विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीए) कुठल्याही प्रकारची (पहिल्यांदा अथवा नूतनीकरण करताना ) देण्यात येणारी पॉलिसी आता डिजिटल स्वरुपातच देण्या बाबत सर्व इन्शुरन्स कंपन्याना बंधनकारक केले आहे. यामुळे ओघानेच असी डिजिटल स्वरुपात मिळणारी पॉलिसी आपल्या खात्यात जमा होण्यासाठी एक स्वतंत्र खाते असणे आवश्यक झाले आहे व यासाठी आयआरडीएने ई-इन्शुरन्स अकाऊंट (ई-आयए)(e-IA) ही सुविधा देऊ केली आहे. काय आहे आहे ई-इन्शुरन्स अकाऊंट (ई-आयए) व ते कसे उघडता येते व त्याचा नेमका काय फायदा आहे हे आपण तपशीलवार समजून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ई-इन्शुरन्स अकाऊंट (ई-आयए): ही एक रिपॉझिटरी स्वरुपाची सुविधा असून यामुळे सर्व प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसीज एकाच ठिकाणी संग्रहित करता येतात व अशा सर्व एकाच ठिकाणी असणाऱ्या इन्शुरन्स पॉलिसीजचे व्यवस्थापन सहजगत्या करणे शक्य होते. थोडक्यात ज्याप्रमाणे आपण आपले शेअर्स डिपॉझिटरीच्या डी-मॅट खात्यात डिजिटल स्वरुपात ठेवत असतो त्याचप्रमाणे आपल्या सर्व प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसीज आता ई-इन्शुरन्स अकाऊंट (ई-आयए) मध्ये डिजिटल स्वरुपात जमा होतील. ही रिपॉझिटरी सुविधा देण्यासाठी आयआरडीएने खालील चार संस्थाना नोंदणी प्रमाणपत्र (सर्टिफीकेट ऑफ रजिस्ट्रेशन) देऊ केले आहे.

1) एनएसडीएल डेटा बेस मॅनेजमेंट लिमिटेड (एनडीएमएल)
2) सेन्ट्रल इन्शुरन्स रिपॉझिटरी लिमिटेड (एसआयआरएल )
3) कार्वी इन्शुरन्स रिपॉझिटरी लिमिटेड(सीआयआरएल)
4) कॅम्स रिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड(सीआरएसएल)

ई-इन्शुरन्स अकाऊंट (ई-आयए) कसे उघडता येते?

