प्रश्न १ : ईएलएसएस फंड म्हणजे काय ?

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम ही म्युचुअल फंडाचीच एक योजना असून यातील गुंतवणूक प्रामुख्याने शेअर्स मधेच केली जाते व यातील गुंतवणूक प्राप्तीकर सेक्शन ८० सी अंतर्गत कर सवलतीस पात्र असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रश्न २: यात किती गुंतवणूक करता येते ?

या योजनेत कितीही गुंतवणूक करता येते मात्र एका वर्षात रु.१.५ लाख पर्यंत किंवा केलेली गुंतवणूक यातील कमीतकमी रक्कम कर सवलतीस पत्र असते. उदाहरणार्थ एका आर्थिक वर्षात आपण पीपीएफमध्ये रु.५००००, एनएससीमध्ये रु.२५००० व इन्शुरन्स प्रीमियम रु.१२००० व भरले असतील आणि ईएलएसएसमध्ये रु.१०००० दरमहा भरले असतील तर या १२०००० पैकी रु.६३००० (५०+२५+१२+६३=१५० ) इतकी ईएलएसएस मधील गुंतवणूक करसवलतीस पत्र होईल आणि जर पीपीएफमध्ये रु.५०००० गुंतविले नसतील तर ईएलएसएस मधील रु.१२०००० पैकी रु.११३००० एवढी गुंतवणूक कर सवलतीस पात्र असेल.

हेही वाचा : Money Mantra : एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये घसरण, तुमच्या फंडांचा आढावा घेतलात का?

प्रश्न ३: गुंतवणुकीचा कालावधी असतो?

ईएलएसएस मधील गुंतवणुकीस कितीही कालावधी साठी करता येते मात्र गुंतवणूक केल्या तारखेपासून पुढील तीन वर्षे यातील रक्कम काढता येत नाही थोडक्यात गुंतवणुकीस तीन वर्षांचा लॉक इन पिरीयड असतो.

प्रश्न ४: यातून मिळणाऱ्या परताव्यावर कर आकारणी कसी होते?

यात गुंतवणूक करताना डिव्हिडंड व ग्रोथ असे दोन पर्याय असतात , जर आपण डिव्हिडंड पर्याय घेतला असेल तर या फंडाने आर्थिक वर्षात देऊ केलेला डिव्हिडंड आपल्या एकूण उत्पन्नात समाविष्ट करावा लगतो व त्यानुसार येणाऱ्या उत्पन्नावर आपल्या टॅक्स स्लॅब नुसार कर आकारला जातो. ग्रोथ हा पर्याय तसेच व डिव्हिडंड पर्यायातील गुंतवणूक रिडीम करताना जो भांडवली नफा झाला असेल त्यातील रु. एक लाखापर्यंतच्या रकमेवर लॉंग टर्म कॅपीटल गेन टॅक्स लागू होत नाही त्यावरील रकमेवर १०% दराने कर आकारणी केली जाते. यातील गुंतवणूक ३ वर्षाच्या आत काढता येत नसल्याने शोर्ट टर्म कॅपीटल गेन टॅक्सचा प्रश्नच येत नाही.

हेही वाचा : Money Mantra : फ्लोटिंग आणि फिक्स्ड रेटचे फायदे-तोटे काय असतात? 

प्रश्न ५ : यातील गुंतवणूक फायदेशीर कशी ?

ईएलएसएस हा इक्विटी म्युचुअल फंड असल्याने यातून मिळणारा परतावा अन्य पर्यायांच्या तुलनेने ४ ते ५% इतका जास्त असू शकतो. परतावा निश्चित नसला तरी १३ ते १६%च्या दरम्यान मिळत असल्याचे दिसून येते. शिवाय ३ वर्षाचाच लॉकइन पिरीयड असल्याने अन्य पर्यांयापेक्षा लिक्विडीटी जास्त असते. पीपीएफ तसेच सुकन्या समृद्धी यासारख्या दीर्घकालीन गुंतवणुकीतून मिळणाऱ्या रकमेपेक्षा जास्त रक्कम तेवढ्याच काळात यातील गुंतवणुकीतून मिळू शकते. उदाहरणार्थ पीपीएफ रु. १.५ लाख व ईएलएसएस मध्ये दर वर्षी रु. १.५ लाख टाकल्यास १५ वर्षानंतर रु.२२.५ लाखाच्या गुंतवणुकीतून पीपीएफची मिळणारी रक्कम रु.३७.९९ लाख (सध्याचा पीपीएफचा रु.७.१% व्याज दर गृहीत धरून) इतकी असेल तर ईएलएसएस मधील गुंतवणुकीतून मिळणारी रक्कम रु.सुमारे ६५ ते ७० लाख इतकी असू शकेल( मिळणारा रिटर्न १३ ते १६% ग्रहीत धरून)आणि मिळणारी कर सवलत सारखीच असेल.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is elss fund and investment limit and time period of elss fund mmdc css
Show comments