आजपासून सुरु होणारी ही लेखमाला हि मुख्यतो फ्युचर्स व ऑप्शन्सवर आधारित आहे. फ्युचर्स व ऑप्शन्स
या विषयाकडे वळण्याअगोदर वित्तीय बाजार म्हणजे Financial मार्केट ची माहिती घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी खालीलप्रकारे निधी उभारला जाऊ शकतो.
१ ओळखीच्या , मित्राकडून निधी ,जमवणे यात निधीबाबत खूप मर्यादा आहेत.
२ बँकांकडून लोन घेणे , ह्यात बँकांना व्याज द्यावे लागेल ही मर्यादा.
३ खाजगी इक्विटी सर्वसाधारणपणे एखाद्या सूचिबद्ध नसलेल्या खाजगी कंपनीला व्यवसायाचा विस्तार , अधिग्रहण, किंवा फर्म मजबूत करण्यासाठी निधी पाहिजे असल्यास ती कंपनी मोठे व संस्थात्मक गुंतवणूकदार यांच्याकडून भांडवल मागते, त्या निधीला खाजगी इक्विटी म्हणतात.
वित्तीय बाजार फारच व्यापक बाजार आहे ,त्यात खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते.
१) प्राथमिक आणि दुय्यम बाजार
२)नाणेबाजार आणि भांडवल बाजार
प्राथमिक बाजारात मध्ये रोखे म्हणजे बॉण्ड्स तसेच शेअर्स ह्यांची प्रथमच खरेदी विक्री होते. एखाद्या कंपनीला स्वतःच्या व्यवसाय वाढी साठी भांडवल पाहिजे असल्यास ती कंपनी खालील प्रकारे भांडवल उभारणी करते. या बाजारात गुंतवणूकदाराना नवीन शेअर्स, रोखे विकले जातात. त्यामुळे व्यवसाय संघटनांना नवीन भांडवलाचा पुरवठा होतो. उदाहरणार्थ TVS सप्लाय चेन सोल्युशन्स लिमिटेड या कंपनीला ८८० करोड एवढ्या भांडवलाची गरज आहे त्यामुळे त्या कंपनीने दिनांक १० आगस्ट २०२३ ते १४ आगस्ट २०२३ ह्या कालावधी मध्ये IPO ( initial public offering) जाहीर केले आहेत म्हणजे प्राथमिक बाजारामध्ये हि कंपनी .कंपनीचे भाग सर्वसामान्य लोक तसेच इतर संस्थांना फंड उभारण्यासाठी विकत आहे . मी IPO ला अर्ज केला व मला काही शेअर्स विकले ,असे समजू. हा व्यवहार प्राथमिक बाजारातला आहे.

आणखी वाचा: वित्तरंजन : कला : भावनिक गुंतवणूक की केवळ गुंतवणूक?
दुय्यम बाजारात ज्या रोख्यांची व शेअर्स आधीच प्राथमिक बाजारात खरेदी विक्री झाली आहे म्हणजे आधीच अस्तित्वात असलेले रोखे किंवा शेअर्स होते.त्यांची खरेदी विक्री होते.मी मला मिळालेले ते शेअर्स विजयला विकले. हा व्यवहार दुय्यम बाजारातला आहे. हा बाजार अप्रत्यक्षपणे व्यवसाय संघटनांना भांडवल पुरवठा करतो .

2.नाणेबाजार आणि भांडवल बाजाराची व्याख्या
वित्तीय बाजाराचे वर्गीकरण नाणेबाजार व भांडवल बाजार असेही करता येते.
नाणेबाजारामध्ये अल्पमुदतीच्या (साधारणतः एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी मुदतीच्या) कर्जाची देवाण – घेवाण होते. भांडवल बाजारात दीर्घ मुदतीच्या (सामान्यतः वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक मुदतीच्या) कर्जाची देवाण घेवाण होते.
फ्युचर्स व ऑप्शन्स हा वित्तीय बाजाराच्या दुय्यम बाजार ह्या प्रकारातील एक भाग आहे हे आपणास समजले असेल. शेअर मार्केट ज्यामध्ये प्राथमिक बाजार व दुय्यम बाजाराचा समावेश होतो हा एक जुगार आहे असा गैरसमज सुरुवातीपासूनच मराठी मनावर कोरलेला आहे. हा विषय गुजराती मारवाडी या समाजाचा आहे आपण या मार्केटपासून दूर असले पाहिजे असा दृष्टिकोन आपल्या पूर्वजांनी आपल्या मनावर बिंबवला आहे.

आणखी वाचा: Money Mantra: यशस्वी गुंतवणूकदार व्हायचेय? मग ‘या’ गोष्टींचं पालन करा अन् बघा..
खरंतर कोणत्याही देशाची प्रगती त्या देशाच्या उधोगधंदेयाच्या प्रगती वर अवलंबून आहे .व उद्योगधंद्यांची प्रगती त्या क्षेत्रात ओतल्या जाणाऱ्या भांडवलावर अवलंबून, व हे भांडवल प्राथमिक व दुय्यम बाजारामध्ये सर्वसामान्य लोकांनी ओतलेला पैशामुळे निर्माण होते . थोडक्यात तुम्ही आम्ही जे शेअर बाजाराबाबत आशावादी आहेत त्याच्या मुळे देशाची प्रगती होत असते.जगामध्ये कोणत्याही देशाला आर्थिक परिवर्तन करायचे असल्यास तिथले उधोगधंदे वाढले पाहिजेत कारण उधोगधंदे वाढले कि रोजगार निर्मिती होते ,लोकांकडे पैसे आलेत कि अर्थव्यवस्थेला चालना मिळते , देशाला कररुपी पैसा मिळतो ,सरकारला ह्या पैशाचा नागरिकांना सुविधा देण्यास उपयोग होतो.
पुढील लेखांमध्ये आपण फुचर्स आणि कॅश मार्केट ,डेरीवेटीव्ह मार्केट त्या मधील फुचर्स व ऑपशन्स ह्यांच्यामधील तुलनात्मक फरक ,ऑपशन्स चे वेगवेगळे प्रकार उदाहरणासह समजून घेणार आहोत पर्याय इत्यादींचा अभ्यास क्रमाक्रमाने करणार आहोत.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is futures options market mmdc psp
Show comments