प्रश्न १: टॉप अप मेडिक्लेम पॉलिसी म्हणजे काय ?

आपल्या सध्याच्या मेडिक्लेम पॉलिसीचे कव्हर जर आपल्याला पुरेसे वाटत नसेल तर आहे या पॉलिसीचे कव्हर वाढवणे हा एक पर्याय असतो मात्र यासाठी प्रीमियम जास्त पडतो त्या ऐवजी टॉप अप मेडिक्लेम पॉलिसी घेतल्यास कव्हर तर वाढतेच शिवाय प्रीमियम सुद्धा कमी द्यावा लागतो. आपल्या सध्या असलेल्या पॉलिसीचे कव्हर बेस कव्हर असते व त्यावर आपण टॉप अप कव्हर घेऊ शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रश्न२: टॉप अप मेडिक्लेम पॉलिसीचा क्लेम कसा मिळतो ?

जर बेस पॉलिसी कव्हरपेक्षा जास्त वैद्यकीय उपचारांवर खर्च झाला तर बेस कव्हर वगळता उर्वरित खर्चाचा क्लेम टॉप अप मेडिक्लेम पॉलिसी कव्हर मधून मिळतो. उदाहरणार्थ आपल्या बेस पॉलिसीचे कव्हर रु.३ लाख इतके आहे व रु.१० लाखाची टॉप अप मेडिक्लेम पॉलिसी असेल व आपला हॉस्पिटलायझेशन खर्च रु.२.७० लाख इतका झाला असेल तर मिळणारा क्लेम आपल्या ३ लाखाचे कव्हर असणाऱ्या बेस पॉलिसी कव्हर मधून मिळतील मात्र जर आपला हॉस्पिटलचा खर्च रु.६ लाख इतका झाला तर रु.६ लाखापैकी रु.३ लाख बेस पॉलिसी कव्हर मधून मिळतील व उर्वरित रु.३ लाख रु.१० लाखाच्या टॉप अप मेडिक्लेम पॉलिसी कव्हरमधून मिळतील. थोडक्यात खर्च जर बेस बेस पॉलिसी कव्हरच्या आत असेल तर टॉप अप मेडिक्लेम पॉलिसी कव्हर मधून काहीही क्लेम मिळणार नाही.

हेही वाचा : Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! सोने झाले स्वस्त; १० ग्रॅमचा दर पाहून बाजारात उसळली गर्दी

प्रश्न३: टॉप अप व सुपर टॉप अप मेडिक्लेम पॉलिसीत नेमका काय फरक आहे व यातील कोणता पर्याय घेणे योग्य असते?

टॉप अप पॉलिसी फक्त जर क्लेमचे रक्कम बेस पॉलिसीच्या कव्हर जास्त असेल तरच उर्वरित रकमेचा क्लेम टॉप अप पॉलिसीचे कव्हर व प्रत्यक्षात असलेली क्लेमची रक्कम यातील कमी असणाऱ्या इतका क्लेम मिळतो. उदाहरणार्थ जर बेस पॉलिसीचे कव्हर रु.३ लाख व टॉप अप पॉलिसीचे कव्हर रु.५ लाख इतके असेल व आपला पहिला क्लेम चार लाखाचा झाला तर बेस पॉलिसीतून रु.३लाख व उर्वरित रु.१ लाख टॉप अप पॉलिसीचे मिळतील याउलट जर दुसर क्लेम रु.२ लाखाचा झाला तर बेस पॉलीसीचे कव्हर पहिल्या क्लेम मधेच संपले असल्याने बेस पॉलिसीतून क्लेम मिळणार नाही आणि दुसऱ्या क्लेमची रक्कम बेस पॉलिसी कव्हरपेक्षा कमी असल्याने टॉप अप पॉलिसीतूनही क्लेम मिळणार नाही.मात्र जर ही सुपर टॉप अप पॉलिसी असेल तर रु.२ लाखाचा क्लेम सुपर टॉप अप पॉलिसीतील उर्वरित रु.४ लाखातून मिळेल कारण पहिल्या क्लेम मध्ये सुपर टॉप अप पॉलिसीतील रु. ५ लाखापैकी रु. ३ लाख वापरले गेले आहेत.आता जर तिसरा क्लेम रु.३ लाखाचा असेल तर आता सुपर टॉप अप मधून शिल्लक असलेले केवळ रु. २ लाखच मिळतील. सध्या टॉप अप पॉलिसीमधून नंतरचे दोन्ही क्लेम मिळाले नसते. या दृष्टीने सुपर टॉप अप पॉलिसी घेणे योग्य असते.

हेही वाचा : Budget 2024 : करभार कमी करणाऱ्या ‘इंडेक्सेशन’चा लाभ इतिहासजमा

प्रश्न४: टॉप अप व सुपर टॉप अप मेडिक्लेम पॉलिसीला नो क्लेम बोनस मिळतो का?

या दोन्हीही पॉलिसीला नो क्लेम बोनस मिळत नाही.

प्रश्न५: : बेस पॉलिसी व टॉप अप किंवा सुपर टॉप अप मेडिक्लेम पॉलिसी एकाच इन्शुरन्स कंपनीची घ्यावी लागते का?

नाही, आपण बेस पॉलिसी व टॉप अप किंवा सुपर टॉप अप मेडिक्लेम पॉलिसी दोन वेगळ्या कंपन्यांची घेऊ शकता मात्र एकाच कंपनीच्या असल्यास दोन वेगळे क्लेम करावे लागत नाहीत त्यामुळे शक्यतो एकाच कंपनीच्या घ्याव्यात.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is top up mediclaim policy mmdc css