आदित्य आत्ता कुठे नोकरीमध्ये स्थिरस्थावर होऊ लागला होता. या कंपनीमध्ये प्रोफाइल आणि काम मनासारखे होते. त्याने आता त्यांच्या आर्थिक बाबींवर लक्ष द्यायचे ठरवले. आतापर्यंत त्याला योग्य वाटतील त्या इन्शुरन्स पॉलिसी घेतल्या होत्या, थोडेफार होते, काही गुंतवणुकी होत्या पण तरीही काहीतरी राहुन जातंय असे वाटतं होते.
एखादी गुंतवणूक करताना ती योग्य आहे का हे ठरवणे काहीसे अवघड जात होते.
आपण आपल्या आर्थिक बाबींमध्ये जे काही करतोय त्याला एक ठोस पध्दत, शिस्त आणि मार्ग हवा असं त्याला वाटत होतं.
‘ Financial planning ‘ म्हणजे
‘ आर्थिक नियोजन ‘ याविषयी इंटरनेट वर वेगवेगळी माहिती मिळत होती. पण त्याच्या मनात अनेक संभ्रम होते.
*आर्थिक नियोजन माझ्यासाठी योग्य ठरेल का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • त्यासाठी मला माझे आजच्या राहणीमानात तडजोड करावी लागेल का?
  • ‘ आर्थिक नियोजन ‘ कोणाकडून आणि कसे करून घेता येईल?

आदित्य सारखेच आज अनेक लोकांच्या मनात ‘ आर्थिक नियोजनाविषयी’ अनेक समज, गैरसमज, आणि संभ्रम आहेत.
त्यातले काही आपण पडताळून पाहू आणि योग्य काय ते सुद्धा समजून घेऊ.

१आर्थिक नियोजन हे फक्त श्रीमंत लोकांसाठीच असते

अनेक लोकांना असा वाटतं की ‘ financial planning’ किंवा ‘ आर्थिक नियोजन ‘ हे फक्त श्रीमंत लोकांसाठीच असते, ज्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी योग्य आणि पुरेसा पैसा आहे त्यांनाच हे लागू होते. पण प्रत्यक्षात मात्र असे काही नाही!

आज तुमचे वय कितीही असो, उत्पन्न कमी – जास्त असो, अथवा तुम्ही नोकरदार किंवा व्यावसायिक असलात तरी आर्थिक नियोजन सर्वांना लागू होते.
आज बाजारात अनेक प्रकारची गुंतवणुकीची साधने उपलब्ध आहेत, त्यातच आज पैसा खर्च करण्यासाठी अनेक वाढीव गरजा आणि प्रलोभने आहेत.
खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ साधताना जर तुमच्या आर्थिक बाबींना योग्य दिशा मिळाली तर तुमचे पैसे तुमच्या योग्य त्या वेळी कमी येतात, भविष्यातील ध्येय तुम्ही पूर्ण करू शकता. जरी तुम्ही तुमच्या समजुतीने आर्थिक व्यवहार, गुंतवणुकी इ करत असलात तरी त्याला ‘ योग्य नियोजन, तुमच्या सद्य गुंतवणूक आणि आर्थिक बाबींचा आढावा ‘ यांची जोड देणे केव्हाही उत्तम!

आणखी वाचा: Money Mantra: कमावू लागलात; आता गुंतवू लागा!

२ आर्थिक नियोजन म्हणजे फक्त गुंतवणुकीचे नियोजन आणि अधिक परताव्याची हमी

हा एक गैरसमजच आहे, की आर्थिक नियोजन म्हणजे ‘ निव्वळ तुमच्या गुंतवणुकीचे नियोजन करणे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त परतावा मिळेल’.
खरं तर, आर्थिक नियोजन कधीही तुम्हाला अधिकाधिक परताव्याची हमी देत नाही. तुमची भविष्यातील ध्येयनिश्चिती करून , तुम्हाला तुमची ध्येय, जोखीम क्षमता आणि गुंतवणुकीच्या कालावधी नुसार योग्य ते साधन निवडण्यास मदत करते. याचा हेतू तुम्हाला तुमची ध्येयपूर्ती करण्यास मदत करणे हा असतो.
यात अनेक उपलब्ध गुंतवणुकीच्या प्रकारातून योग्य तो प्रकार निवडणे, तुम्हाला त्याची योग्य पुरेशी माहिती करून देणे हे साध्य होते. यामुळे तुम्हाला त्याचे पैसे कसे आणि कुठे गुंतवले जात आहेत ते कळते.

