सुधाकर कुलकर्णी
आपण आयुर्विमा पॉलिसी घेताना सुरुवातीला आपल्या उत्पन्नानुसार आवश्यक तेवढे कव्हर असणारी पॉलिसी घेत असतो. पुढे आपले उत्पन्न तसेच गरजा वाढल्या असता सुरुवातीला घेतलेले पॉलिसी कव्हर अपुरे वाटू लागते व आपल्या पश्चात हे कव्हर आपल्या कुटुंबियांना पुरेसे होणार नाही असे दिसून येते. त्यादृष्टीने अशा वेळी पुन्हा आणखी एक नवीन पॉलिसी घेऊन एकूण कव्हर वाढविता येते. मात्र अशी नवीन पॉलिसी घेताना पॉलिसी घेण्याची सर्व प्रक्रिया पुन्हा करावी लागते.
उदा: नवीन अर्ज करणे (त्याच किंवा नवीन इन्श्युरन्स कंपनीकडे), वैद्यकीय तपासणी आणि जर या दरम्यानच्या काळात काही वैद्यकीय समस्या उद्भवल्या असतील तर एक पॉलिसी प्रीमियम वैद्यकीय समस्येनुसार वाढू शकतो किंवा आपला पॉलिसी अर्ज नाकारला जाऊ शकतो. यावर उपाय म्हणून आपण सुरुवातीची पॉलिसी घेतानाच इन्श्युरन्स कव्हर वाढत जाणारी पॉलिसी घेणे सोयीचे व फायदेशीर ठरू शकते.
या पॉलिसीची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत
- या पॉलिसीचे कव्हर दरवर्षी मूळ कव्हरच्या ५% वाढत असते. उदा: १ कोटी सुरुवातीचे कव्हर असणाऱ्या पॉलिसीचे कव्हर एक वर्षानंतर रु.१०५ लाख तर दोन वर्षानंतर रु.११० लाख , तीन वर्षानंतर रु.११५ लाख होते मात्र दुप्पट झाल्यानंतर त्यात वाढ होत नाही, पॉलिसी कालावधी शिल्लक असला तरी. (पॉलिसी कालावधी ३० वर्षांचा असेल तर २० वर्षांपर्यंतच म्हणजे रु.२०० लाख होई पर्यंतच वाढत राहील)
- बहुतांश कंपन्या सुरुवातीला जो पॉलिसी प्रीमियम आकारतात तोच पुढे कायम राहतो. दरवर्षी वाढत जाणाऱ्या कव्हर नुसार प्रीमियम वाढत नाही.
- सुरवातीचा प्रीमियम अर्जदाराचे वय, कव्हरची रक्कम व अर्जदाराची आरोग्यस्थिती यावर अवलंबून असते तसेच यात वाढत्या कव्हरचाही विचार केलेला असतो. यामुळे हा प्रीमियम नेहमीच्या पॉलिसीच्या तुलनेने जास्त असला तरी परवडणारा असतो.
- पॉलिसी कव्हरमध्ये प्रतिवर्षी ५% इतकी वाढ होत असल्याने व साधारण महागाईसुद्धा याच दराने वाढत असल्याने क्लेम पोटी मिळणारी रक्कम त्यावेळच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागविण्यास पुरी पडू शकते.
- याउलट आपण जर ठराविक कालावधीनंतर (उदा: दर ५ वर्षांनी) आणखी एक पॉलिसी घेण्याचे ठरविले तर दरवेळी वाढत्या वयानुसार वाढता प्रीमियम द्यावा लागेल तसेच दरवेळी नवीन अर्ज, वैद्यकीय तपासणी यात जर काही आजार उद्भवल्यास नवीन पॉलिसी नाकारली जाऊ शकते किंवा आजाराच्या स्वरूपानुसार वाढीव प्रीमियम द्यावा लागेल व व हा प्रीमियम परवडणारा असेलच असे नाही, प्रसंगी पॉलिसी मिळणारही नाही.
वाढते कव्हर असणारी पॉलिसी घेण्याचे फायदे
- वाढत्या उत्पन्नाबरोबर आपले खर्चही वाढत असतात अशी पॉलिसी घेण्याने पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतरही कुटुंबियांच्या बहुतांश आर्थिक गरजा प्रमाणावर भागविणे शक्य होते.
- वाढत्या उत्पन्नानुसार व गरजानुसार वेळोवेळी नवी पॉलिसी घ्यावी लागत नाही.
- अशी पॉलिसी टर्म इन्श्युरन्स पद्धतीची असल्याने केवळ डेथ क्लेमच असतो त्यामुळे अन्य पॉलिसीच्या तुलनेने द्यावा लागणारा प्रीमियम कमी असतो त्यामुळे परवडणारा असतो.
थोडक्यात असे म्हणता येईल की व्यवसायिक किंवा उच्चपदावर काम करणाऱ्या तरुण व्यक्ती ज्यांचं उत्पन्न भविष्यात निश्चितच वाढत जाणार आहे अशांना वाढत्या कव्हरची विमा पॉलिसी घेणे हे हिताचे असून यामुळे आपल्या पश्चात कुटुंबियांसाठी पुरेशी तरतूद करून ठेवता येते .