प्रश्न १ : एसआयपी टॉप अप म्हणजे काय ?
एसआयपी टॉप अप ही एक अशी सुविधा आहे ज्या मुळे गुंतवणूकदार आपल्या चालू असलेल्या एसआयपी मधील गुंतवणूक एका ठरविक कालावधी नंतर (उदा:सहामाही /वार्षिक पद्धतीने ) ठरविक रकमेने अथवा सुरवातीच्या गुंतवणुकीच्या ठरावी टक्के इतकी वाढवू शकतो. यामुळे वाढत्या उत्पन्नानुसार आपल्या एसआयपी मधील आपसूक वाढविता येते. उदाहरणार्थ सध्या आपली एचडीएफसी टॉप१०० इक्विटी फंडाची दरमहाची रु.५००० ची एसआयपी चालू आहे व आता आपला पगार वाढला आहे तर आपण दर सहा महिन्यांनी रु.५०० इतकी रक्कम सध्याच्या एसआयपी मध्ये वाढवू इच्छिता तर तशी विनंती आपण या फंडास करून पुढील सूचना देईपर्यंत आपली एसआयपी दर सहा महिन्यांनी रु.५०० ने वाढू शकता किंवा १०% दरवर्षी म्हणजे रु.१००० ने दरवर्षी वाढू शकता.
प्रश्न २ : एसआयपी टॉप अपचा गुंतवणुकदारांना नेमका काय फायदा होतो?
एसआयपी टॉप अपमुळे गुंतवणूकदारांना आपल्या वाढत्या उत्पन्नानुसार गुंतवणूक वाढवता येते. तसेच यामुळे महागाईमुळे वाढत जाणाऱ्या खर्चाची पुरेशी तरतूद करता येते उदाहरणार्थ मुलांचे शिक्षण/लग्न यावर होणाऱ्या खर्चाची तरतूद करणे शक्य होते. यामुळे एसआयपीची संख्या मर्यादित ठेवता येते की ज्यामुळे गुंतवणुकीचा मागोवा घेता येणे शक्य होते व गरज पडल्यास त्यात आवश्यक तो बदल करता येतो.
हेही वाचा : Money Mantra : महिला कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनचे नियम बदलले, मोदी सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा
प्रश्न ३ : एसआयपी टॉप अप नेमकं कसं काम करतं?
समजा आपली दरमहा रु.१५००० इतकी एसबीआय ब्ल्यू चीप म्युचुअल फंडाची एसआयपी आपण मागील वर्षी जानेवारी महिन्यात सुरु केली आहे आणि नुकताच आपले प्रमोशन होऊन सुमारे रु.२०००० ने पगार वाढला आहे आणि आता आपल्याला आपल्या एसआयपी मधील गुंतवणूक वाढवायची आहे तर आपण आपल्यासध्या चालू असलेल्या एसआयपी मध्ये मूळ एसआयपीच्या रकमेत २०% इतकी वाढ दरवर्षी जानेवारी महिन्यात करू इच्छिता तर तशी विनंती आपण आपल्या फंडास केली तर जानेवारी २०२४ ला दरमहाची एसआयपी रु.१८००० इतकी होईल तर जानेवारी २०२५ ला टी रु.२१००० इतकी होईल व याप्रमाणे दरवर्षी जानेवारी मध्ये आपली एसआयपी रक्कम रु.३००० ने वाढत जाईल.
प्रश्न ४ : एसआयपी टॉप अप कमी करता येते का ?
आपल्याला एसआयपी टॉप अपची रक्कम कमी करून मूळ रकमेवर आणता येत नाही . त्यासाठी एसआयपी बंद करून नव्याने आपल्याला हव्या त्या रकमेची एसआयपी सुरु करावी लागते.
हेही वाचा : Money Mantra : राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अनिवासी भारतीय नागरिकांनाही कशी ठरते फायदेशीर?
प्रश्न ५ : एसआयपी टॉप अप करताना भविष्यात किती रक्कम मिळू शकेल याचा अंदाज येऊ शकतो का ?
आजकाल बहुतेक सर्व म्युच्युअल फंडाच्या अधिकृत वेबसाईट वर टॉप अप एसआयपी कॅलक्यूलेटर उपलब्ध असतो त्याचा वापर करून आपण आपल्या गरजेनुसार टॉप अप सुविधेचा लाभ घेऊ शकतो. उदाहरणार्थ आपण इक्विटी म्युच्युअल फंडात रु.१००००ची एसआयपी २० वर्षे कालावधीसाठी केली आहे व त्यात दरवर्षी रु.१००० इतकी वाढ करण्यचा पर्याय निवडला आहे तर २० वर्षानंतर आपल्याला अंदाजे रु.१.६० कोटी एवढी रक्कम मिळेल व यासाठी आपण केवळ रु.४६८००० एवढी रक्कम २० वर्षाच्या कालावधीत गुंतविलेली असेल.(१२% वार्षिक परतावा ग्रहीत धरून)प्रश्न तुमचे उत्तरं तज्ज्ञांची