एखाद्या कंपनीच्या (स्टॉकमध्ये) शेअर्सच्या किंमतीत वाढ होणार आहे अशी शक्यता वाटल्यास प्रोटेक्टिव पुट स्ट्रॅटेजी करून नफा कमविता येतो. प्रोटेक्टिव पुट ही तेजी काळात करावयाची स्ट्रॅटेजी आहे. प्रोटेक्टिव पुट स्ट्रॅटेजीसाठी दोन व्यवहार करावे लागतील. एखाद्या कंपनीच्या समभागांची खरेदी करायची. शिवाय ज्या कंपनीच्या शेअर्सची खरेदी करायची आहे. शिवाय कंपनीच्या एक पुट ऑप्शन खरेदी करायचा आहे हे दोन्ही व्यवहार एकाच महिन्यातील
असावे. प्रोटेक्टिव्ह पुट स्ट्रॅटेजीमध्ये तोटा मर्यादित स्वरूपात तर फायदा अमर्यादित स्वरूपात होण्याची शक्यता असते.

आणखी वाचा: Money Mantra: निर्णय थकवा म्हणजे काय?

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
rbi governor shaktikanta das
उच्च व्याजदर केवळ विकासदर मंदावण्याचे कारण नव्हे – दास
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
Executive Trustee of Bharatiya Unit Trust and apex body of mutual funds A P Kurian
बाजारातली माणसं : फंड उद्योगाचा पायाचा दगड, ए. पी. कुरियन

कॅनफिनहोमच्या समभागात प्रोटेक्टिव्ह पुट स्ट्रॅटेजी
१४ ऑगस्ट २०२३ ला कॅनफिनहोमचा (canfinhome) प्रोटेक्टिव्ह पुट खरेदी करा. ११ ऑगस्ट २०२३ ला कॅनफिनहोमचा फ्युचरचा बंदभाव ७२३ रुपये होता. प्रोटेक्टिव्ह पुट स्ट्रॅटेजी करताना गुंतवणूक कमी करावी लागते आणि तोटा देखील मर्यादित असतो.

कॅनफिनहोमचा फ्युचर विकत घ्या आणि त्याच महिन्यातील १५ रुपये प्रीमियम देऊन ७०० स्ट्राईकचा पुट विकत घ्या. व्यवहार केल्यांनतर येथे कमाल नफा अमर्यादित,कमाल तोटा करार समाप्तीपर्यंत ३८,००० रुपयांपर्यंत होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा: Money Mantra: ट्रॅव्हल इन्श्युरन्स (प्रवासी विमा) कशी निवडाल? कोणती काळजी घ्याल?

प्रोटेक्टिव्ह पुट स्ट्रॅटेजी का?
१) दिशा- सध्या काही सत्रात बाजारात मंदी आहे. मात्र सोमवारी बाजारात पुन्हा तेजी परतण्याची शक्यता आहे.
२) सपोर्ट भाव ७२० रुपयांना स्पर्श करून पुन्हा वधारला आहे.
3) मजबूत लॉन्ग अनवायडींग:- कंपनीच्या भावामध्ये ४.१८ घट, ओपन इंटरेस्ट मध्ये ७ टक्के घट व समभाग विक्री संख्येमध्ये ७६ टक्के घट दर्शविते. त्यामुळे मंदी थांबून तेजी येण्याची आशा आहे. मात्र १४ ऑगस्ट रोजी बाजारात तेजी परतली तरच हा व्यवहार करावा.

समाप्ती-३१ ऑगस्ट २०२३, लॉट ९७५ – समभाग, किमान गुंतवणूक-१,५०,००० रुपये.
जर निफ्टी व वित्त क्षेत्राने (फायनान्स सेक्टर) सकाळी ९.४५ वाजेपर्यंत तेजी दर्शविल्यास हा व्यवहार करावा. यासाठी नुकसान प्रतिबंध (स्टॉप लॉस) ७१० ठेवा, त्यावेळी ९,००० रुपये तोटा संभवतो. तसेच ७६३ या लक्ष्यापर्यंत समभाग पोहोचल्यास नफा सुमारे ३०,००० असेल त्यावेळी किंवा आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार व्यवहार पूर्ण करून नफा पदरी पासून घ्यावा. १४ ऑगस्ट २०२३ रोजी समभागाच्या भावांमध्ये बदल झालेला असेल तरीही ही प्रोटेक्टिव पुट स्ट्रॅटेजी लागू असेल.

Story img Loader