गुंतवणूक, घराची खरेदी- विक्री, शेअर आदी सर्व व्यवहारांच्या संदर्भात आपल्याला नेहमी अनेक प्रश्न पडतात. कधी ते कर वाचविण्याच्या संदर्भात असतात तर कधी करपरताव्याच्या संदर्भात, कधी दीर्घकालीन नफ्या संदर्भात या सर्व प्रश्नांची उत्तरे दर शनिवारी मनीमंत्र सदरातील तज्ज्ञ देतील!

प्रश्न (दिगंबर जैतापकर) : आयपीओ म्हणजे काय?
जेव्हा एखाद्या लहान कंपनीचा व्यवसाय वाढत असतो, नफ्याचे प्रमाणही समाधानकारक असते व नजीकच्या काळात व्यवसाय वाढीस चांगला वाव आहे असे दिसून येते मात्र व्यवसाय वाढीसाठी आवश्यक असणारे भांडवल प्रवर्तक (प्रमोटर) उभारू शकत नाहीत अशा वेळी हे प्रवर्तक भांडवल गोळा करण्यासाठी आपल्या कंपनीचे शेअर्स प्रथमच विक्रीस आणून गुंतवणुकदारास देऊ करतात याला आयपीओ( इनिशियल पब्लिक ऑफर ) असे म्हणतात. अशा देऊ केलेल्या शेअरची स्टॉक एक्सचेंजवर नोंदणी करणे आवश्यक असते, याला लिस्टिंग असे म्हणतात. स्टॉक एक्सचेंज वर (नोंदणी )लिस्ट झालेला शेअर गुंतवणूकदार हवा तेव्हा घेऊ अथवा विकू शकतो व यामुळे गुंतवणुकीस तरलता (लिक्विडीटी) प्राप्त होते.

Sensex and Nifty continue to increase for third consecutive day
मार्केट वेध : शेअर बाजाराची सलग तिसऱ्या दिवशी आगेूकूच; अदानींच्या शेअर्समध्ये उत्साही भरते कशाने?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Sensex gains , stock market rise , Sensex ,
मार्केट-वेध : शेअर बाजारात सेन्सेक्सची २२५ अंशांची कमाई; मात्र सत्रारंभीच्या मुसंडीला, दिवसअखेर पुन्हा गळती!
Stock market hits 650-point high with Sensex
मार्केट-वेध : सेन्सेक्स सावरला; पण बाजारातील तेजीचे पतंग काटले जाणार की, मोठी भरारी घेणार?
JSW Share News
JSW Cement IPO ला सेबीचा हिरवा कंदील; ११ गोष्टी या ‘आयपीओ’बद्दल…
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
Portfolio With Alpha
अल्फा पोर्टफोलिओ कसा तयार करायचा?
प्रश्न तुमचे उत्तरं तज्ज्ञांची
प्रश्न तुमचे उत्तरं तज्ज्ञांची

प्रश्न (अमोल नाईक): प्राईस बँड म्हणजे काय?
सुमारे २००७-२००८ पासून कंपन्या आपला आयपीओ एका फिक्सड प्राईसला न आणता प्राईस बँडसह बाजारात भांडवल उभारणी साठी येत आहेत. प्राईस बँड पद्धतीमध्ये कंपनी आपला शेअर न्यूनतम व अधिकतम किमतीच्या पट्ट्यात देऊ करते याला भाव पट्टा असे म्हणतात. यातील खालच्या किमतीस फ्लोअर प्राईस तर वरच्या किमतीस कॅप प्राईस असे म्हणतात. या दोन किमतीमध्ये जास्तीत जास्त फरक २०% इतका असू शकतो.(उदा: न्यूनतम किंमत रु.२०० असेल तर अधिकतम किंमत रु.२४० पेक्षा जास्त असणार नाही.) मात्र किमान २०% फरक असलच पाहिजे असे नाही तो कमीही असू शकतो. उदा: नुकताच बाजारात येऊन गेलेल्या झॅगल प्रीपेड ओसिअन सर्व्हिसेस लिमिटेडच्या आयपीओचा प्राईस बँड रु.१५६ ते १६४असा होता. विशेष म्हणजे अर्जदार आपला शेअर मागणी अर्ज यातील कोणत्याही एका किमतीस करू शकतो ज्या किमतीने शेअरची मागणी केलेली असेल त्या किमतीस बिडिंग प्राईस असे म्हणतात. मात्र रिटेल इन्व्हेस्टरला (किरकोळ गुंतवणूकदार ) कॅप प्राईसलाच शेअर्स मागणी अर्ज करावा लागतो .

