कुटुंबात जेव्हा एखाद्या नवीन सदस्याचे आगमन होते, तेव्हा त्या कुटुंबाला आनंद होतो. नवीन सदस्याच्या आगमनासोबत नवजात बालकाच्या आईवडिलांवर मोठ्या आर्थिक जबाबदाऱ्या येतात. हल्ली पालक सजग झाल्याने मूल जन्माला येताच पालकांना त्या नावजात शिशूच्या भविष्यातील खर्चाची चिंता वाटू लागते. मुलाचे शिक्षण आईवडिलांच्या आवाक्यात असेल याची खात्री देता येत नसल्याने मुलाच्या वाढत्या शैक्षणिक खर्चासाठी करावी लागणारी तरतूद पुरेशी असेल की नाही, ही चिंता त्या बालकाच्या आगमनाचा आनंद पुरेपूर उपभोगता येत नाही. पालकांसाठी, शिक्षण हा खर्च नसून ती एक दीर्घ मुदतीची गुंतवणूक असते. मध्यंतरी ‘व्हॉटसॲप’वर आलेला एक विनोद वाचनात आला. तो म्हणजे, सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करूनदेखील कुटुंब नियोजनाला जे यश आले नाही ते यश खासगी शाळांच्या वाढत्या शैक्षणिक शुल्कांमुळे आटोक्यात आले.

उदारीकरणाला तीस वर्षांहून अधिक काळ लोटला. उदारीकरणामुळे अनेक नव्या संधी उपलब्ध झाल्या. उदाहरणार्थ, उदारीकरणाला सुरुवात झाली तेव्हा अर्थतज्ज्ञ म्हणून फार कमी संधी उपलब्ध होत्या. महाविद्यालयात प्राध्यापक होणे, रिझर्व्ह बँक आणि शासकीय संस्था वगळता अर्थतज्ज्ञ म्हणून करिअर करण्यास मर्यादित संधी उपलब्ध होत्या. गेल्या पंचवीस वर्षांत अर्थतज्ज्ञ म्हणून अर्थार्जन करण्यास शासकीय आस्थापनांसोबत खासगी क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. करिअरसाठी विविध पर्याय उपलब्ध असल्याने मुलांचा कल त्यांना रुची असलेल्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन त्यात करिअर करण्याचा मुलांचा मानस असतो. शैक्षणिक खर्चाची तरतूद करण्याची चिंता बहुतेक पालकांना चुकीच्या आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करते. बहुतेक बचतकर्ते पारंपरिक उत्पादनांमध्ये गुंतवणूक करतात. तथापि, जर आपण वाढत्या महागाईचा विचार केला, तर विमा उत्पादने, मुदत ठेवी यासारख्या पारंपरिक साधनांतून मिळणारा परतावा अपेक्षित उद्दिष्टे गाठण्यासाठी मुळीच पुरेसा नसतो. तुमच्या उद्दिष्टांच्या जवळ एकरकमी आणि महागाईच्या दरापेक्षा तुलनेत अधिक दराने परतावा हवा असेल तर योग्य गुंतवणूक साधन निवडणे महत्त्वाचे आहे.

mishtann food limited
मिष्टान्न! (पूर्वार्ध)
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Devendra Fadnavis Cabinet
शिंदे सरकारमधील सात मंत्री फडणवीसांच्या मंत्रीमंडळात नसणार; मोठ्या नेत्यांची गच्छंती
Amit Shah On Eknath Shinde
Amit Shah : एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबाबत मंत्रिमंडळ विस्ताराआधी अमित शाह यांचं मोठं विधान
Atul Subhash suicide case wife arrested
Atul Subhash suicide case: अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी त्यांची पत्नी, सासू आणि मेहुण्याला अटक
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?

हेही वाचा – तिसऱ्या तिमाहीकडून अपेक्षांचे ओझे !

बडोदा बीएनपी परिबास म्युच्युअल फंडाने ‘बडोदा बीएनपी परिबास चिल्ड्रन फंड’ उपलब्ध केला असून हा फंड ६ डिसेंबरपासून खुला झाला असून तो २० डिसेंबर २०२४ त्यामध्ये गुंतवणुकीची संधी आहे. या फंडात गुंतविलेली रक्कम कमीत कमी ५ वर्षे किंवा मूल १८ वर्षे पूर्ण करेपर्यंत (यापैकी जे आधी होईल ते) काढता येणार नाही. या फंड गुंतवणुकीस कायम खुला असलेला (ओपन-एंडेड) आणि समभाग गुंतवणूक करणारा फंड आहे. शैक्षणिक खर्च हे सामान्य चलनवाढीपेक्षा अधिक दराने वाढतात. ‘बडोदा बीएनपी परिबा चिल्ड्रन फंड’ हा एक विशिष्ट लक्ष्य निर्धारित करून गुंतवणूक करणारा फंड आहे. आपल्या पाल्याच्या शैक्षणिक खर्चाची तरतूद करू पाहणाऱ्या पालकांना, त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक नियोजनाशी सुसंगत शिस्तबद्ध गुंतवणूक पर्याय देणारा हा फंड आहे. हा फंड समभाग केंद्रित गुंतवणुकीद्वारे उच्च-संभाव्य परतावा मिळवून महागाईच्या दरापेक्षा अधिक परतावा मिळवू शकेल.

