घर ही एक अशी संपत्ती आहे, जी प्रत्येकाला हवी असते. लोकांच्या भावना आणि त्यांची आयुष्यभराची कमाई ‘घर’ या शब्दाशी जोडलेली असते. विशेष म्हणजे आजकाल घर खरेदी करताना पूर्वीइतका वेळ लागत नाही. बँका आता ग्राहकांना अनेक गृहकर्ज पर्याय ऑफर करतात, ज्याच्या मदतीने ग्राहकांना डाऊनपेमेंट म्हणून मोठी रक्कम देण्याची गरज नाही. चला तर मग जाणून घेऊ यात योग्य गृहकर्ज निवडण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
क्रेडिट स्कोअर चांगला ठेवा
कर्ज सहज मिळवण्यासाठी उच्च क्रेडिट स्कोअर ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. गृहकर्ज सहज मिळवण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर ७५० पेक्षा जास्त असावा.
चांगले संशोधन करा
गृहकर्ज घेण्यापूर्वी तुमच्या गरजेनुसार कोणता पर्याय योग्य आहे हे शोधण्यासाठी तुम्ही बाजाराचे सखोल संशोधन केले पाहिजे. एवढेच नाही तर संशोधन करताना कोण जास्त कर्ज दर आकारत आहे आणि कोण कमी आकारत आहे हे देखील लक्षात घेतले पाहिजे.
हेही वाचाः Money Mantra : प्राप्तिकर विभागाकडून अलर्ट जारी, ITR रिफंड अद्याप मिळालेला नाही? मग करा ‘हे’ काम
कर्ज करार काळजीपूर्वक वाचा
कर्ज करार काळजीपूर्वक आणि सर्व अटी व शर्थी समजून घ्या. याशिवाय कर्ज घेण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सोबत ठेवा, जेणेकरून कर्ज घेताना जास्त वेळ लागणार नाही.
गृहकर्ज पात्रता तपासा
गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी बँकांची गृहकर्ज पात्रता नेमकी काय आहे हे समजून घेतले पाहिजे. त्याआधारे घर खरेदीचे नियोजन करावे. अनेक अशी कॅल्क्युलेटर ऑनलाइन उपलब्ध आहेत, ज्याद्वारे कोणीही त्यांची पात्रता तपासू शकतात.
हेही वाचाः Money Mantra : EPF मधील शिल्लक गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी काढावी का? तज्ज्ञ म्हणतात…
गृहकर्जाचे दर समजून घ्या
बँक तुम्हाला ज्या व्याजदराने गृहकर्ज देते, त्याला गृहकर्ज दर म्हणतात. तुमच्या गृहकर्जाचा ईएमआय या गृहकर्ज दरानुसार मोजला जातो. वेगवेगळ्या बँका ग्राहकांना वेगवेगळे गृहकर्ज दर देतात. कमी व्याजदर असलेल्या पर्यायामधून कर्ज घ्या.
कर्ज दर ‘या’ घटकांमुळे प्रभावित होतात
जेव्हाही RBI रेपो दरात काही बदल करते, तेव्हा बँका कर्जाचे दर बदलतात.
तसेच उच्च क्रेडिट स्कोअरसह तुम्हाला नैसर्गिकरीत्या कमी कर्ज दराने कर्ज मिळवून देतो.
एवढेच नाही तर घराच्या कर्जाचे दर ठरवण्यात मालमत्तेचे स्थान यांसारखे इतर घटकही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.