एम्प्लॉयी पेन्शन स्कीम (EPS) अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्त झाल्यानंतर पेन्शनचा लाभ घेता येतो. पण पेन्शन धारकांना देखील बोनस मिळतो, हे अनेकांना माहित नसते. ज्या व्यक्ती ‘एम्प्लॉयी पेन्शन स्कीम’चा लाभ २० वर्षांहून अधिक काळासाठी घेतात, त्यांच्यासाठी बोनसची सुविधा करण्यात आली आहे. ज्या व्यक्तींना ही सुविधा मिळते, त्यांच्या पेन्शनच्या रकमेत बोनसची रक्कम जोडली जाते.
तज्ञांच्या मते जर एखाद्या कर्मचाऱ्याने २० वर्षांहून अधिक काळासाठी एम्प्लॉयी पेन्शन योजनेचा लाभ घेतला असेल, तर त्यांच्या पेन्शन कालावधीत दोन वर्षांचा कालावधी वाढवण्यात येतो. एम्प्लॉयी पेन्शन योजनेचा कमाल कालावधी ३५ वर्षांचा असतो.
अशाप्रकारे २० वर्षांचा कालावधी पुर्ण केलेल्या पेन्शन धारकांना बोनस मिळवता येईल.