लक्ष्य केंद्रित गुंतवणुकीत यशस्वी होण्याच्या पाच पायऱ्या आहेत.

नियोजन

पहिली पायरी म्हणजे सुयोग्य नियोजन. मुलाचे शालेय शिक्षण, पदवीपर्यंत शिक्षण आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी किती खर्च करावा लागेल. शिक्षण सुरू होण्यास किती कालावधी शिल्लक आहे, याचा आढावा घेऊन लवकरात लवकर सुरुवात करणे गरजेचे आहे. जितक्या लवकर ‘एसआयपी’ला सुरुवात कराल तितका कालावधी तुमची गुंतवणूक वाढण्यास उपलब्ध असतो.

पद्धतशीर मासिक गुंतवणूक

मोठ्या खर्चाची तरतूद करण्यास दीर्घकालीन ‘एसआयपी’ हे एक उत्तम साधन आहे. नियमित गुंतवणुकीमुळे बाजारातील अस्थिरतेवर मात करता येते आणि चक्रवाढ दराने लाभ घेता येतो. नियोजनबद्ध मासिक गुंतवणूक वर्षानुवर्षे केल्यास अशक्य वाटणारा मोठा निधी सहज उपलब्ध होतो. पालकाने आपल्या नवजात शिशूसाठी मासिक ५,००० रुपयांची ‘एसआयपी’ १५ वर्षांसाठी केल्यास आणि वार्षिक १२ टक्के दराने परतावा मिळाल्यास सुमारे २५ लाख रुपये उपलब्ध होतील.

हेही वाचा – मिष्टान्न! (पूर्वार्ध)

समभाग संलग्न फंडात गुंतवणूक

वेगवेळ्या मत्तावर्गांनी दिलेल्या मागील परताव्याचा विचार केल्यास समभाग समर्थित मालमत्ता वर्गाने दीर्घ कालावधीत सर्वाधिक परतावा दिला आहे. तथापि, सामान्य गुंतवणूकदाराला कंपन्यांचे संशोधन करणे कठीण जाते. म्हणून त्याने समभागांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या फंडांची निवड केली पाहिजे.

प्रत्येक वित्तीय उद्दिष्टांसाठी वेगळी गुंतवणूक

प्रत्येक उद्दिष्टासाठी गुंतवणुकीची व्याख्या आणि विलगीकरण करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. योग्य गुंतवणूक नियोजन तयार करण्यासाठी आर्थिक सल्लागार मदत करू शकतात. तुमच्या ध्येय साध्य करण्यास १० वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी असेल, तर समभागसंलग्न गुंतवणूक करणाऱ्या फंडात जास्त मात्रा असायला हवी.

गुंतवणुकीचा आढावा आवश्यक

रोज गुंतवणुकीचे मूल्य बघून काळजी करत बसण्यापेक्षा निधी व्यवस्थापक आणि ‘इंडिया ग्रोथ स्टोरी’वर विश्वास ठेवा. पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला कोणते बदल करावे लागतील याचा वर्षातून एकदा आढावा घेणे योग्य ठरते.

वर उल्लेख केलेल्या कार्यपद्धतींशी बडोदा बीएनपी परिबा चिल्ड्रन्स फंड सुसंगत कार्यपद्धती असणारा फंड आहे. साधारण निवृत्ती आणि चिल्ड्रन फंडात अनिवार्य ५ वर्षांचा ‘लॉक-इन’ कालावधी असल्याने निधी व्यवस्थापकांना रोखतेशी निगडित निर्णय घ्यावे लागत नाहीत. परिणामी परतावा अन्य फंड गटापेक्षा उजवा असतो. शैक्षणिक महागाई दर वार्षिक सरासरी ११ टक्के असताना, हा फंड यापेक्षा अधिक परतावा देईल, असे मानण्यास वाव आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीचा कालावधी असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हे एक आदर्श साधन आहे. वाढत्या शैक्षणिक खर्चाची पूर्तता करण्यासाठी महागाई-समायोजित वृद्धीदर शोधणाऱ्या पालकांना हा फंड नक्कीच समाधानी ठेवेल.

Story img Loader