आजकाल जर आपल्याला बँक खात्यातून एखाद्याला पैसे पाठवायचे असतील त्याच्या बँक खात्याचा सर्व तपशील म्हणजे बँकेचे नाव, शाखेचे नाव, सबंधित खातेदाराचे नाव व खाते नंबर याशिवाय सबंधित बँक शाखेचा आयएफएससी कोड माहित असणे गरजेचे असते. काय आहे आयएफएससी कोड व त्याची गरज का असते याबाबत बऱ्याचदा आपल्याला माहिती नसते, या लेखातून आज आपण ही महिती थोडक्यात घेऊ.

आयएफएससी कोड हा ११ कॅरेक्टर असणारा अल्फान्यूमेरिक(अक्षरे व अंक) कोड नंबर असतो. हा नंबर बँकेच्या प्रत्येक शाखेसाठी युनिक कोड नंबर असतो. यातील पहिल्या ४ कॅरेक्टरनुसार कोणती बँक आहे समजते तर ५ वे कॅरेक्टर ० (शून्य) असते व उर्वरित ६ कॅरेक्टर बँकेच्या सबंधित शाखेचा कोड नंबर असतो व न्यूमेरिक (अंकात) असतो. उदा: एखाद्याचे खाते आयडीबीआय बँकेच्या पुण्यातील कोथरूड शाखेत असेल तर त्याच्या चेक/पासबुकवर IBKL0000653 हा आयएफएससी कोड असेल जर स्टेट बँकेच्या पौड रोड शाखेत खाते असेल तर चेक/पासबुकवर SBIN0009061 हा आयएफएससी कोड असेल.

Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
astrology People of these four signs are very spendthrift
‘या’ चार राशींचे लोक असतात खूप जास्त खर्चिक, पाण्यासारखा खर्च करतात पैसा
Numerology number 8
Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते शनीची कृपादृष्टी, मान-सन्मानासह कमावतात प्रचंड संपत्ती; भाग्यापेक्षा असतो कर्मावर विश्वास
ketu nakshatra parivartan 2024
आजपासून ‘या’ ३ राशींची चांदी; केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने कमावणार भरपूर पैसा आणि मानसन्मान
swapan sashtra dream interpretation about money gold silver
स्वप्नात भरपूर पैसा, सोन्या-चांदीचे दागिने दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या काय सांगतं स्वप्नशास्त्र
mercury transit in scorpio 2024
बुध ग्रहाची उलटी चाल, २६ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींना करेल श्रीमंत! नोकरी व्यवसायात मिळेल यश अन् बक्कळ पैसा

हेही वाचा… Mental Health Special: जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह का असतो?

आता या कोडचा नेमका उपयोग काय ते पाहू. पैसे पाठविण्यासाठीचे पूर्वीचे पर्याय उदा: डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर, मनी ट्रान्सफर(एमटी) तसेच टेलिफोनिक ट्रान्स्फर (टीटी) आता कालबाह्य झाले असून आजकाल पैसे पाठवण्यासाठी एनईएफटी, आरटीजीएस व आयएमपीएस या पर्यांयांचा प्रामुख्याने वापर होत असल्याचे दिसून येते. या तीनही पर्यायात फंड ट्रान्स्फर इलेक्ट्रोनिक पद्धतीने होत असते व यासाठी सबंधित दोन्ही बँकांना आयएफएससी कोड असणे आवश्यक असते. यामुळे फंड ट्रान्स्फर अगदी कमीतकमी वेळात व सुरक्षितरीत्या होत असते.उदा: एनईएफटी मध्ये बँकेच्या कामकाजाच्या वेळात फंड ट्रान्स्फर केल्यास सुमारे तासाभरात रक्कम सबंधित खात्यात जमा होते तर आरटीजीएस व आयएमपीएस पद्धतीने ट्रान्स्फर केल्यास काही मिनिटातच रक्कम सबंधित खात्यात जमा होते.

हेही वाचा… Mental Health Special: ‘पेरेंटल कंट्रोल’ आणि संशयाचा किडा!

समजा ज्याला रक्कम ट्रान्सफर करायची आहे त्याच्या बँकेचा आयएफएससी कोड आपल्याला माहिती नाही तर अशा वेळी आपण नेट बँकिंगचा एनईएफटी/आरटीजीएस/आयएमपीएस या पैकी जो पर्याय निवडला असेल त्यानुसार सर्व प्रथम ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचे नाव, बंकेचे व शाखेचे नाव, खाते नंबर ही माहिती भरून सर्च घेतला असता सबंधित बँकेचा आयएफएससी कोड मिळू शकतो व हा कोड टाकून आपण पैसे ट्रान्स्फर करू शकता.

आयएफएससी कोडमुळे ऑन लाईन पेमेंट सुरक्षित, त्वरित व सुलभ झाले असून यातून घोटाळा होण्याची शक्यता जवळजवळ नसतेच. जरी खाते नंबर अथवा नाव यात काही चूक झाली तरी पाठविलेले पैसे चुकीच्या खात्यात जमा होत नाहीत व अल्पावधीतच रक्कम पाठवणाऱ्याच्या खात्यात जमा होते.

आता सर्व सरकारी कार्यालये, मोठ्या कंपन्या यांना वरील पद्धतीने रक्कम ट्रान्स्फर करणे बंधनकारक आहे यामुळे होणारे आर्थिक व्यवहार बँका मार्फत पारदर्शीपणे होऊन काळ्या पैशाच्या वाढीस आळा बसण्यास मदत होऊ शकते व रोखविरहीत (कॅश लेस ) व्यवहार वाढीस लागतील.