युपीएस (युनिफाईड पेन्शन स्कीम) म्हणजे काय?

मोदी सरकारने नव्याने मंजूर केलेली ही पेन्शन स्कीम (सेवानिवृत्ती वेतन योजना) असून यानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्तीनंतर पूर्वनिर्धारित नियमित पेन्शन मिळण्याची हमी असणार आहे व या योजनेची अंमलबजावणी १ एप्रिल २०२५ पासून होणार आहे.

पेन्शन रक्कम कशी ठरवली जाणार आहे?

या योजनेअंतर्गत ज्या कर्मचाऱ्याची नोकरी २५ वर्षे किंवा त्याहून अधिक झाली असेल अशा कर्मचाऱ्याला सेवानिवृत्त होताना आधीच्या १२ महिन्याच्या सरासरी मूळवेतनाच्या (बेसिक पगार) ५०% इतकी रक्कम पेन्शन म्हणून मिळेल, याशिवाय मिळणारे पेन्शन चलनवाढीच्या निर्देशांकाशी निगडीत असणार आहे, तसेच १० वर्षे किंवा त्याहून जास्त पण २५ वर्षांपेक्षा कमी सर्व्हिस झाली असल्यास प्रपोर्शनेट (अनुपातिक) किंवा किमान रु. १०००० इतकी पेन्शन मिळणार आहे.

Nirav Modi Letter of Understanding bank Business |
हिरा है सदा के लिये! – उत्तरार्ध
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Portfolio Swaraj Engines Limited Product business print eco news
माझा पोर्टफोलिओ : पोर्टफोलिओला ‘ऊर्जावान’ भविष्याची ग्वाही
Russian Modi Industry group company Tata Steel Career
बाजारातली माणसं – पोलाद घडवणारे धारदार व्यक्तित्व : रुसी मोदी
credit card marathi article
Money Mantra: क्रेडिट कार्ड वापरताना काय काळजी घ्यावी?
The prices of gold and silver have steadily increased
सोने-चांदी अजून झळकणार की झाकोळणार?
Why did the stock market fall before Diwali
Money Mantra : दिवाळीच्या आधी मार्केट का घसरलं?

हेही वाचा : Money Mantra: क्रेडिट कार्ड वापरताना काय काळजी घ्यावी?

पेन्शन धारकाचा मृत्यू झाल्यास पत्नी/पतीला पेन्शन मिळणार का?

पेन्शन धारकाचा मृत्यू झाल्यास पत्नी/पतीस सबंधित मृत व्यक्तीस मिळणाऱ्या पेन्शनच्या ६०% इतकी रक्कम पेन्शन म्हणून मिळेल.

सेवा निवृत्त होताना पेन्शन व्यतिरिक्त एकरकमी रक्कम किती मिळणार?

सेवा निवृत्त होताना पेन्शनव्यतिरिक्त ग्रॅच्युटीबरोबर सुपरअॅन्युटीपोटी एकगठ्ठा रक्कम मिळणार असून ती खालीलप्रमाणे असेल. सेवानिवृत्ती वेळीच्या मूळ पगारच्या (बेसिक +डीए) १०% इतकी रक्कम पूर्ण झालेल्या सर्व्हिसच्या प्रत्येक वर्षाच्या ६ महिन्यासाठी मिळेल.

हेही वाचा : क्षेत्र अभ्यास : इन्फ्रा- पोर्टफोलिओची पायाभूत बांधणी

युपीएस योजनेत कर्मचाऱ्याचे योगदान (कॉन्ट्रीब्युशन)आहे का?

होय, युपीएस योजनेत कर्मचाऱ्याचे योगदान १०% तर सरकारचे १८.५% असणार आहे.

सध्या जे केंद्रीय कर्मचारी एनपीएसचे सदस्य आहेत त्यांना या युपीएस योजनेत सहभागी होता येईल का?

सध्या जे केंद्रीय कर्मचारी एनपीएसचे सदस्य आहेत त्यांना या युपीएस योजनेत सहभागी होण्याचा पर्याय असून मात्र एकदा हा पर्याय स्वीकारला की पुन्हा एनपीएसमध्ये सहभागी होता येणार नाही.