लार्ज कॅप्स, मिड कॅप्स, स्मॉल कॅप्स किंवा जिन्नस (कमोडिटी) असा कोणता मालमत्ता वर्ग (अॅसेट क्लास) वेगवेगळ्या बाजार परिस्थितीत सर्वोत्तम कामगिरी करेल, असा प्रश्न गुंतवणूकदारांना अनेकदा पडतो. याचे अचूक उत्तर नसले तरी, एकंदरीत आर्थिक कल समजून घेऊन प्रमुख निर्देशकांचा मागोवा घेत राहिल्यास गुंतवणूकदारांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत मिळू शकते.

या लेखात विविध मालमत्ता वर्ग, विविध परिस्थितींमध्ये कशी कामगिरी करतात, गुंतवणूकदारांनी निरीक्षण केले पाहिजे असे निर्देशक कोणते, २००० सालापासूनचे ऐतिहासिक कल आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापनासाठीचे महत्त्वाचे मार्ग यांचा मागोवा घेतला आहे.

१. आर्थिक परिस्थिती आणि मालमत्ता वर्गाची कामगिरी

प्रत्येक मालमत्ता वर्ग आर्थिक बदलांना वेगवेगळा प्रतिसाद देतो:

अ. लार्ज कॅप्स: अनिश्चित बाजारपेठेतील स्थैर्य

सर्वोत्तम परिस्थिती: आर्थिक अनिश्चितता, वाढता व्याजदर, मध्यम जीडीपी वाढ.

कारण: लार्ज कॅप्सचे ताळेबंद सुदृढ असतात आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांना ते कायम आकर्षित करतात. ज्यामुळे ते कठीण परिस्थितीतही पसंत केले जातात.

उदाहरणे: कोविड-१९ महासाथीच्या काळात बाजार घसरणीपश्चात मिड आणि स्मॉल कॅप्सपेक्षा लार्ज कॅप्सने वेगाने पुनरागमन केले.

ब. मिड कॅप्स: विस्तारणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये वाढ

सर्वोत्तम परिस्थिती: प्रारंभिक ते मध्यम विस्तार कालावधी, मजबूत जीडीपी वाढ, कमी व्याजदर.

कारण: मिड कॅप्स स्थिरता आणि वाढ संतुलित करतात, ज्यामुळे आर्थिक आशावादाचा फायदा होतो.

उदाहरणे: २०१४ ते २०१७ या काळात, भारताच्या मिड-कॅप निर्देशांकाने उच्च-वाढीच्या टप्प्यात लार्ज कॅप्सपेक्षा सरस कामगिरी केली.

क: स्मॉल कॅप्स: तेजीच्या टप्प्यात उच्च जोखीम-उच्च परतावा

सर्वोत्तम परिस्थिती: प्रारंभिक टप्प्यातील बाजार पुनरुज्जीवन, मजबूत जीडीपी वाढ, उच्च रोकड सुलभता

कारण: स्मॉल कॅप चपळ असतात आणि तेजीत वाढतात, परंतु अस्थिरदेखील असतात.

उदाहरणे: २०१७ मध्ये, निफ्टी स्मॉल कॅप १०० निर्देशांकांत विस्तृत तेजीत ५५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली.

ड: जिन्नस (कमोडिटी): महागाई नियंत्रण आणि संकटकालीन संरक्षण

सर्वोत्तम परिस्थिती: उच्च चलनवाढ, भू-राजकीय अनिश्चितता, कमकुवत अमेरिकी डॉलर.

कारण सोने आणि तेल हे चलनवाढीविरुद्ध संरक्षणात्मक बचावाचे धोरण म्हणून काम करतात, तर औद्याोगिक धातूंना पायाभूत सुविधांच्या वाढीमुळे फायदा होतो.

उदाहरणे: २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्धामुळे तेल आणि गव्हाच्या किमती वाढल्या.

२. या आर्थिक निर्देशकांवर लक्ष ठेवा

बाजाराचा कल समजण्यासाठी गुंतवणूकदारांनी स्थूल आर्थिक निर्देशकांवर लक्ष ठेवले पाहिजे.

