सध्या आपल्या भारतात उद्योग व व्यवसाय वाढीच्या दृष्टीने उचलली जात असलेली पावले व त्या अनुषंगिक होत असलेले आर्थिक निर्णय यामुळे सातत्याने अर्थव्यवस्थेत होत वाढ असल्याचे दिसून येते.परिणामत: शेअर बाजार सध्या चांगलाच तेजीत आहे व ही तेजी पुढील काळातही चालू राहील असा अर्थतज्ञ अंदाज व्यक्त करीत आहेत.
नजीकच्या भविष्यात लहान मोठ्या कंपन्या आपली वाढीव भांडवलाची गरज भागविण्यासाठी मोठ्याप्रमाणावर पब्लिक इश्यू घेऊन येण्याची शक्यता आहे व सामान्य गुंतवणूकदारासाठी एक संधी पण असते. मात्र पब्लिक इश्यू म्हणजे काय याची माहिती सामान्य गुंतवणूकदारास फारसी नसते, त्यादृष्टीने या व पुढील काही लेखात आपण या बाबत तपशीलात माहिती घेऊ.

जेव्हा एखादी कंपनी व्यवसाय वाढीसाठी लागणारे भांडवल सामान्य जनतेकडून गोळा करत असते त्याला पब्लिक इश्यू असे म्हणतात. पब्लिक इश्युचे प्रामुख्याने प्रारंभिक व त्यानंतरचा असे दोन भाग पडतात.यातील प्रारंभिकला आयपीओ(इनिशियल पब्लिक ऑफर)तर त्यानंतरच्या इश्यूला एफपीओ फॉलोऑन पब्लिक ऑफर ) असे म्हणतात.
जेव्हा एखाद्या लहान कंपनीचा व्यवसाय वाढत असतो नफ्याचे प्रमाणही समाधान कारक असते व नजीकच्या काळात व्यवसाय वाढीस चांगला वाव आहे असे दिसून येते मात्र व्यवसाय वाढीसाठी आवश्यक असणारे भांडवल पर्वतक(प्रमोटर) उभारू शकत नाहीत अशा वेळी हे प्रवर्तक भांडवल गोळा करण्यासाठी आपल्या कंपनीचे शेअर्स प्रथमच विक्रीस आणून गुंतवणुकदारास देऊ करतात याला आयपीओ असे म्हणतात. अशा देऊ केलेल्या शेअरची स्टॉक एक्सचेंग वर नोंदणी करणे आवश्यक असते याला लिस्टिंग असे म्हणतात. स्टॉक एक्सचेंग वर (नोंदणी )लिस्ट झालेला शेअर गुंतवणूकदार हवा तेव्हा घेऊ अथवा विकू शकतो व यामुळे गुंतवणुकीस तरलता (लिक्विडीटी) प्राप्त होते.

public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
Daily Horoscope 11 December 2024 in Marathi
११ डिसेंबर पंचांग: मोक्षदा एकादशीला धनूसह ‘या’ राशींना भगवान विष्णूसह लक्ष्मीही देईल आशीर्वाद; वाचा तुमचा बुधवार कसा जाणार?
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
high expectations from third quarter
तिसऱ्या तिमाहीकडून अपेक्षांचे ओझे !
banking amendment bill 2024 benefits banking rules
RBI Rules: तुम्ही आता बँक अकाउंटमध्ये जोडू शकता चार नॉमिनी; केंद्र सरकारचा नवीन नियम काय सांगतो? वाचा…

आणखी वाचा: Money Mantra: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी डी-मॅट खाते …

