आयर्न कॉनडॉर ही स्ट्रॅटेजी बाजार समांतर दिशेमध्ये असताना करता येते.
आपण निफ्टीमध्ये ही स्ट्रॅटेजी कशी काम करते ते बघूया.
१ सप्टेंबर २०२३ रोजी निफ्टी १९,५१९ पातळीवर स्थिरावला.
दिशा- १ सप्टेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १९,४०९ ला खुला (ओपन) झाला. त्याच दिवशी तो ११० अंशांची झेपावत १९,५१९ पातळीवर बंद झाला. येथे १९,५१९ ही उत्तम रेसिस्टन्स पातळी आहे आणि १९,४०० एक उत्तम सपोर्ट (आधार पातळी) आहे . हा ट्रेड फक्त ४ दिवसांसाठी म्हणजे ७ सप्टेंबर च्या समाप्तीचा असल्याने यशस्वी होईल असे वाटते.
समाप्ती- ७ सप्टेंबर २३, लॉट ५०
५८ रुपये अधिमूल्य घेऊन स्ट्राईक १९,५०० चा कॉल विका
२४ रुपये अधिमूल्य देऊन स्ट्राईक १९६०० चा कॉल विकत घ्या
६० रुपये अधिमूल्य घेऊन स्ट्राईक १९४०० चा पुट विका
३२ रुपये अधिमूल्य देऊन स्ट्राईक १९३०० चा पुट विकत घ्या
येथे जास्तीत जास्त ३,०८५ रुपये नफा होईल आणि तोटा झाल्यास तो १,९१५ रुपयांपर्यंत मर्यादित राहील.
यासाठी ४५,२०० रुपयांची गुंतवणूक करावी लागली.
दिनांक ४ सप्टेंबर २०२३ ला सर्व वायद्यांचा भाव बदलला असेल तरी ही स्ट्रॅटेजी लागू आहे .जर सकाळी ९.४५ पर्यंत निफ्टीमध्ये खूप मंदी किंवा तेजी असल्यास व्यवहार करू नये. जेव्हाही २ ते ३ टक्के नफा होत असल्यास किंवा २००० रुपयांपर्यंत किंवा आपापल्या सहनशक्तीनुसार व्यवहार पूर्ण करावा.
वरील उदाहरण संकल्पना समजावून सांगण्यासाठी घेतले आहे. वाचकांनी हा आयर्न कॉनडॉर स्ट्रॅटेजीचामध्ये व्यवहार करण्याचा सल्ला समजू नये.