  • वरील चार पैकी कोणत्याही एका रिपॉझिटरीच्या वेबसाईटवर जाऊन अकाऊंट ओपनिंग फॉर्म डाऊनलोड करावा. डाऊनलोड केलेल्या फॉर्ममधील संपूर्ण माहितीसह भरावा, या तपशिलात प्रामुख्याने खाते उघडणार असणाऱ्या व्यक्तीचे संपूर्ण नाव (आधार कार्ड नुसार), पत्ता, मेल आयडी, मोबाईल नंबर व बँक खात्याचा तपशील (बँकेचे नाव, खाते नंबर, आयएफएससी कोड ई.) समावेश असतो. याशिवाय ज्या व्यक्तीस आपण आपला अधिकृत प्रतिनिधी नेमणार आहात त्याचे नाव, पत्ता मेल आयडी, मोबाईल नंबर व या व्यक्तीचे आयडी प्रुफ याचा उल्लेख करावा लागतो. या फॉर्म सोबत केवायसी साठी आवश्यक असणाऱ्या पॅन कार्ड, आधार कार्ड यांच्या स्वप्रमाणित प्रती (सेल्फ अटेस्टेड कॉपीज) जोडाव्या लागतात. याशिवाय अकाऊंट ओपनिंग फॉर्म इन्शुरन्स कंपनी तसेच अप्रूव्हड पर्सन यांच्याकडेसुद्धा मिळू शकतो.
  • असा बिनचूक भरलेला फॉर्म त्याच वेबसाईटवर अपलोड करू शकता किंवा जर आपल्याला ऑफलाईन खाते उघडायचे असेल तर सबंधित रिपॉझिटरीच्या मान्यताप्राप्त ठिकाणी ज्याला (अप्रूव्हड पर्सन) असे म्हणतात हा फॉर्म सुपूर्द (सबमिट) करू शकता. ज्या प्रमाणे एनएसडीएल तसेच सीडीएसएल यांच्या कडील डीपॉझिटरी अकाऊंट (डी-मॅट) बँक अथवा ब्रोकर यांच्याकडे उघडता येते व ती बँक किंवा ब्रोकर डीपी (डीपॉझिटरी पार्टीसिपन्ट) म्हणून काम पाहत असते व आपल्या डी-मॅट सर्व व्यवहार या डीपीमार्फत होत असतात त्याचप्रमाणे अप्रूव्हड पर्सन मार्फत आपल्याला आपल्या ई-इन्शुरन्स अकाऊंट (ई-आयए) खात्यावरील व्यवहार (उदा: नवी इन्शुरन्स पॉलिसी घेणे, पॉलिसी मुदतीपूर्वी अथवा मुदती नंतर सरेंडर करणे, क्लेम दाखल करणे, आयुर्विमा पॉलिसीवर कर्ज घेताना लीन नोंदवणे ई.) करता येतात. ज्याप्रमाणे बहुतांश बँका व प्रमुख ब्रोकर्स डीपी म्हून काम पाहतात त्याचप्रमाणे इन्शुरन्स कंपन्या व प्रमुख बँका अप्रूव्हड पर्सन म्हणून काम पाहतात. अशा अप्रूव्हड पर्सनची नेमणूक रिपॉझिटरी मार्फत केली जाते. आपण ऑनलाईन अथवा ऑफलाईन भरलेल्या फॉर्ममधील माहितीची पडताळणी करून आपले ई-इन्शुरन्स अकाऊंट खाते उघडले जाते व त्यासोबत आपल्याला युनिक १३ अंकी खाते नंबर, अकाऊंट ओपनिंग किट तसेच लॉग इन आयडी/पासवर्ड दिला जातो.