(सूचक, संकेत आणि मालमत्ता वर्गांवर परिणाम)

२.१: जीडीपी वाढ

मजबूत वाढ समभागांना अनुकूल असते, कमकुवत जीडीपी संरक्षणात्मक मालमत्तांना लाभ देते.

उच्च जीडीपी ? मिडकॅप आणि स्मॉलकॅप

कमी जीडीपी ? लार्ज कॅप्स आणि सोने.

२.२ चलनवाढ:

उच्च चलनवाढीमुळे समभागांत घसरण होते, परंतु जिनसांचे भाव वाढतात. वाढती महागाई ? सोने, तेल आणि धातू.

२.३ व्याजदर (रिझर्व्ह बँक, फेडरल रिझर्व्ह)

उच्च व्याज दरांमुळे समभागांची गती मंदावते, परंतु आर्थिक स्थैर्य वाढते. वाढणारे व्याज दर ? लार्ज कॅप्स; व्याज दर कपात ? मिड आणि स्मॉल कॅप्स.

२.४ बाजाराची भावनिकता (व्हीआयएक्स, एफआयआय प्रवाह)

बाजारात जेव्हा पराकोटीची अस्थिरता असते तेव्हा ती संरक्षणात्मक मालमत्तांना अनुकूल असते.

उच्च व्हीआयएक्स ? सोने आणि लार्ज कॅप्स;

कमी व्हीआयएक्स ? मिड आणि स्मॉल कॅप्स.

२.५ अमेरिकी डॉलरची ताकद (डीएक्सवाय निर्देशांक) कमकुवत डॉलरमुळे जिनसांना चालना मिळते. कमकुवत डीएक्स वाय ? सोने, तेल आणि धातूंमध्ये वाढ.

२.६ भू-राजकीय घटना (युद्ध, व्यापारात व्यत्यय) पुरवठ्याच्या धक्क्यांमुळे वस्तूंच्या किमती वाढतात. युद्धे ? सोने, तेल यामध्ये तेजी या निर्देशकांचा मागोवा घेतल्याने गुंतवणूकदारांना मालमत्ता वर्गाच्या अपेक्षेनुरूप कामगिरीची आशा ठेवण्यास मदत होते.

३. वर्ष २००० पासून मालमत्ता वर्गांची ऐतिहासिक कामगिरी

भूतकाळातील कलांवर नजर टाकल्यास विविध मालमत्ता वर्गांनी आर्थिक परिस्थितीला कसा प्रतिसाद दिला ते दिसून येते:

वर्ष २००० ते २००८ जिन्नस आणि मिड/स्मॉल-कॅपमध्ये तेजी

● उच्च जीडीपी वाढ आणि चीनच्या पायाभूत सुविधांच्या भरभराटीमुळे वस्तूंच्या सुपरसायकलला चालना मिळाली. ० भारताच्या मजबूत आर्थिक टप्प्यात मिड आणि स्मॉल कॅप्सने लार्ज कॅप्सना मागे टाकले.

विसंगती: उच्च चलनवाढ असूनही, २००८ च्या संकटापर्यंत समभागांची वाढ सुरूच राहिली. विसंगती: कमकुवत अर्थव्यवस्था असूनही, मध्यवर्ती बँकेच्या रोकडसुलभ धोरणांमुळे शेअर बाजारात तेजीचा माहोल

वर्ष २००८ ते २०१३ वित्तीय संकटानंतरची पुनर्प्राप्ती आणि सोन्याची सर्वोत्तम कामगिरी

● २००८च्या वित्तीय संकटामुळे समभागात प्रचंड मंदी आली, परंतु सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित ठरली.

● २००९ नंतर, कमी व्याजदरामुळे समभाग गुंतवणुकीला पुनर्प्राप्तीला चालना मिळाली.

विसंगती: जोखीम टाळल्यामुळे आर्थिक सुधारणा असूनही स्मॉल कॅप मागे पडल्या.