प्रश्न (सोनाली कडव): कट ऑफ प्राईस म्हणजे काय व ती कशी ठरविली जाते?
रिटेल सोडून अन्य दोन गुंतवणूकदार (संस्थात्मक व एच एन आय ) प्राईस बँड कोणत्याही किमतीस बीड करू शकतात मात्र त्यांनी केलेल्या बिडिंग प्राईसला शेअर्स मिळतीलच असे नाही तर ज्या प्राईस शेअर्स दिले जातात त्या प्राईसला कट ऑफ प्राईस असे म्हणतात. ही कट ऑफ प्राईस बुक बिल्डींग पद्धतीने काढली जाते. बुकबिल्डींग ही अशी एक प्रक्रिया आहे कि ज्यामध्ये पब्लिक इश्यूची प्राईस बँड मधील वाजवी किंमत ठरविली जाते या वाजवी किमतीस कट ऑफ प्राईस असे म्हणतात. सेबीच्या नियमानुसार ही वाजवी किंमत बुक बिल्डींग प्रक्रियेतूनच ठरविणे बंधनकारक असते. या प्रक्रियेत पब्लिक इश्यू विक्रीसाठी खुला झाल्यावर प्राईस बँडच्या रेंजमध्ये गुंतवणूक दारांकडून निविदा (बीड) मागविल्या जातात. इश्यू बंद झाल्यानंतर वेटेड अॅव्हरेज पद्धतीने ज्या प्राईसला जास्तीत जास्त बीड आलले असतात तीला कट ऑफ प्राईस असे म्हणतात. समजा एखाद्या आयपीओचा प्राईस बॅंड रु.११९ ते १२६ असा आहे व इश्यूला १० पट प्रतिसाद मिळाला व बुक बिल्डींग पद्धतीने रु.१२३ असी कट ऑफ प्राईस आली तर रु.१२३ ते १२५ च्या दरम्यान बीडिंग केले असेल व जर त्यांना शेअर्स अलॉट झाले तर ते रु.१२३ या भावाने मिळतील थोडक्यात जरी बीडिंग रु.१२३ पेक्षा जास्त असेल तरी.मात्र रु.११९ ते १२२ या भावाने बीडिंग करणाऱ्या गुंतवणुकदारास शेअर्स दिले जात नाहीत हे ध्यानात घेणे आवश्यक आहेत. तसेच रिटेल इन्व्हेस्टरने जरी ) कॅप प्राईसने अर्ज केला असला तरी त्याला मिळणारे शेअर्स कट ऑफ प्राईसलाच मिळतात.

प्रश्न (साईनाथ नाईक): लॉट व लॉट साईज म्हणजे काय?
पब्लिक इश्यूसाठी अर्ज करताना किमान एक लॉट किंवा त्या पटीत अर्ज कराव लागतो. एक लॉटची किंमत रु.१५००० जवळपास असते व लॉट साईज म्हणजे एका लॉट मध्ये असणारे शेअर्स.
लॉट साईज = १५०००/ प्राईस बँड वरची किंमत (कॅप प्राईस)
उदा: प्राईस बँड ११९-१२६ असा असेल तर लॉट साईज =१५०००/१२६=११९.०४ म्हणजे ११९ इतके शेअर्स एका लॉट मध्ये असतील.

प्रश्न (गौरव रिळेकर): रिटेल इन्व्हेस्टर पब्लिक इश्यू मध्ये जास्तीतजास्त किती गुंतवणूक करू शकतो?
रिटेल इन्व्हेस्टर पब्लिक इश्यू मध्ये दोन लाखात समाविष्ट होणाऱ्या जास्तीत जास्त लॉट पर्यंत अर्ज करू शकतो. वरील उदाहरणात लॉट साईज ११९ व व कॅप प्राईस रु.१२६ आहे त्यामुळे एका लॉटची किंमत ११९*१२६=रु.१४९९४ इतकी होईल व त्यामुळे २०००००/१४९९४ =१३.३८ म्हणजे जास्तीत जास्त १३ लॉट साठी अर्ज करता येईल व त्यासाठी रु.१९४९२२ एव्हढी रक्कम बँकेत गोठवून ठेवावी लागेल.

Story img Loader