Income tax return : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी फॉर्म १६ हा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज आहे. तो सर्व पगारदार वर्गासाठी आवश्यक आहे. कारण किती वार्षिक उत्पन्न मिळाले, किती कर कापला गेला आणि कोणत्या विभागात तुम्ही कर वाचवला, ही सर्व माहिती फॉर्म १६ मधून मिळते. फॉर्म १६ मध्ये उत्पन्न, कर बचत गुंतवणूक आणि कर कपात तसेच आर्थिक वर्षासाठी लागू असलेल्या स्रोतावरील कर वजावट (Tax Deduction at Source) यासंबंधीचे सर्व तपशील असतात.
१९६१ चा प्राप्तिकर कायद्यानुसार, (Income Tax Act, 1961) ज्यांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा सर्व कर्मचाऱ्यांना फॉर्म १६ देणे बंधनकारक आहे. कंपन्या/नियोक्ते साधारणपणे दरवर्षी मे-जूनमध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांना फॉर्म १६ देतात. जर तुम्ही आर्थिक वर्षात अनेक ठिकाणी काम केले असेल तर तुम्हाला प्रत्येक कंपनीकडून स्वतंत्र फॉर्म १६ घ्यावा लागेल.
फॉर्म १६ म्हणजे काय?
फॉर्म १६ हे तुमच्या नियोक्त्याने तुम्हाला दिलेल्या पगाराचे आणि आर्थिक वर्षात टॅक्स डिडक्टेड सोर्स (TDS) चे तपशीलवार विवरण आहे. प्राप्तिकर विभाग मासिक आधारावर तुमच्या पगारातून टीडीएस कापतो.
फॉर्म १६ का आवश्यक आहे?
फॉर्म १६ मध्ये तुमच्या पगाराचे तपशीलवार विभाजन असल्याने प्राप्तिकर रिटर्न भरताना ते तुम्हाला खूप मदतशीर ठरते. तुम्हाला तुमच्या पगाराची माहिती (segment-wise) फॉर्म १६ वरून मिळेल आणि ती माहिती ITR वेबसाइटवर किंवा तुम्हाला ITR फाइल करण्यात मदत करणाऱ्या इतर कोणत्याही वेबसाइटवर जमा करू शकता. फॉर्म १६ मध्ये तुमच्या पगाराच्या आणि गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या टप्प्यांसाठी कॉलम असल्याने तुमच्या ITR (ऑफलाइन किंवा ऑनलाइन) फॉर्ममध्ये तीच माहिती भरताना गोंधळ होण्याची शक्यता कमी असते.
फॉर्म १६ कधी उपलब्ध होणार?
२०२२-२३ साठी फॉर्म १६ जून १५, २०२३ रोजी उपलब्ध असेल. याचा अर्थ जर तुमच्या नियोक्त्याने एप्रिल २०२२ ते मार्च २०२४ या कालावधीत TDS कापला असेल तर त्यांनी तुम्हाला १५ जूनपर्यंत फॉर्म १६ द्यावा. तुम्ही आर्थिक काळात नोकऱ्या बदलल्या असल्यास वर्षानंतर तुम्हाला तुमच्या जुन्या नियोक्त्याकडून तसेच तुमच्या नवीन नियोक्त्याकडून फॉर्म १६ ची विनंती करावी लागेल. ते तुम्हाला ITR भरण्यासाठी फॉर्म देण्यास बांधील आहेत.
फॉर्म १६ मध्ये पगाराची अन् भरलेल्या करांची अचूक नोंद
कर्मचार्यांना त्यांचे प्राप्तिकर रिटर्न भरण्यासाठी फॉर्म १६ आणि त्यात समाविष्ट केलेले तपशील खूप महत्त्वाचे आहेत. फॉर्म १६ तुमच्या पगाराची आणि भरलेल्या करांची पूर्णपणे अचूक नोंद ठेवतो. हे मूलत: तुम्ही सरकारकडे कर भरला आहे की नाही याचा पुरावा म्हणून काम करतो.
कर भरताना तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचा आणि भरलेल्या कराचा निश्चित पुरावा म्हणून फॉर्म १६ द्यावा लागेल.
याशिवाय तुम्ही कर्ज किंवा क्रेडिटसाठी अर्ज करताना उत्पन्नाचा पुरावा म्हणून फॉर्म १६ वापरू शकता.
