Nizam Mir Osman Ali Khan Success Story : आजच्या भारतात किती धनकुबेर आहेत हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. पण स्वतंत्र भारतातील पहिल्या अब्जाधीशाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? कदाचित नसेल. तर आम्ही तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहोत. स्वतंत्र भारताचे पहिले अब्जाधीश होण्याचा मान हैदराबादचे निजाम मीर उस्मान अली खान यांच्याकडे होता. टाइम मासिकाने २२ फेब्रुवारी १९३७ च्या अंकात “द रिचेस्ट मॅन इन द वर्ल्ड” या शीर्षकाखाली त्यांना मुखपृष्ठावर स्थान दिले होते. स्वातंत्र्यानंतर हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. पण तरीही उस्मान अली यांच्याकडे अफाट संपत्ती होती. परदेशी बँक खात्यांमध्ये त्यांनी कोट्यवधी रुपये जमा केले होते. आजही इंग्लंडमधील एका बँकेत निजामांचे ३ अब्जांहून अधिक रुपये जमा आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीमंत असण्याबरोबरच त्यांच्या कंजूषपणाचीही बरीच चर्चा होती. ते अगदी साधे कपडे घालायचे आणि स्वच्छता अजिबात पाळायचे नाहीत. त्यांची बेडरूम वर्षातून एकदाच स्वच्छ केली जायची. पाहुण्यांना खाऊ घालण्यातही ते खूप कंजूष होते. त्यांना भेटायला आलेल्या पाहुण्यांना चहाच्या कपाबरोबर एकच बिस्कीट देण्यात यायचे. दिवाण जर्मनी दास यांनी त्यांच्या ‘महाराजा’ या प्रसिद्ध पुस्तकात लिहिले आहे की, “जेव्हा अमेरिकन, ब्रिटिश किंवा तुर्कीतील ओळखीचे लोक निजामाला सिगारेट ऑफर करायचे, तेव्हा तो त्यांच्या सिगारेटच्या पाकिटातून एका ऐवजी चार-पाच सिगारेट काढायचा आणि स्वतःच्या सिगारेट केसमध्ये ठेवायचा. ते स्वस्त चारमिनार सिगारेट ओढायचे, ज्याची किंमत त्या काळात १२ पैसे पॅकेट असायची.”

इतकी निव्वळ संपत्ती होती

१९११ मध्ये उस्मान अली खान हैदराबादचा निजाम बनला. देश स्वतंत्र झाला आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले, तोपर्यंत ते याच पदावर राहिले. निजामाची एकूण संपत्ती २३० अब्ज डॉलर्स म्हणजे १७.४७ लाख कोटी (Nizam Mir Osman Ali Khan Net worth) मानली जाते. १९४७ मध्ये निजामाची एकूण संपत्ती अमेरिकेच्या एकूण जीडीपीच्या २ टक्के इतकी होती. निजामाचे स्वतःचे चलन आणि विमानसेवा होती. त्यांच्याकडे १०० दशलक्ष पौंड सोने, ४०० दशलक्ष पौंड दागिने होते. राणी एलिझाबेथ २ च्या लग्नात निजामाने तिला ३०० हिऱ्यांनी जडलेला हार भेट म्हणून दिला होता.

हेही वाचाः ऑफिसला यायला सांगितल्यामुळे टीसीएसमधल्या महिला सामूहिक राजीनामा देतायत? कंपनीनं दिलं उत्तर

हिऱ्याची खाण उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत

निजामाच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत गोलकोंडाच्या खाणी होत्या. त्यावेळी ही खाण जगातील हिऱ्यांच्या पुरवठ्याचे एकमेव स्त्रोत होते. निजामाकडे जेकब डायमंड होता, जो त्यावेळी जगातील सात सर्वात महागड्या हिऱ्यांमध्ये गणला जात होता. हैदराबाद संस्थानाचे एकूण क्षेत्रफळ ८०,००० चौरस किलोमीटरपेक्षा जास्त होते. हे इंग्लंड आणि स्कॉटलंडच्या एकूण क्षेत्रफळापेक्षा जास्त आहे. त्याला टॅक्स वगैरे स्वरूपात भरपूर पैसा मिळत असे.

हेही वाचाः ‘गोल्ड ईटीएफ’मध्ये आले १०३ कोटी रुपये, गुंतवणुकीसाठी समजला जातो सुरक्षित पर्याय

आजही कोट्यवधी रुपये बँकांमध्ये जमा

निजाम मीर उस्मान अली खान यांनी आपला बराचसा पैसा परदेशी बँकांमध्ये ठेवला होता. त्यांच्याकडे ३५ दशलक्ष पौंड म्हणजेच ३ अब्ज रुपयांहून अधिक रक्कम इंग्लंडमधील बँकेत जमा आहे. या रकमेवर पाकिस्तान आणि भारत दोघेही दावा करीत आहेत आणि निजामाच्या कुटुंबातील ४०० लोकांनीही दावा केला आहे. याशिवाय इतर अनेक परदेशी बँकांमध्ये निजामाचे पैसे अडकले असल्याचे सांगितले जाते.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who was nizam mir osman ali khan the first billionaire of independent india with more than 3 billion rupees in the bank even today vrd
Show comments