कोणत्याही कर्ज मिळवण्यासाठी बँकेत अर्ज केल्यानंतर त्या व्यक्तीचा सीबील स्कोर तपासला जातो. सीबील स्कोर हा त्या व्यक्तीच्या क्रेडिट स्कोरचा तीन अंकी सारांश असतो. CIBIL म्हणजेच क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड, याद्वारे प्रत्येक व्यक्तीच्या सीबील किंवा क्रेडिट स्कोरची नोंद ठेवली जाते. याद्वारे एखाद्या व्यक्तीने स्वतःचे आर्थिक उत्पन्न कसे वापरले आहे, गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट स्कोर यांची माहिती मिळते.
सीबील स्कोर किती असावा?
सीबील स्कोर किंवा क्रेडिट स्कोर ३०० ते ९०० दरम्यान असावा.
आणखी वाचा: पीपीएफ खात्याची मुदत किती वेळा वाढवता येते? जाणून घ्या याचे नियम
सीबील स्कोर कसा मोजला जातो?
- सीबील रिपोर्टमधील क्रेडिट हिस्ट्रीवरुं सीबील स्कोर काढला जातो.
- यासाठी कर्जदाराचे गेल्या ३६ महिन्यांचे क्रेडिट प्रोफाईल तपासले जाते.
- क्रेडिट प्रोफाइलमध्ये गृह कर्ज, गाडीसाठी घेतलेले कर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड, ओवरड्राफ्ट सुविधा यांवरील कर्ज आणि पेमेंट हिस्ट्री यांचा समावेश असतो.
सीबील स्कोर ऑनलाईन कसा तपासायचा?
- ‘CIBIL’ च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- ‘गेट युअर सीबील स्कोर’ पर्याय निवडा.
- तिथे तुमचे नाव, ईमेल आयडी, फोन नंबर, आयडी प्रूफ (पासपोर्ट नंबर, पॅन कार्ड, आधार कार्ड, वोटर आयडी कार्ड) सबमिट करा. त्यानंतर पिन कोड, जन्म तारीख, फोन नंबर सबमिट करा.
- ऍक्सेप्ट अँड कंटिन्यू पर्याय निवडा.
- फोनवर ओटीपी शेअर केला जाईल. तो सबमिट करून कंटिन्यू करा
- त्यानंतर डॅशबोर्डवर जाऊन क्रेडिट स्कोर चेक करा
- जर सर्व माहिती आणि सबमिट केलेली कागदपत्र योग्य असतील तर तुम्हाला मोफत तुमचा सीबील स्कोर तपासता येईल.