भरलेला कर योग्य आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी फॉर्म १६ देखील आवश्यक आहे.
तुमच्या व्हिसा प्रक्रियेदरम्यान फॉर्म १६ एक समर्थन दस्तऐवज म्हणून देखील वापरला जाऊ शकतो.
तुम्ही फॉर्म १६ साठी पात्र आहात का?
फक्त ते कर्मचारी फॉर्म १६ साठी पात्र आहेत, ज्यांचे वेतन प्राप्तिकरांतर्गत येते. जर तुमचा पगार प्राप्तिकराच्या मर्यादेत येत नसेल आणि कंपनी तुमच्या पगारातून TDS कापत नसेल, तर तुम्हाला फॉर्म १६ मिळणे देखील बंधनकारक नाही. काही कंपन्यांनी ट्रेंड बदलला आहे, आता कमी वेतन असणाऱ्या सर्व कर्मचार्यांना फॉर्म १६ प्रदान करतात. यामुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराचे स्पष्ट चित्र मिळण्यास मदत होते.
फॉर्म १६ मध्ये दोन वेगळे भाग आहेत, फॉर्म १६ भाग A आणि फॉर्म १६ भाग B.
फॉर्म १६ भाग ए
फॉर्म १६ च्या भाग A मध्ये सामान्यतः कर्मचार्यांचे वैयक्तिक तपशील जसे की नाव, निवासस्थान, पॅन आणि इतर माहिती हे तपशील असतात.
तसेच नियोक्ता तपशील जसे संस्थेचे नाव, TAN आणि PANचाही समावेश असतो
कर्मचार्यांच्या पगारातून प्रत्येक तिमाहीत TDS कापला जातो, तसेच TDS संबंधित बँक तपशील आणि व्यवहाराची माहिती दिली जाते.
फॉर्म १६ च्या भाग A मध्ये लागू आर्थिक वर्षाचा तपशील तसेच तुम्ही संस्थेमध्ये नोकरी करत असलेल्या कालावधीचा समावेश आहे.
हेही वाचाः VPF मध्ये पीएफपेक्षा जास्त फायदा, मोठी रक्कम हातात येणार अन् कर सूटही मिळणार
फॉर्म १६ भाग बी
फॉर्म १६ च्या भाग बीमध्ये तुमच्या पगाराचे सर्व तपशील आहेत. ज्यामध्ये तुमच्या पगारातून विविध कपाती, सूट समाविष्ट आहेत.
मूळ वेतन, घरभाडे भत्ता, भविष्य निर्वाह निधी योगदान, टीडीएस, व्यावसायिक कर, इत्यादी सारख्या सर्व स्प्लिट-अप भाग B मध्ये समाविष्ट आहेत.
एचआरए, वैद्यकीय भत्ता, वाहतूक भत्ता यांसारख्या कर सवलतींचा समावेश आहे.
प्राप्तिकर कायदा १९६१ च्या अध्याय VI A अंतर्गत दावा केलेली कोणतीही सूट मिळते.
भरलेल्या कराच्या निधीसह थकबाकी असलेल्या कर निधीच्या रकमेचा तपशील, तसेच कर परतावा तपशील.
फॉर्म १६ भाग A आणि भाग B मधील फरक
फॉर्म १६ च्या दोन्ही भागांमध्ये कोणताही गोंधळ करू नका. फॉर्म १६ A हा प्राप्तिकर दस्तऐवज आहे, जो पगाराव्यतिरिक्त इतर सर्व उत्पन्नासाठी TDS शी संबंधित तपशील देतो. यामध्ये फ्रीलान्स कमाईवरील टीडीएस, बँकांमधील एफडीमधून मिळालेल्या व्याजावरील टीडीएस, तसेच कमिशन, भाडे आणि इतर पगार नसलेल्या उत्पन्नावरील टीडीएसचा समावेश आहे. दुसरीकडे फॉर्म १६B हा एक कर दस्तऐवज आहे, ज्यामध्ये मालमत्तेच्या विक्रीसाठी टीडीएसचा तपशील असतो. मालमत्तेचा खरेदीदार टीडीएस कापून सरकारला भरण्यासाठी जबाबदार आहे. TDS सरकारकडे जमा केल्याचा पुरावा म्हणून विक्रेत्याला फॉर्म १६B दिला जातो.