लहान मुलांचं संगोपन हे आईवडिलांच्या आर्थिक नियोजनाचा मोठा भाग असतं. मुलांचं भवितव्य उज्ज्वल असावं यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. सुकन्या समृद्धी योजनेसंदर्भात प्रश्नांची तज्ज्ञ सुधाकर कुलकर्णी यांनी दिलेली उत्तरं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मनातले प्रश्न इमेलद्वारे तज्ज्ञांना विचारा

प्रश्न १ (अभिषेक सुतार) – सुकन्या समृद्धी अकाऊंट कोणास व कसे उघडता येते?
आईवडील आपल्या मुलीच्या नावाने हे खाते तिच्या जन्मतारखेपासून ते ती १० वर्षांची होईपर्यंत कधीही उघडू शकतात. आईवडील हयात नसतील तर कायदेशीर पालक खाते उघडू शकतात. मात्र अनिवासी भारतीय आईवडील अथवा पालकास मुलीच्या नावाने हे खाते उघडता येत नाही. या खात्याचा मूळ उद्देश मुलीच्या शिक्षणाच्या व लग्नाच्या खर्चाची तरतूद करणे हा असतो. या खात्यातील रक्कम अन्य कोणत्या कारणासाठी वापरता येत नाही.

प्रश्न २ (सुषमा मंत्री) – या खात्याची मुदत किती आहे व रक्कम कशी व किती भरता येते?
या खात्याची मुदत २१ वर्ष असून खाते उघडल्यापासून आर्थिक वर्षात किमान २५० रुपये व त्यापुढे ५०च्या पटीत व जास्तीतजास्त १.५ लाख इतकी एकाचवेळी किंवा हवी तेव्हा भरता येते. विशेष म्हणजे ही रक्कम खाते उघडल्यापासून पहिली १५ वर्ष भरायची आहे. मात्र जर एखाद्यावर्षी किमान २५० रुपये भरता आले नाही तर खाते निष्क्रिय समजले जाते व असे निष्क्रिय खाते सक्रिय करण्यासाठी जितके वर्ष किमान २५० रुपये भरले गेले नाहीत अशा प्रत्येक वर्षांसाठी ५० रुपये दंड रक्कम व त्या प्रत्येक वर्षासाठी किमान २५० रुपये भरुन खाते सक्रिय करता येते.

प्रश्न ३ (कैलास शिरसाट) अशी किती काढता येतात?
हे खाते एका मुलीच्या नावाने फक्त एकच खाते काढता येते. पहिल्या दोन मुलींच्या नावाने उघडता येते. जर पहिल्यांदाच जुळ्या किंवा तिळ्या मुली झाल्या तर या दोघींच्या/तिघींच्या नावाने खाते उघडता येते. किंवा पहिल्या एका मुलीनंतर पुढच्या वेळी जुळ्या किंवा तिळ्या मुली झाल्यावर त्या दोघींचे/तिघींचे खाते उघडता येते.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who can open sukanya samruddhi account mmdc psp