भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. शहरीकरणाची वेगाने सुरू असलेली प्रक्रिया, ग्रामीण आणि शहरी बाजारपेठेमध्ये खरेदीदारांचा वाढता उत्साह आणि झपाट्याने उदयास येणारा मध्यमवर्ग यामुळे खरेदीचा जोर पुढील दहा ते पंधरा वर्षात कायम राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारत हा फक्त जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करणारा देश उरणार नसून जीवन सुखकर करणाऱ्या आणि आरामदायी वस्तूंची, चैनीच्या वस्तूंची मागणी वाढत राहणार आहे. थोडक्यात कंझम्शन स्टोरी दमदार असेल यात शंकाच नाही. याचाच लाभ घेण्यासाठी कोटक म्युच्युअल फंडाने एक नवी फंड योजना बाजारात आणली आहे. ‘कोटक कंझम्शन फंड’

योजनेचा उद्देश

मध्यम आणि दीर्घ काळासाठी पैसे गुंतवून त्यावर चांगला लाभ मिळवणे हे ज्या गुंतवणूकदारांचे उद्दिष्ट आहे त्यांच्यासाठी ही योजना योग्य ठरणार आहे. या फंड योजनेमध्ये गुंतवणूकदार जे पैसे गुंतवतील त्यातून इक्विटी शेअर्स विकत घेतले जाणार आहेत. म्हणजेच हा शुद्ध इक्विटी फंड (Pure Equity Fund) आहे. भारतातील ग्राहकपयोगी वस्तू बनवणाऱ्या, त्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व त्या क्षेत्राशी संबंधित कंपन्या यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाणार आहे.

हेही वाचा : Money Mantra : प्राप्तिकर खात्याकडून नोटीस मिळाल्यास काय करावं?

भारताच्या खरेदीदारांचे त्रिसूत्र ‘स्ट्रक्चरल -कल्चरल आणि डिजिटल’

या तीन स्तरांवर भारतीय खरेदीदारांमध्ये बदल घडताना दिसतो आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती आणि गती बदलत चालली आहे. लोकांचे दरडोई उत्पन्न हळूहळू का होईना गेल्या वीस वर्षात वाढते राहिले आहे, ते असेच राहणार आहे. भारत हा तरुण लोकसंख्येचा देश तर समजला जातोच पण तरुण आणि कमावत्या लोकसंख्येचा देश होण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे.

देशातील वस्तू विकणाऱ्यांची बाजारपेठ पूर्वी सुसूत्र नव्हती. आता जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे व्यवसायामध्ये हळूहळू एक समानता येऊ लागली आहे व याचा ग्राहकांना अप्रत्यक्ष लाभ होताना दिसतो आहे.

हेही वाचा : घर भाड्यातून करायची कर कपात आणि नियम

सांस्कृतिक आणि कौटुंबिक बदल – ग्रामीण भागाकडून शहराकडे सुरू चाललेली सुरू झालेली वाटचाल हा आर्थिक उलाढाली वाढण्यासाठीचा महत्वाचा मुद्दा ठरणार आहे. एकत्र कुटुंब व्यवस्था ही बदलून आता शहरांमध्ये स्थायिक झालेल्या तरुण जोडप्यांची संख्या वाढत आहे. याचा थेट परिणाम त्यांच्या खरेदीवर होताना दिसतो.

डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव- डिजिटल माध्यमांमुळे भविष्यातील व्यापार संधी वाढणार आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या गरजांबरोबरच उपभोग्य वस्तू आणि चैनीच्या वस्तूंची गरज वाढताना दिसते. भारतीय रेल्वेच्या प्रवासी संख्येत वाढ होताना दिसते आहे पण देशांतर्गत विमान प्रवास त्यापेक्षाही अधिक दराने वाढतो आहे. स्मार्ट वॉच, गृह उपयोगी वस्तू आणि उपकरणे सतत काही वर्षानंतर बदलण्याची प्रवृत्ती दिसते. दरवर्षी बारा लाख कमावते तरुण-तरुणी अर्थव्यवस्थेत दाखल होत आहेत. ऑनलाइन शॉपिंग मध्ये ४०% पेक्षा जास्त, सोशल मीडियाच्या वापरामध्ये ५०% पेक्षा जास्त, ऑप्टिकल फायबर नेटवर्कच्या जाळ्यामध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ गेल्या दहा वर्षात नोंदवण्यात आली आहे व ही आणि ही वाढ फक्त मोठ्या शहरांत नसून दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील शहरांमध्ये आहे.

हेही वाचा : Money Mantra : तुमच्या पैशांशी संबंधित हे ६ नियम आजपासून बदलले, सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होणार

निफ्टी इंडिया कंझम्शन इंडेक्स हा या फंडासाठी तुलना करण्यासाठीचा निर्देशांक (Benchmark Index) असणार आहे. यामध्ये गृहपयोगी वस्तू, वस्त्र प्रावरणे, मद्य आणि वाईन उत्पादने, विमान कंपन्या, ज्वेलरी व्यवसाय, खाद्य आणि पेय उद्योग, दोन तीन आणि चार चाकी वाहन निर्मिती, विद्युत उपकरणे बनवणाऱ्या कंपन्या यांचा समावेश आहे.

‘रिस्कोमिटर’ काय सांगतो ?

हा एक थिमेटिक प्रकारचा फंड आहे, म्हणजे एका विशिष्ट विचारधारेने या फंडात गुंतवणूक केली जाणार आहे. त्यामुळेच या फंडासाठी सर्वाधिक जोखीम (High Risk) असा संकेत देण्यात आला आहे.

कमीत कमी गुंतवणूक किती

या फंडात सुरुवातीला एक रकमी पाच हजार रुपये गुंतवता येतील. ‘एस. आय .पी’च्या माध्यमातून दरमहा १००० रुपयांनी सुरुवात करता येईल.

कोणत्या गुंतवणूकदारांसाठी आदर्श

तुमच्या पोर्टफोलिओच्या एकूण गुंतवणुकीपैकी मोठा हिस्सा थिमेटिक फंड असणे अधिक जोखमीचे ठरू शकते. त्यामुळेच दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे पदरात पाडून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या आणि अधिक जोखीम घेण्याची तयारी असलेल्या गुंतवणूकदारांसाठीच ही योजना लाभदायक ठरणार आहे.

फंड योजना ८ नोव्हेंबर पर्यंत खुली आहे. एक युनिट १० रुपये दराने या काळात गुंतवणुक करता येईल.

** या लेखाचा उद्देश योजनेविषयी माहिती देणे हाच आहे. फंड योजनेमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व जोखीम विषयक दस्तऐवजांचा अभ्यास करावा आणि आपल्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्यानुसारच गुंतवणूक करावी.