अशी लिस्टिंग झालेली कंपनी काही काळाने व्यवसाय वाढीसाठी पुन्हा एकदा आपल्या कंपनीचे शेअर्स विक्रीस आणते याला एफपीओ असे म्हणतात. तर जेंव्हा कंपनी आपले शेअर्स फक्त सध्या असलेल्या आपल्या शेअर होल्डर्सना देऊ करते त्याला राईट इशू असे म्हणतात. तर जेंव्हा कंपनी आपल्या नफ्यातील काही भाग आपल्या शेअर होल्डर्सना शेअर्सच्या स्वरुपात बोनस म्हणून देऊ करते याला बोनस इश्यू असे म्हणते. थोडक्यात जेव्हा वरील पैकी कोणत्याही प्रकारे कपनी आपले शेअर्स स्वत; थेट गुंतवणूकदारास देत असते याला प्रायमरी मार्केट असे म्हणतात.
जेंव्हा आयपीओ व एफपीओ द्वारा कंपनी भांडवल जमा करणार असते याल पब्लिक इश्यू असे म्हणतात व यामध्ये कुणीही शेअर्स मागणी साठी अर्ज करू शकतो. यातील अर्जदारांचे प्रामुख्याने तीन भाग पाडलेले असतात.
अ) संस्थात्मक (ईनस्टीस्ट्युशनल)ज्यांना क्वालीफायीड ईनस्टीस्ट्युशनलइंस्त बायर (क्यूआयबी)असे म्हणतात.
ब) हायनेट वर्थ इन्व्हेस्टर(एचएनआय) तसेच बिगर संस्थात्मक म्हणजेच नॉन ईनस्टीस्ट्युशनल इन्व्हेस्टर (एनआयआय)
क) किरकोळ गुंतवणूकदार म्हणजे रिटेल इन्व्हेस्टर(आरआय) असे म्हणतात.

आणखी वाचा: Money Mantra: डिजिटल व्यवहार कसे करावेत? (भाग पहिला)

पब्लिक इश्यू मध्ये क्यूआयबी ५०%, एनआयआय १५% तर आरआय ३५% या प्रमाणात शेअर्स दिले जातात.
अशा प्रकारे जेव्हा कंपनी आपले शेअर्स स्वत: गुंतवणुकदारास देऊन आपली भांडवली गरज भागवत असते याला प्रायमरी मार्केट असे म्हणतात. सामान्यत: अशा पद्धतीने भागभांडवल गोळा करण्याचा कालावधी ४ दिवसांचा असतो याला इश्यू पिरीयड असे म्हणतात,या विशिष्ट कालावधीत जे गुंतवणूकदार कंपनीच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करतात त्यांना अलोटमेंट बेसिस (वाटपाच्या आधारे) शेअर्स देऊ केले जातात. या कालावधीत अर्ज करणारासच बाजारात इश्यू घेऊन आलेल्या कंपनी मार्फत शेअर्स दिले जातात व कंपनीस भांडवल मिळते. अशा प्रकारे मिळणारे शेअर्स कमी किमतीत मिळण्याची शक्यता असते व त्यामुळे अल्प अथवा दीर्घ काळात भांडवली नफा मिळू शकतो.मात्र असे होईलच याची खात्री देता येत नाही.

पब्लिक इश्यू मध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदाराचे डी-मॅट खाते असणे आवश्यक असते कारण मिळणारे शेअर्स आपल्या डी-मॅट खात्यात परस्पर जमा केले जातात. विशेष म्हणजे किरकोळ गुंतवणूकदार (रिटेल इन्व्हेस्टर) जास्तीत जास्त रु.२ लाखा पर्यंतच पब्लिक इश्यू मध्ये गुंतवणूक करू शकतो. यासाठीचा अर्ज ऑफ लाईन तसेच ऑन लाईन पद्धतीने आपल्या सोयीनुसार करता येतो. हा अर्ज इश्यू कालावधीत कधीही करता येतो व वर उल्लेखिल्याप्रमाणे हा कालावधी सर्व साधारणपणे ४ दिवसांचा असतो.(मात्र हा किमान ३ दिवस तर कमाल १० दिवस असू शकतो) पब्लिक इश्यूची सुरवात होणारा दिवस ओपनिंग डे तर शेवटचा दिवस क्लोजिग डे असतो. आत्ता पर्यंत कोजिंग डे पासून ६ दिवसाच्या आत शेअर्स चे वाटप करणे कंपनीवर बंधनकारक होते मात्र १/०९/२०२३ पासून ही कालमर्यादा आता ३ दिवसांवर आणली आहे.

पब्लिक इश्यू मध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारास यातील काही ठळक बाबी माहिती असणे आवश्यक असते.त्या म्हणजे प्राईस बॅंड(किंमत पट्टा), लॉट साईझ,इश्यू पिरीयड,असाबा, कट ऑफ प्राईस ई.
या पार्श्वभूमीवर सामान्य गुंतवणुकदारास या बाबतची प्राथमिक माहिती असणे गरजेचे आहे त्या दृष्टीने पुढील काही लेखात प्राईस बॅंड(किंमत पट्टा), लॉट साईझ,इश्यू पिरीयड,असाबा, कट ऑफ प्राईस ई. बाबतची आपण तपशिलात माहिती घेऊ.

Story img Loader