प्रश्न १ : हेल्थ इन्शुरन्स (आरोग्य विमा) संदर्भात सीआयएस (कस्टमर इन्फॉर्मेशन शीट) म्हणजे काय?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पॉलिसी धारकाला आपल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी मधील महत्वाच्या बाबी व अटी सहजगत्या समजाव्यात या उद्देशाने इन्शुरन्स नियामकाने (आयआरडीए) इन्शुरन्स कंपन्याना सीआयएस म्हणजे एक सुधारित माहिती पत्रक नव्याने हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी देताना किंवा पॉलिसीचे नुतनीकरण करताना देण्याबाबत सांगितले आहे. यामुळे संबंधित पॉलिसी मधील किचकट गोष्टी पॉलिसी धारकाला समजणे शक्य होईल.

प्रश २ : सीआयएस मध्ये कोणत्या बाबींचा समावेश असेल?

आयआरडीएने दिलेल्या मसुद्यानुसार सीआयएस प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश असेल

१) इन्शुरन्स पॉलीसीचे नाव २)पॉलिसी नंबर ३) इन्शुरन्स पॉलीसीचा प्रकार जसं की इंडेनमिटी की बेनिफिट की दोन्हीही ४) विमा कव्हरची रक्कम ५) पॉलिसी मध्ये समाविष्ट असलेल्या तसेच नसलेल्या बाबी ६) वेटिंग पिरीयड (प्रतीक्षा कालावधी) ७) विविध मर्यादा (लिमिटस) जसं की सब लिमिट, को-पेमेंट,डीडक्टटीबल ८) क्लेम प्रोसिजर (दावा प्रक्रिया) ९) नेटवर्क हॉस्पिटल्सची नावे व माहिती १०) हेल्प लाईन नंबर ११) ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटल्सची नावे,१२)फ्री लुक अप पिरीयड१३) पोर्टेबिलिटी सुविधा १४) पॉलिसी धारकाला बंधनकारक असणाऱ्या गोष्टी

हेही वाचा – जर तुम्ही दररोज २ किलोमीटर वेगाने चालल्यास शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

प्रश्न ३ : सीआयएसचा पॉलिसी धारकाला नेमका काय फायदा होईल?

सर्वसाधारणपणे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी बऱ्यापैकी मोठी असते (सुमारे १०००० पेक्षा शब्द एका पॉलिसीत असतात ) व ती पॉलिसी धारकाकडून सहसा पूर्णपणे वाचली जात नाही तसेच पॉलिसीतील काही शब्द संज्ञा किचकट असल्याने त्याचा नेमका अर्थ पॉलिसी धारकाला कळत नाही. सीआयएसमुळे या सर्व महत्वाच्या बाबी एका दृष्टीक्षेपात दिसून येतील. गरज पडल्यास आवश्यक शंकांचं समाधान सुरुवातीसच होऊ शकेल व यामुळे क्लेम करणे व क्लेम सेटलमेंट या दोन्ही गोष्टी सुरळीत होतील. ग्राहकांच्या तक्रारी कमी होण्यास मदत होईल.

हेही वाचा – टोमॅटो सॉसमधील भेसळ कशी ओळखाल? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

प्रश्न ४ : या नवीन सीआयएसची अंमलबजावणी कधीपासून सुरु आहे?

याची अंमलबजावणी १ जानेवारी २०२४ पासून सुरु झाली आहे.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is cis in health insurance why is it important mmdc ssb