ई-इन्शुरन्स अकाऊंट (ई-आयए) ची वैशिट्यं

-आयआरडीएच्या मार्गदर्शक सुचनेनुसार एका व्यक्तीस केवळ एकच खाते उघडता येते.
-खाते केवळ एकाच व्यक्तीच्या नावावर उघडता येते. डी-मॅट खात्यासारखे संयुक्त नावावर खाते उघडता येत नाही.
-आपल्याकडे सध्या कुठल्याही प्रकारची इन्शुरन्स पॉलिसी नसली तरी खाते उघडता येते व भविष्यात घेण्यात येणाऱ्या पॉलिसीज या खात्यावर घेता येतात.
-खाते उघडण्यासाठी काहीही खर्च येत नाही.
-फॉर्म सबमिट केल्यावर (बिनचूक असेल तर ) पुढील सात दिवसात खाते उघडले जाते.
-सर्व प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसीज ( लाइफ व जनरल इन्शुरन्स ) या एकाच खात्यावर डिजिटल स्वरुपात घेता येतात तसेच आधी असलेल्या सर्व प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसीज या खात्यावर डिजिटल स्वरुपात रुपांतरीत करता येतात.
-आपली सध्या फिजिकल स्वरुपात असलेली कोणतीही इन्शुरन्स पॉलिसी आपल्या ई-इन्शुरन्स अकाऊंटमध्ये डिजिटल स्वरुपात रुपांतरित करण्यासाठी –रिपॉझिटरीच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेला कनव्हर्जन फॉर्म डाऊनलोड करून आपल्याला जी पॉलिसी रुपांतरीत करावयाची आहे तिचा सर्व तपशील भरून -तो फॉर्म ऑन लाईन अथवा ऑफ लाईन सबंधित इन्शुरन्स कंपनीस पाठवावा, काही कंपन्या पॉलिसीच्या मूळ प्रत सोबत जोडण्यास सांगतात तर काही केवळ स्कॅन कॉपी अपलोड करावयास सांगतात.
-आपली नवी अथवा सध्या असलेली फिजिकल पॉलिसी खात्यावर डिजिटल स्वरुपात जमा झाल्याचे एसएमएस तेसच ई-मेल द्वारे कळविले जाते.
-खात्यावर जमा असलेल्या सर्व पॉलिसींचा तपशील सबंधित पॉलिसीनुसार उपलब्ध होऊ शकतो.(उदा: पॉलिसी सुरु झाल्याची व पॉलिसी कालावधी संपणार असल्याची तारीख, उपलब्ध इन्शुरन्स कव्हर, कंपनीचे नाव, नॉमिनेशन , लीन, असाइनमेंट, पॉलिसीच्या अटी) तसेच खातेधारक आपल्याला हवी असलेली -पॉलीसी डाऊनलोड करून प्रिंट घेऊ शकतो.
-आपले ई-इन्शुरन्स अकाऊंट (ई-आयए) एका रिपॉझिटरीतून दुसऱ्या रिपॉझिटरीत वर्ग करता येते.
-आपल्या ई-इन्शुरन्स अकाऊंट (ई-आयए)ला खातेधारक एक अधिकृत व्यक्तीची नेमणूक करू शकतो. ही अधिकृत व्यक्ती खातेधारकाच्या मृत्यू नंतर किंवा -खातेधारका खात्यावरील व्यवहार करण्यास सक्षम नसेल तरच या खात्यावर व्यवहार करू शकेल मात्र त्याला केवळ व्यवहार करता येतात क्लेम किंवा तत्सम मिळणारे पेमेंट बेनिफिशय/रीनॉमिनी किंवा असायनिस मिळते.
-खातेदार अधिकृत व्यक्ती कधीही बदलू शकतो मात्र त्याबाबतची योग्य ती सूचना रिपॉझिटरीला द्यावी लागते व असा बदल झाल्याचे खात्री करून घेणे योग्य असते.
-खातेदारचे निधन झाल्यावर सर्व क्लेम सेटल झाल्यावर अधिकृत व्यक्तीने ई-इन्शुरन्स अकाऊंट (ई-आयए) बंद करण्याची विनंती करून खाते बंद करावयाचे असते.

ई-इन्शुरन्स अकाऊंट (ई-आयए) खात्याचे फायदे?

रिपॉझिटरी कडून आपल्याला हवे तेव्हा खात्याचे स्टेटमेंट मिळू शकते कि ज्या मध्ये आपल्याकडे असणाऱ्या सर्व प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसींचा समावेश असतो. कोणतीही नवीन पॉलिसी घेताना नव्याने केवायसीची पूर्तता करावी लगणार नाही केवळ ई-इन्शुरन्स अकाऊंट (ई-आयए) खाते नंबरचा उल्लेख करावा लागतो. फोन/मोबाईल, ई-मेल व पत्ता यातील बदल केवळ रिपॉझिटरीला कळवावा लागतो तो व झालेला बदल अपोआप सर्व पॉलिसींमध्ये नोंदवला जातो.सर्व प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसीज एकाच ठिकाणी पाहता येतात शोधाशोध करावी लागत नाही. इन्शुरन्स पॉलीसीज हरवण्याची, फाटण्याची किंवा खराब होण्याची शक्यता राहत नाही. थोडक्यात असे म्हणता येईल कि नव्याने घ्यायची किंवा सध्या फिजिकल फॉर्ममध्ये असेली पॉलिसी इन्शुरन्स अकाऊंट (ई-आयए) खाते उघडून डिजिटल स्वरुपात घेणे निश्चितच सोयीस्कर व फायदेशीर आहे.