास
काय करायचे?
स्ट्राईक २५७.५० चा कॉल विकत घ्या (६.३० रुपये अधिमूल्य देऊन)
स्ट्राईक २७० चा कॉल विका (२.५० रुपये अधिमूल्य घेऊन)

कमाल नफा आणि कमाल तोटा किती?
येथे कमाल नफा २१,७५० तर कमाल तोटा ९,५०० रुपये होण्याची शक्यता आहे. येथे आपल्या जोखीम क्षमतेनुसार व्यवहार पूर्ण करता येईल.
बुल कॉल स्प्रेड स्ट्रॅटेजी संकल्पना समजावून सांगण्यासाठी बायकॉन लिमिटेडचे उदाहरण घेतले आहे. वाचकांनी हा खरेदीचा सल्ला समजू नये.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is bull call stratgey mmdc psp