२०१४ ते २०१९ भारताच्या आर्थिक वृद्धीमुळे गुंतवणुकीत लार्ज-कॅपद्वारे सर्वाधिक परतावा

● परकीय अर्थ संस्थांनी मिड आणि लार्ज कॅपमध्ये गुंतवणूक केली.

● स्मॉल कॅपने भरघोस नफा मिळवला, परंतु अतिमूल्यांकनामुळे २०१८ मध्ये मोठ्या घसरणीला सामोरे जावे लागले.

विसंगती: अति पुरवठ्यामुळे जागतिक वृद्धीदर चांगला असूनही जिन्नस गुंतवणुकीत मागे पडले.

२०२० ते २०२३ करोनाकाळ, अति रोकडसुलभता आणि त्यामुळे वाढलेली महागाई

● लार्ज कॅपमध्ये करोनापश्चात चांगली कमाई केली. त्यानंतर मिड आणि स्मॉल कॅपकडे तेजीचे नेतृत्व गेले.

● महागाई वाढल्याने आणि पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने जिनसांच्या किमतीत वाढ झाली.

विसंगती: कमकुवत अर्थव्यवस्था असूनही, मध्यवर्ती बँकांच्या रोकड सुलभ धोरणांमुळे समभाग गुंतवणूक फायद्याची ठरली.

२०२३ ते वर्तमान: व्याजदर वाढले आणि भू-राजकीय अस्थिरतेतही वाढ

● वाढत्या व्याज दरांमुळे शेअर बाजारांतील तेजीची गती मंदावली, घसरणीत लार्ज कॅप आघाडीवर होते.

● भू-राजकीय तणावामुळे कच्चे तेल आणि सोन्याच्या किमतीत वाढ झाली.

विसंगती: जागतिक वाढ मंदावलेली असूनही, काही छोट्या क्षेत्रांनी नेहमीच्या लोकप्रिय क्षेत्रांपेक्षा चांगली कामगिरी केली.

वरील कल असे दर्शवतात की, आर्थिक निर्देशकांकडे लक्ष दिल्यास मालमत्तेतील चढ-उतारांचा अंदाज बांधता येतो. पण कधी कधी अनपेक्षित कलाटणी मिळाल्याचेही दिसून येते.

४. सारांश आणि प्रमुख निष्कर्ष

४.१ मालमत्तावर्गातसुद्धा आर्थिक आवर्तन महत्त्वाचे असते.

अनिश्चिततेच्या काळात लार्ज कॅप गुंतवणूक फायद्याची ठरते. मिड कॅप त्यानंतर तेजीत भाग घेतात, तर सर्वात शेवटी स्मॉल कॅपमध्ये तेजी अवतरते. महागाई आणि संकटाच्या काळात जिन्नस चांगली कामगिरी करतात.

४.२ प्रमुख निर्देशकांचा मागोवा:

महागाई, व्याजदर, जीडीपी वाढ आणि बाजाराचा कल हे मालमत्तेच्या कामगिरीला कारणीभूत ठरतात.

४.३ विसंगतीपासून सावधान: बाजारपेठा नेहमीच अंदाजानुसार वागत नाहीत. त्यामुळे धोरणात लवचीकता आवश्यक असते.

४.४ वैविध्याची आवश्यकता:

संतुलित पोर्टफोलिओ असल्यास आर्थिक बदलांमुळे निर्माण होणारी जोखीम कमी होते.

४.५ बाजाराचा कल ओळखून त्याच्याशी जुळवून घ्या:

स्थूल आर्थिक संकेत आणि धोरणात्मक बदलांच्या आधारे गुंतवणुकीचे पुनर्संतुलन करा

अशा तऱ्हेने आर्थिक निर्देशकांवर नजर ठेवून आणि त्यांचा ऐतिहासिक कल जाणून घेत, त्याची वर्तमानाशी सांगड घालून गुंतवणूकदार बदलत्या बाजारपेठेतील परिस्थिती प्रभावीपणे हाताळू शकतात आणि अनुकूल परतावा मिळवू शकतात.

लेखक मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये कार्यरत असून, लेखांत व्यक्त केलेली मते त्यांची वैयक्तिक आहेत.

Story img Loader