Money Mantra: कर पद्धती असेल किंवा मग आपल्याकडून झालेली मोठी खरेदी- विक्री… सामान्य माणूस गोंधळून जातो. अनेकदा तर त्याला पडणारे बहुतांश प्रश्न हे कररचनेसंदर्भातच असतात… आता तुम्ही प्रश्न पाठवा आणि तज्ज्ञ देतील उत्तरे

प्रश्न:१ (अपर्णा कोरगावकर) म्युचुअल फंडात प्रथमच गुंतवणूक करण्याची प्रक्रिया कशी असते?
आपण जर प्रथमच म्युचुअल फंडात गुंतवणूक करता असाल तर सर्व प्रथम केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. हे आपण विहित नमुन्याचा फॉर्म भरून किंवा डिजिटली सुद्धा करू शकता, फॉर्म भरून करणार असाल तर म्युचुअल फंड डीस्ट्रीब्यूटर(वितरक) किंवा थेट फंड हाउस मध्ये जाऊन करू शकता, केवायसी फॉर्म सोबत आपला नुकताच काढलेला फोटो, आधार कार्ड तसेच पॅन कार्डची झेरॉक्स प्रत( या दोन्ही प्रतीवर सेल्फ अटेस्टेशन साठी आपली स्वाक्षरी करणे आवश्यक असते) आधार कार्ड वरील पत्ता व आपला निवासाचा पत्ता वेगळा असेल तरच निवासाचा वेगळा पुरावा उदा: लाईट बिल, ड्राव्हींग लायसेन्स, व्होटर आय डी कार्ड , पासपोर्ट यासारखा पुरावा द्यावा लागतो. तसेच आपण म्युचुअल फंडाची वेबसाईट किंवा डीस्ट्रीब्यूटर प्लॅटफॉर्मवर आधार बेस इ-केवायसी करू शकता . एकदा एका म्युचुअल फंडासाठी केवायसी केल्यावर नंतरच्या अन्य फंडातील गुंतवणुकीसाठी पुन्हा केवायसी करावी लागत नाही.

Mahakumbh First Amrit Snan on makar Sankranti
महाकुंभातील पहिल्या अमृतस्नानाचं महत्त्व काय? मकर संक्रांतीच्या दिवशीच याचे आयोजन का केले जाते?
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
rupee recovered 8 paise from its historic low against the us dollar to settle at 86.62
नीचांकी पातळीवरून रुपया ८ पैशांनी सावरला
JSW Share News
JSW Cement IPO ला सेबीचा हिरवा कंदील; ११ गोष्टी या ‘आयपीओ’बद्दल…
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
Portfolio With Alpha
अल्फा पोर्टफोलिओ कसा तयार करायचा?
Inflow of Rs 41156 crore into equity funds in December Investment in small midcap funds contributed significantly
डिसेंबरमध्ये ‘इक्विटी फंडा’त ४१,१५६ कोटींचा ओघ; स्मॉल, मिडकॅप फंडातील गुंतवणुकीचे मोठे योगदान

प्रश्न:२ (ओंकार पाटकर) म्युचुअल फंडात प्रथमच गुंतवणूक करताना कोणत्या बाबी विचारात घेणे गरजेचे आहे?
आपण कोणत्या उद्दिष्टाने गुंतवणूक करीत आहोत त्यानुसार फंड निवडावा, उदा: आपली गुंतवणूक अल्प कालावधीसाठी असेल तर शॉर्ट फंडची निवड करावी या उलट जर आपण दीर्घकालीन उद्दिष्टाने गुंतवणूक करणार असाल तर इक्विटी किंवा हायब्रीड फंडात आपली जोखीम (रिस्क ) घेण्याची क्षमता विचारत घेऊन गुंतवणूक करावी.जर गुंतवणार असलेली रक्कम पुढे नजीकच्या काळात कधीही हवी असेल तर लिक्विड फंडात गुंतवणूक करावी. आपल्याला केवळ मार्केट रिस्क घ्यायचे असेल तर इंडेक्स फंडात गुंतवणूक करावी. तसेच मार्केट रिस्क घ्याचे नसेल तर डेट फंडाचा विचार करावा , किमान सुरवातीस तरी तज्ञाचा सल्ला घ्यावा.

प्रश्न:३ (आल्हाद काळे) एसआयपी म्हणजे काय व या पद्धतीने गुंतवणूक करणे योग्य असते का?
एसआयपी म्हणजे सीस्टेमॅटीक ईनव्हेस्टमेंट प्लॅन होय यात आपण निवडलेल्या म्युचुअल फंडाच्या एका स्कीम (योजना) मध्ये एक ठराविक रक्कम ठराविक कालावधीने एका ठरविक तारखेस आपल्याला हव्या त्या कालावधीसाठी गुंतवीत असता. उदा: आपण एसबीआय ब्लू चीप फंड निवडला आहे व आपल्याला दरमहा ५ तारखेला रु.५००० आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी पुढील १० वर्षे गुंतवायचे आहेत. गुंतवणूक मासिक/तिमाही/सहामाही/वार्षिक पद्धतीने आपल्या सोयीने करता येते. साधारणपणे मासिक पद्धतीने गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येते. ही बँकेच्या किंवा पोस्टाच्या रिकरिंग ठेव योजनेसारखी योजना आहे. मात्र यातून मिळणारा परतावा (रिटर्न) बँक किंवा पोस्टा प्रमाणे सुनिश्चित नसतो. मिळणारा परतावा हा बाजारातील चढउतारा नुसार कमी अधिक होत असतो. असे असले तरी ५ वर्षे किंवा त्याहून जास्त काळासाठी एसआयपी पद्धतीने इक्विटी फंडात गुंतवणूक केल्यास १२ ते १४% इतका परतावा मिळू शकतो व हा परतावा बँक किंवा पोस्टाच्या रिकरिंगच्या तुलनेने जास्त असल्याने नियमित कमी गुंतवणूक करून आपले दीर्घ कालीन उद्दिष्ट्य साध्य होऊ शकते. (मात्र अशी खात्री देता येत नाही )

सुधाकर कुलकर्णी
सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी

Story img Loader