फक्त गुंतवणूक नव्हे तर तुमच्यासाठी योग्य तो इन्शुरन्स आणि त्याचे नियोजन करणे हे सुद्धा समाविष्ट होते.
आर्थिक उन्नती, ध्येयपूर्ती सोबत तुम्हाला आर्थिक स्वावलंबन जपायला ते मदत करते.

३ मोफत सल्ले आणि उपलब्ध माहिती यांच्या आधारे सुद्धा आर्थिक नियोजन केले जाऊ शकते

आज सोशल मीडिया, पुस्तके, वृत्तपत्रे, ब्लॉग इ माध्यमातून ‘ वैयक्तिक आर्थिक नियोजनाच्या ‘ बाबतीत विविध प्रकारची माहिती उपलब्ध आहे. आपले मित्र मैत्रिणी, office मधले सहकारी सुद्धा आपल्याला अनेक सल्ले देत असतात. पण लक्षात घ्या, की ही माहिती ‘ सार्वजनिक ‘ स्वरूपातील असते.

वैयक्तिक आर्थिक नियोजन हेवैयक्तिक स्वरूपातील असते. आपले प्रत्येकाचे उत्पन्न, वय, आर्थिक जबाबदाऱ्या, भविष्यातील ध्येय, आव्हानं वेगवेगळी असतात. त्यामुळे कोणताही ‘ सार्वत्रिक ‘ स्वरूपातील सल्ला हा निव्वळ महिती म्हणून पाहावा. स्वतः चे आर्थिक नियोजन अधिकृत तज्ज्ञाकडून करून घेतलेले चांगले!

आर्थिक नियोजनकार हा नेहमी –
-नि:पक्षपणे सल्ला देणारा
-आवश्यक ती सर्व शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक तो निगडित अनुभव असणारा
-तुमच्या वैयक्तिक आर्थिक माहितीविषयी गोपनीयता बाळगणारा आणि तुम्हाला तुमच्यासाठी योग्य तो सल्ला
-आर्थिक आणि वैयक्तिक नियोजन विषयी तुम्हाला योग्य तो सल्ला देणारा असावा.

४ एकदा आर्थिक नियोजन केले की पुढे सगळे नीट आणि योग्य होईल

आर्थिक नियोजनात अगदी कमी पल्ल्याच्या ध्येयापासून ते लांब पल्ल्याच्या ध्येयापर्यंत नियोजन असते. यात तुमच्या सद्य आर्थिक बाबींचा आढावा घेतला जातो. यावर योग्य ते मार्गदर्शन आणि सुयोग्य पर्याय सुचवले जातात.

एकदा का हा ‘आर्थिक नियोजन आराखडा ‘ तयार झाला की त्याचा वेळोवेळी मागोवा घ्यावा लागतो आणि त्यात आवश्यक ते बदल करावे लागतात.

आपली आर्थिक परिस्थिती, उत्पन्न बदलत असते, खर्च वाढतात, काही जबाबदाऱ्या वाढतात काही कमी होतात, काही ध्येय पूर्ण होतात, बाजारात चढउतार होतात, गुंतवणुकीची साधने, त्यांचे नियम, करप्रणाली बदलत असते.

यामुळे तुम्हाला तुमच्या आर्थिक नियोजन आराखड्याचा नेहमी आढावा घेत राहणे चांगले. काळानुसार तुम्हाला त्यात योग्य ते बदल करता येतात.

  1. आर्थिक नियोजन हे नेहमी भविष्याचा विचार करते

नियोजन हे अर्थात भविष्यासाठी असते! तरीही आर्थिक नियोजनामध्ये तुमच्या ‘ आज ‘ च्या आर्थिक घडामोडींचा, व्यवहारांचा, गुंतवणुकीचा, इन्शुरन्स इत्यादीचा सखोल विचार घेतला जातो.

तुमचे आजचे राहणीमान ( स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग) कसे कायम राखले जाईल, त्याचा स्तर कसा उंचावला जाईल हे पहिले जाते.

तुमच्या आजच्या आर्थिक ज्ञानाचा विचार केला जातो , त्यात तुमच्या ज्ञानात योग्य ती भर घालून तुम्ही तुमचे आर्थिक निर्णय योग्य त्या प्रकारे कसे घेऊ शकाल हे पाहिले जाते.

त्यामुळे तुमच्या वर्तमानाचा ही विचार तुमच्या भविष्यासोबत केला जातो!

म्हणूनच आपल्या वर्तमानासोबत भविष्यसुद्धा आर्थिक दृष्टया स्वावलंबी आणि ध्येयपूर्तीचे व्हावयाचे असेल, तर आर्थिक नियोजन केलेले उत्तम!